राजकारणी लोकांच्या हातचे बाहुले असलेल्या लोकांनी कब्जा केल्याने भ्रष्टाचाराचे आगर बनलेल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची पंचवार्षिक निवडणूकही आता वादाच्या भोवर्यात सापडली आहे. या निवडणुकीपूर्वी सर्वसाधारण सभा झाली नाही, सभासदांना अहवाल नाही. उलट येथील भ्रष्टाचाराबाबत आवाज उठविणार्या सदस्यांनाच निलंबित करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणाबाबत ‘मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय बचाव कृती समिती’तर्फे आवाज उठविण्यात येत आहे.
Read More