भिवंडी-वाडा-मनोर या महामार्गावर बुधवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास डॉ. नेहा शेख (वय २५) या तरुणीचा दुचाकीवरून पडून अपघात झाला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, यापूर्वीही झालेल्या विविध अपघातांप्रकरणी सुप्रीमो कंपनीला सर्वोच्च न्यायालयाने हा रस्ता दुरुस्त करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले नसते तर कदाचित डॉ. नेहा शेख हिचा जीव गेला नसता, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
Read More