‘विज्ञान भारती’ हे एक अखिल भारतीय संघटन एक स्वदेशी विज्ञान आंदोलन आहे. आपल्या देशातील प्राचीन ते अर्वाचीन विज्ञानाबद्दल जागृती निर्माण करून आपल्या देशाच्या उन्नतीसाठी वैज्ञानिकांना एकत्र आणून नवनवीन क्षेत्रात काम उभे करणे या उद्देशाने हे आंदोलन गेली ३१ वर्षे चालू आहे. विज्ञान भारतीच्या ‘विद्यार्थी विज्ञान मंथन’ या उपक्रमाचा या लेखात मागोवा घेण्यात आला आहे.
Read More
कोणताही विज्ञान किंवा अन्यदेखील विषय आणि त्याची सविस्तर माहिती त्यांच्याकडे नाही, असे कधीच अनुभवायला मिळाले नाही. इतक्या सुसूत्रतेत ते माहिती सांगायचे की, अगदी मंत्रमुग्ध व्हायला व्हायचं. मग स्वामी विवेकानंदांचे संगीतातले सखोल ज्ञान असेल की, ‘टेस्ला’च्या तंत्रज्ञानाची माहिती असेल.... इतका परिपूर्ण माहितीचा साठा एकावेळी कसं काय ते डोक्यात साठवून ठेवतात, याचं कौतुक असायचं.
जयंतरावांचे निधन झाल्याचे वृत्त समजले. काही महिन्यांपासून त्याची दुर्दैवी चाहूल लागतच होती, परंतु ते मनाला पटत नव्हते. ईश्वरेच्छा. पण, लवकरात लवकर भारतमातेच्या सेवेसाठी ते परत येणार व हिंदूराष्ट्र (अखंड) करूनच दाखवणार, हा विश्वास आहे.
एक दूरदुष्टी असलेला नेता आणि संयोजक जयंत सहस्रबुद्धे यांचे निधन झाल्यामुळे अतिशय दुःख होत आहे. ‘विज्ञान भारती‘चे राष्ट्रीय संघटन सचिव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, या नात्याने त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले आणि आपल्या समाजाची बांधणी मजबूत करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. दोन दशकांहून अधिक काळ त्यांच्या अनुकरणीय नेतृत्वाचा साक्षीदार म्हणून, मी जयंतराव यांना परिभाषित करणार्या काही अपवादात्मक गुणांवर प्रकाश टाकू इच्छितो.
जयंतरावांच्या निधनाची धक्कादायक बातमी ऐकली आणि त्यांच्या सोबतचे प्रसंग आणि आठवणी मनासमोर उभ्या राहिल्या. १९९३-९४ मध्ये काही वेळ नाशिक विभाग प्रचारक, नंतर कोकण प्रांत प्रचारक आणि अन्य वेळी प्रांत प्रचारक बैठकीत आणि संघ शिक्षा वर्ग आदी अन्य कार्यक्रमांतून सतत भेटी होतच असत. मुंबईत परळ विभाग प्रचारक असल्यापासून घराशीही जवळचा संबंध आला.
स्वयंसेवकांचे प्रेरणास्थान, मृदू स्वभाव, कुशल संघटक, विचारक, कोकण प्रांत प्रचारक असताना अथक प्रवास करणारे जयंतराव सहस्रबुद्धे. दि. २ जून रोजी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी विज्ञान क्षेत्रात उभे केलेले कार्य सर्वस्वी अद्भुतच. वैज्ञानिकांच्या सहज संवादातून हृदयस्थ संबंधांचे रुपांतर त्यांनी ‘विज्ञान भारती’शी जोडण्यात केले. जयंतरावांचा स्वभाव धीरगंभीर. मोजकेच पण परिणामकारक बोलणारे. असा हा भारतमातेचा नररत्न गमावल्याची खंत आज प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात असेल.
केवळ संघटनेपुरते मर्यादित न राहता, देशहितासाठी आवश्यक विज्ञान क्षेत्रातील सर्वच घडामोडींवर जयंत सहस्रबुद्धे यांचे लक्ष होते व प्रत्येक कार्यकर्त्याला तशी दृष्टी असण्यावर त्यांचा आग्रह होता. ते स्वत: सर्व स्तरातल्या वैज्ञानिकांशी मोकळेपणाने अनेक विषयांवर चर्चा करीत व संपूर्ण विषय समजून घेण्याचा प्रयत्न करीत असायचे. अर्थात, जे राष्ट्राच्या हिताचे असेल ते स्पष्टपणे सांगणे, हा त्यांचा मूळ स्वभाव होता.
ज्ञान भारती’चे राष्ट्रीय संघटन सचिव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक जयंतराव सहस्रबुद्धे यांचे नुकतेच देहावसान झाले. आपल्या सर्वांना त्यांचा परिचय आहेच! जयंतराव यांचा सहवास लाभलेले महाराष्ट्रात अनेक संघ स्वयंसेवक तथा ’विज्ञान भारती’चे कार्यकर्ते आहेत, अशा सर्वांची जयंतराव यांच्याशी असलेली आपुलकी, प्रेम व जिव्हाळा नेहमीच संस्मरणीय राहील.
आपल्या मधुर वाणीने, नम्र व प्रेमळ स्वभावाने, व्यवहाराने व त्या-त्या क्षेत्रातील अध्ययनाने जयंतराव सहस्रबुद्धे यांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटविला. श्रेष्ठ गुणवत्ता, सात्त्विकता व समर्पण ही त्यांच्या जीवनाची त्रिसूत्री होती.
पुणे : विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक जयंत श्रीकांत सहस्त्रबुद्धे यांचे शुक्रवारी (२ जून) निधन झाले. मागील वर्षी झालेल्या रस्ता अपघातापासून ते आजारी होते. ते ५७ वर्षांचे होते.
नागपूर : विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक जयंत श्रीकांत सहस्त्रबुद्धे यांचे शुक्रवारी (२ जून) निधन झाले. मागील वर्षी झालेल्या रस्ता अपघातापासून ते आजारी होते. ते ५७ वर्षांचे होते. सहस्रबुद्धे यांच्या निधनावर सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी शोक व्यक्त केला आहे.
भारतासाठी दूरसंचार तंत्रज्ञान हे केवळ सामर्थ्याचे साधन नसून सक्षमीकरणाची मोहीम आहे. भारतात डिजिटल तंत्रज्ञान सार्वत्रिक असून ते प्रत्येकासाठी उपलब्ध आहे, प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले आहे.
डॉ. थॉमस पुकाडिल, डॉ. अमित अग्रवाल, डॉ. अमलेन्दु कृष्णा, डॉ. अमित दत्त, डॉ. जी. नरेश पटवारी, डॉ. अश्विन अनिल गुमास्ते यांना या ‘शांती स्वरूप भटनागर’ पुरस्काराने गौरवण्यात आले
'भविष्यातील भारत : संघाची दृष्टी' या विषयावर रा. स्व संघाचे १७ ते १९ सप्टेंबर दरम्यान दिल्लीतील विज्ञान भवन येथे शिबीर आयोजित करण्यात आले आहे
मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून आज देशातील उच्च संस्थांची सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. केंद्रीय मनुष्य संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात ही सूची आज जाहीर केली आहे.