पावसाळ्यात विना विलंब आणि विनाअडथळा लोकल वाहतूक सुरु राहावी यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे टीमने मे-जून-२०२४ दरम्यान १.५५ लाख घनमीटर गाळ काढला असल्याचा दावा केला आहे.
Read More
यंदा मुंबई महापालिकेने कंत्राटदारांना नालेसफाई सुरू होण्यापूर्वी, प्रत्यक्ष काम सुरू असताना आणि ते संपल्यानंतर, अशा तीन टप्प्यांमध्ये चित्रफित व छायाचित्रे काढून ती आपल्या सॉफ्टवेअरवर अपलोड करणे बंधनकारक केले आहे. त्यात प्रत्यक्ष दिनांक, वेळ, अक्षांश, रेखांश (रिअल टाइम जिओ टॅग) याचा समावेश असणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई महानगरपालिकेने मान्सूनपूर्व नालेसफाई, गटारांची स्वच्छता यांसारख्या कामांना सुरुवात केलेली दिसते. तसेच यंदा मुंबईची तुंबई होणार नाही, असे दावेही पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहेत. त्यानिमित्ताने मे महिन्याच्या प्रारंभी मुंबईतील नालेसफाईची सद्यस्थिती आणि वास्तव अधोरेखित करणारा हा माहितीपूर्ण लेख...
पावसाची आता निरोप घेण्केयाची वेळ आली तरी वडाळा पूर्व, दीनबंधू नगर आणि संगम नगर यांना जोडणारा नाला हा अजूनही साफ न झाल्याचे आणि मागील १५ ते २० वर्षे या नाल्याची संपूर्ण सफाई न झाल्याचे येथील स्थानिकांनी "दै. मुंबई तरुण भारत" सोबत बोलताना स्पष्ट केले. "आम्ही नगरसेवकांना अनेकदा नाला साफ करण्याविषयी सांगूनही स्थानिक प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची पावले उचलण्यात आली नाहीत. लोकप्रतिनिधी हे फक्त निवडणुकांपुरतेच आश्वासन देतात पण ती आश्वासने अंमलात आणत नाहीत," अशी तक्रार येथील स्थानिकांनी केली आहे.
लहानशा शहरातून आयएएस होण्यासाठी आलेला मुलगा आपला मार्ग बदलून नव्या क्षेत्रात झेप घेण्याचा प्रयत्न यशस्वी करून दाखवतो, अशा विक्रांत रामदास याच्याशी गप्पा
विक्रांत रामदास यांची खास मुलाखत
एका लहानशा गावातून आयएएस होण्यासाठी आलेला मुलगा जिद्दीने आपला मार्ग बदलतो आणि नव्या क्षेत्रात झेप घेण्याचा प्रयत्न यशस्वी करून दाखवतो, अशा विक्रांत रामदासविषयी...
नालेसफाईची पोलखोल या विषयासंदर्भात भाजप आमदार योगेश सागर यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहून लक्ष वेधले आहे. मुंबईतील अपूर्ण नालेसफाई संदर्भातील कामे पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत संबंधित कंत्राटदारांना कुठल्याही प्रकारची देयक रक्कम वर्ग करु नये, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
मागील तीन ते चार वर्षांपासून गोराईमधील प्रभाग क्र. ९ येथील मलनिस्सारण (गटार/सांडपाणी)वाहिनी साफ करण्यात आली नसून, ही वाहिनी मागील २६ वर्षांपासून दुरूस्तदेखील करण्यात आली नसल्याचे स्थानिकांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना सांगितले.
“पारदर्शी पद्धतीने नालेसफाईची कामे पूर्ण करायची असल्यास कामांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकार्यांचा विशेष ‘टास्क फोर्स’(नालेसफाई) नियुक्त करा, ‘आयएएस’अधिकार्यांना रस्त्यावर उतरून काम करायला लावा, अशा मागण्या भाजपच्या शिष्टमंडळाने बुधवार, दि. 13 एप्रिल रोजी मुंबई महापालिका आयुक्त/प्रशासक इकबालसिंह चहल यांच्याकडे केली. ‘टास्क फोर्स’च्या मागणीवर प्रशासकांनी सकारात्मक असल्याची माहिती भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कांदिवली पश्चिम येथील लालजी पाडा येथे घर कोसळून एका मुलाचा मृत्यू झाला आणि दोन महिला जखमी झाल्या आहेत. ड्रेनेज लाईनचे काम सुरू असताना तळमजला अधिक एकमजली घराचा मोठा भाग अचानक कोसळला
मार्च महिन्याचे १५ दिवस उलटले आहेत तरीसुद्धा मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईतील नालेसफाई अजून सुरु झालेली नाही
मुंबई : कलिना येथील कोलिवेरी व्हिलेजमधील गेले अनेक वर्षे नागरिक पाणीबाणीने त्रस्त आहेत. याठिकाणी दोन-दोन दिवस नळाला पाणी येत नाही. पाण्याबरोबरच या परिसरात ड्रेनेज समस्यादेखील मोठी आहे. अपुरा पाणीपुरवठा, कचरा, ड्रेनेज व्यवस्थेचा उडालेला बोजवारा यामुळे कोलिवेरी व्हिलेज सध्या समस्येचे आगार बनले आहे. नगरसेवकांकडून निवडणुकीपुरताच पाणी समस्येचा मुद्दा विचारत घेतला जातो, असा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.
२०२० मध्ये कोरोना आणि ‘लॉकडाऊन’मुळे नालेसफाईअभावी मुंबापुरीची ‘तुंबापुरी’ झालीच. पण, याही वर्षी नालेसफाईच्या कामांसाठी पालिकेला अद्याप ठेकेदारच मिळत नसल्याने ‘तुंबापुरी तथास्तु’ असेच म्हणण्याची वेळ आली आहे. तेव्हा, पालिका यासंबंधी नेमकी कुठे कमी पडते आणि काय उपाययोजना कराव्या लागतील, त्याचा आढावा घेणारा हा लेख...
मुंबईला शुद्ध हवेची गरज
गटारावरील झाकण उघडल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती सोमवारी मुंबई महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे.
भिवंडी महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक दि. २४ मे २०१७ रोजी संपन्न झाली होती. आज १ वर्षाचा कालावधी लोटूनही स्थानिक रहिवासी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.
अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनेपाठोपाठ आता शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामांनादेखील महिनाभरात सुरुवात होणार आहे.