Narendra Modi श्रीलंकेचे राष्ट्रपती दिसानायके यांच्या हस्ते सर्वोच्च मित्र विभूषण पुरस्काराने गैरवण्यात आले आहे. त्यांनी सोशल मीडियावरील X ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे. नरेंद्र मोदी या पुरस्काराचे दावेदार आहेत यात तिळमात्र शंका नाही याची अनेक कारणं आहेत. पुरस्कार प्रदान करताना राष्ट्रपती दिसानायके यांनी नरेंद्र मोदींचे तोंडभरून कौतुक केले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी या पुरस्काराचे दावेदार आहेत. मला पुरस्कार प्रदान करताना आनंद होत आहे की, श्रीलंकामधील सर्वोच्च आणि मानाचा मानला जाणाऱ्या पुरस्का
Read More
Fee hike अमेरिकेने वाढीव आयात शुल्क लादून जगभरात व्यापारयुद्धाला चालना दिली असली, तरी भारताला नव्या संधीची दारे खुली केली आहेत. चीनला समर्थ पर्याय म्हणून भारताने यापूर्वीच स्वतःची वैश्विक ओळख प्रस्थापित केली. आता अमेरिकेने चीनवरच सर्वाधिक शुल्क लादत, एकप्रकारे भारतीय कंपन्यांसाठी उपलब्ध करुन दिलेली सुवर्णसंधी लाभदायक अशीच...
PM Narendra Modi And Dr. Mohan Bhagwat Meet पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरला येणार, संघ कार्यालयाला भेट देणार, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची भेट घेणार, दोघांत चर्चा होणार, याची (निरुद्योगी) वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडिया यावर प्रचंड चर्चा सुरू होती. जणूकाही हा प्रसंग संघ आणि भाजपच्या इतिहासाला कलाटणी देणारा प्रसंग ठरणार आहे, अशा प्रकारच्या बातम्या घोळूनघोळून आणि निवेदक आपण संघासंबंधीचे महाज्ञानी आहोत, या आविर्भावात सांगत होते. या सर्वांचे दोन शब्दांत वर्णन करायचे, तर ‘महा करमणूक’ (The Great entertainment)
पंतप्रधानांनी कधी निवृत्त व्हायचे, हे संजय राऊत यांच्यासारख्या सकाळच्या भोंग्यावर ठरत नाही तर जनता ठरवते अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या विधानावर त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत प्रत्युत्तर दिले.
सर्वज्ञानी संजय राऊत म्हणजेच रडत रौत उबाठासेनेचा पोपट झाला असून आता या उबाठांनी पाळलेल्या पोपटाने भाकड भविष्य सांगायला सुरूवात केली आहे, असा घणाघात आमदार चित्रा वाघ यांनी केला आहे. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या विधानावर त्यांनी प्रत्युत्तर दिले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या १०० वर्षांच्या ऐतिहासिक अशा प्रवासात संघाचा विस्तार पांथस्थाला आधार देणार्या वटवृक्षाप्रमाणे झालेला दिसून येतो. तो सामान्य असा वृक्ष नाही, तर भारताच्या संस्कृतीचा अक्षयवट आहे, असेच म्हणावे लागेल.
गेल्या काही दिवसांपासून बलुचिस्तानमधील पाकिस्तानी सैन्यावरील लक्ष्यित हल्ल्यांची संख्या सातत्याने वाढत असून, स्वतंत्र बलुचिस्तानच्या मोहिमेने पाकिस्तानची पुन्हा झोप उडविली आहे. त्यात भारतातील मोदी सरकार आणि आता अमेरिकेच्या ट्रम्प सरकारनेही दहशतवादाविरोधी कठोर धोरण स्वीकारल्याने पाकिस्तानची अवस्था बुडत्याचा पाय खोलात अशी झाली आहे.
जागतिक सत्ता समतोल झपाट्याने बदलत असला, तरी त्याची दखल न घेतल्याने संयुक्त राष्ट्र ही संघटना आता कालबाह्य ठरत आहे. ही संघटना केवळ अमेरिका आणि पश्चिम युरोपीय देशांच्या हातचे बाहुले बनल्यामुळे, जागतिक समस्यांच्या सोडवणुकीत ही संघटना अर्थहीन, निष्क्रिय आणि दुर्बळ ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्राच्या पुनर्रचनेची पुनश्च अधोरेखित केलेली मागणी म्हणूनच रास्त ठरावी.
( Like Trump PM Narendra Modi is also committed to peace Tulsi Gabbard ) अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांनी मंगळवारी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील शांततेसाठी वचनबद्ध आहेत.
( Narendra Modi work of the Rashtriya Swayamsevak Sangh ) “बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकींना उपस्थित राहणे माझ्यासाठी आनंददायी होते. आपण देशासाठी समर्पित जीवन जगावे, हे मला रा. स्व. संघाने शिकवले. यावर्षी 100 वर्षे पूर्ण करणार्या रा. स्व. संघापेक्षा जगात अन्य दुसरा मोठा स्वयंसेवी संघ नाही.‘आरएसएस’ समजून घेणे सोपे काम नाही, त्याचे कार्य समजून घेणे आवश्यक आहे,” अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीमध्ये ते बोलत होत
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहित नवी दिल्ली येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहे. तसेच या पत्रातून त्यांनी पंतप्रधान मोदींकडे एक मागणीदेखील केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने ऊर्जा क्षेत्रात व्यापक बदल अनुभवले. शेतकऱ्यांना दिलेल्या सवलती, स्वच्छ आणि हरित ऊर्जेच्या प्रकल्पांना चालना, तसेच भारनियमन कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या सुधारणांमुळे महाराष्ट्र ऊर्जा क्षेत्रात सक्षमपणे वाटचाल करतोय. याच उपक्रमांचा एक भाग म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य ग्राहकांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीवर भर दिला, ज्यात १,९२,९३६ इंस्टॉलेशन्स पूर्ण करून महाराष्ट्राने देशात दुसर
केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या 'पीएम गतिशक्ती' अंतर्गत 'नेटवर्क प्लॅनिंग गटा'च्या '89व्या' बैठकीत राज्यातील बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार व कार्यक्षमता सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले असून या निर्णयासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव सनदशीर मार्गाने करता येणार नाही, ही गोष्ट भारतविरोधी शक्तींना कळून चुकली आहे. परिणामी, आता हिंसाचाराचा मार्ग अनुसरण्याच्या निष्कर्षापर्यंत या शक्ती आल्या आहेत. त्यामुळे समाजात राहूनच देशविरोधी हिंसक कारवाया करणार्यांवर कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे.
आजवरच्या भारताशी संबंधित इतिहासलेखनात देवळांच्या संहारामागचे खरे षड्यंत्र हे कायमच गुलदस्त्यातच कसे राहील, याची अगदी पद्धतशीर तजवीज केली गेली. ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ या दोन झापडांच्या आड, मंदिरांचा विध्वंस हिंदू प्रतीके म्हणून नव्हे, तर लुटीसाठी झाल्याचा खोटा इतिहास हिंदूंच्या गळी वर्षानुवर्षे अलगद उतरविण्यात आला. त्यामुळे इतिहासाकडे डोळसपणे बघून, त्याचे यथार्थ आकलन करणे हे स्वत्वाच्या शोधासाठी आवश्यक आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोमनाथ मंदिराला भेट दिली. त्यानिमित्ताने गझनीच्या महमूदान
भारताचे औद्योगिक उत्पादन जानेवारीत वाढले असल्याचे Industrial Production Index अहवालात नमूद करण्यात आले आहे. येणार्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ सुदृढपणे होणार आहे, हेच यातून अधोरेखित होते. केंद्र सरकारची उत्पादनाला अनुकूल अशी धोरणे आणि देशांतर्गत मजबूत मागणी ही या वाढीची प्रमुख चालक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा या पार्श्वभूमीवर ३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिन सन्मान दिन म्हणून साजरा केला जाईल तसेच ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबरदरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. दि. १० मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचा २०२५-२६ सालचा अर्थसंकल्प सादर करताना ते बोलत होते.
‘एमएसएमई’ क्षेत्र देशाच्या जीडीपीत सर्वाधिक भर घालणारे तर आहेच, त्याशिवाय कृषी क्षेत्राखालोखाल रोजगार देणारे क्षेत्र म्हणून ते उदयास आले. केंद्र सरकारनेही या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना आखल्या आहेत. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत येत्या काळात जागतिक बाजारपेठेत ‘एमएसएमई’ क्षेत्र मोलाचे योगदान देताना दिसून येईल, हे निश्चित.
Aligarh Muslim University च्या प्रशासनाने होळी खेळण्यासाठी हिंदू विद्यार्थ्यांना विरोध दर्शवला आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे याबाबत दाद मागणार आहेत. अलिगड मुस्लिम विद्यापीठ हिंदूंविरोधात भेदभावाचे धोरण स्वीकारत आहेत. हिंदू धर्माच्या धार्मिक कार्यक्रमांना आक्षेप नाही, तर विद्यापीठाच्या आवारात मुस्लिम सण साजरे केले जात आहेत. मग हिंदू धर्मांना विरोध का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘रामप्रसाद शर्मा’ची ‘गोलमाल’ भूमिका!कायदा सर्वांना समान असायला हवा असे म्हणणारेच, आपल्याला मात्र त्यातून सूट मिळायला हवी, अशी अपेक्षा बाळगतात, तेव्हा त्यांचा दांभिकपणा उघड होतो. नर्म विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले आणि ‘गोलमाल’ चित्रपटात रामप्रसाद शर्माची भूमिका साकारलेले अभिनेते अमोल पालेकर यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानामुळे त्यांचा सभ्यतेचा मुखवटा गळून पडला आहे. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या political censorship संकल्पना या निवडक आहेत, हेच त्यातून दिसून येते.
महाकुंभ मेळ्यात सनातनी श्रद्धाळूंचा लोटलेला महापूर आणि त्यातून जगाला दिसलेली सनातन संस्कृतीची विलक्षण शक्ती ही जगाला आश्चर्याचा धक्का देणारीच होती. या कुंभमेळ्याचे केलेले आयोजन यामुळे अनेक देशविघातक वृत्तींनाही मोठाच धक्का बसला आहे. असे असले तरीही श्रद्धाळू भक्तांना निश्चितच अलौकिक सुखाचा अनुभव मिळाला यात शंका नाही.
जागतिक वन्यजीव दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यातील गिर वन्यजीव अभयारण्यात जंगल सफारीचा आनंद लुटला आहे. त्यानी आशियाई सिंहांना जवळून पाहिले होते. तसेच त्यांनी जंगल सफारीचा आनंद घेत आपले फोटोशूटही केले. दुसऱ्या एका फोटोत नरेंद्र मोदी हातात कॅमेऱा घेऊन सिंहाकडे पाहताना दिसतात. एक मादी सिंहिणी आपल्या बछड्याचा मिठी मारताना दिसते.
Pakistan-occupied भारताच्या स्वातंत्र्यानंतरही अद्यापही जम्मू-काश्मीरचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. अशातच आता दिल्लीचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मोठे विधान केले आहे. पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरची (POJK) वापसी होणे हे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळातच होईल. जम्मू काश्मीर पीपल्स फोरम आणि मीरपूर (POJK) बलिदान समितीने आयोजित केलेल्या (POJK) संकल्प दिवस कार्यक्रमात त्यांनी सांगितले. यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, (POJK) भारतात विलीन करण्याचे स्वप्न प
Policy देशातील विविधता जशी त्याची ताकद आहे, तसेच त्यामुळे अनेकदा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत विलंबदेखील होतो. कारण, प्रत्येक राज्याचे हित साधणे महत्त्वाचे असते. इथे केंद्र सरकारची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने विविध चर्चेने सोडवण्यासाठी क्षेत्रीय परिषदांसारखा कार्यक्रम गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात घेतल जात आहे. या कार्यक्रमाचा राज्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम झाला आणि त्यातूनच देशातील अनेक समस्या कशा सोडवण्यात आल्या, याचा घेतलेला हा मागोवा....
दि. २२ जानेवारी २०२४ रोजी, अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी मी देवभक्ती आणि देशभक्ती म्हणजेच अनुक्रमे दैवी शक्तींची भक्ती आणि राष्ट्राची भक्ती याबाबत विचार मांडले होते. प्रयागराज येथील महाकुंभात देवी आणि देवता, संत, महिला, लहान मुले, तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिक आणि जीवनाच्या सर्व स्तरांवरील लोक एकत्र आले. देशामध्ये जागृत झालेल्या जाणिवेचे दर्शन यावेळी घडले. या पवित्र पर्वासाठी सुमारे 140 कोटी भारतीयांच्या भावना एकाच जागी, एकाच वेळी एकवटल्या होत्या, असा हा एकतेचा महाकुंभ होता.
महाकुंभ हा युगपरिवर्तनाचा संकेत असून त्याने भारताच्या विकास प्रवासात एका नवीन अध्यायाचा संदेश दिला आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एकता का महाकुंभ युग परिवर्तन की आहट या विशेष ब्लॉगमध्ये केले आहे.
सोशल मीडिया अकाऊंट एक दिवसासाठी महिलाशक्तिकडे समर्पित करून आपल्या संस्कृतीत मुलींचा आदर करणे सर्वात महत्त्वाचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. देशाच्या मातृशक्तीने आपल्या स्वातंत्र्य लढ्यात आणि संविधानाच्या निर्मितीतही मोठी भूमिका बजावली आहे. यावेळी महिलादिनी मी एक उपक्रम हाती घेणार आहे, जो आपल्या महिला शक्तीला समर्पित असणार आहे. या खासप्रसंगी, मी माझे ’एक्स’ आणि ’इंस्टाग्राम’सारखे सोशल मीडिया अकाऊंट एका दिवसासाठी देशातील काही प्रेरणादायी महिलांकडे सोपवणार आहे,” असेही त्यांनी सांगितले. पं
देशभरातील शेतकर्यांना पीएम किसान योजनेचे १८ हप्ते मिळाले आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९व्या हप्त्याचे वितरण आज सोमवार दि. २४ फेब्रुवारी रोजी केले जाणार आहे. ‘पीएम किसान सन्मान निधी’च्या वितरणाचा कार्यक्रम बिहारमध्ये पार पडणार आहे
सेमीकंडक्टर या आधुनिक तंत्रज्ञानासाठी भारत एकेकाळी, बाहेरील देशांवर अवलंबून होता. मात्र, या क्षेत्रातसुद्धा भारताने आत्मनिर्भर होण्यासाठी कंबर कसली आहे. सेमीकंडक्टरच्या निर्मितीसाठी लागणारी सर्व संसाधने, भारताकडे व्यापक स्वरूपात आहेत. त्यामुळेच सेमीकंडक्टर निर्मितीचे जागतिक केंद्र होण्याकडे भारताची वाटचाल सुरू आहे...
MK Stalin मधमाश्यांच्या पोळावर दगड मारू नये. हे प्रकरण भडकवू नये असा दावा आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी केले आहे. मोदी सरकारने आणलेल्या राष्ट्रीय धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे. भाषिक आधारावर द्वेष पसरवण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असल्याचा बेताल दावा स्टॅलिन यांनी केला आहे. त्यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही तमिळनाडू सरकारवर सुधारणांप्रति रुपांतरीत करण्याचा आरोप करण्यात आला आहे.
Shaktikanta Das रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नर पदाच्या निवृत्तीनंतर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. शक्तिकांत दास आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून काम करणार आहेत. याचा आदेश केंद्र सरकारने जारी केला आहे.
Narendra Modi राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (रा. स्व. संघ) आपले शताब्दी वर्ष साजरे करत आहेत. संघामुळेच मराठी आणि महाराष्ट्राशी माझा ऋणानुबंध निर्माण झाला, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी विज्ञान भवनातील शानदार कार्यक्रमात केले.
(Rekha Gupta) राजधानी दिल्लीतील भाजपच्या आमदार रेखा गुप्ता यांनी आज गुरुवारी दि. २० फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत रामलीला मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला. तसेच आताच्या घडीला मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या त्या एकमेव महिला भाजप नेत्या आहेत.
कतारचे अमिर शेख तमिम बिन हमाद अल थानी यांचा दोनदिवसीय भारत दौरा नुकताच पार पडला. २०१५ सालानंतर ते पहिल्यांदाच भारतात आले. त्यांचे स्वागत करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी राजनयिक शिष्टाचार दूर सारून स्वतः विमानतळावर गेले होते. त्यानिमित्ताने भारत-कतार परराष्ट्र संबंधांचा ऊहापोह करणारा हा लेख...
बांगलादेशातील सत्तांतर नाट्यानंतर मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत आले. त्यानंतर तेथे हिंदू अल्पसंख्याकांवरील अमानुष अत्याचारांचे सत्र अद्याप थांबलेले नाही. आपल्या डोक्यावर अमेरिकेचा हात आहे. त्यामुळे भारत या मुद्द्यावरून आपले काहीच वाकडे करू शकत नाही, असा समज काहीकाळ युनूस सरकारचा झाला असावा. मात्र, अमेरिकेत झालेल्या सत्तापरिवर्तनानंतर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीनंतर अनेक फासे पलटले. ही एकाअर्थी मोहम्मद युनूस यांच्यासाठी धोक्याच
२०३० पर्यंत देशातील कापडनिर्यात तिपटीने वाढून, ती नऊ लाख कोटी रुपयांवर नेण्याचे उद्दिष्ट भारताने ठेवले आहे. आज भारत जगातील सहाव्या क्रमांकाचा कापड निर्यातदार देश आहे. येणार्या काळात तो स्पर्धक देशांना मागे टाकेल, तसेच त्याद्वारे अधिकाधिक रोजगाराला चालना देईल, असे म्हणूनच म्हणता येईल.
डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट निर्णय म्हणजे, बांगलादेशचे भविष्य आता पंतप्रधान मोदींच्याच हातात असल्याचं दिसतंय... #NarendraModi #DonaldTrump #MuhammadYunus #Bangladesh #USA #India #Hindu #News #MahaMTB
दिल्ली येथे पार पडणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्धाटन देशाचे पंतप्रधान Narendra Modi यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाचे वेगळेपण नेमके कशात आहे हे जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमातून #मराठीभाषा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका वारीत ट्रम्प यांनी मोदींना जे महत्त्व दिले, ते मोलाचे असेच आहे. द्विपक्षीय व्यापार कराराबरोबरच, भारताला शस्त्रास्त्रे पुरवण्यासही अमेरिका इच्छुक आहे. त्याचबरोबर प्रदेशातील व्यापाराला चालना देणारा भारत-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या उभारणीलाही अमेरिकेने सक्रिय पाठिंबा दिला आहे.
सध्याच्या काळात सल्ले देण्याचे प्रमाण काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी वाढवलेले आहे. पूर्वी त्यांच्या भाषणात सातत्याने काही जादुई विधाने ऐकायला मिळत होती. नंतरच्या काळात देशातील उद्योगपती आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्याचा कार्यक्रमही झाला. यावरही जनता न भाळल्याने आणि प्रसंगी ज्ञानाच्या मर्यादा उघड झाल्याने, त्यांनी टीकेचा स्वर बदलत केंद्र सरकारवर सल्लात्मक टीका करण्यास सुरुवात केली आहे. यात वरकरणी सल्ला दिल्यासारखे भासवायचे आणि त्याच्या आडून टीकाच करायची, ही राहुल गांधी यांची नवी कार्यशैली.
(Earthquake in Delhi NCR) देशाची राजधानी दिल्ली येथे सोमवारी सकाळी ५ वाजून ३६ मिनिटांनी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीतीलच धौलाकुवा भाग होता. यामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसरात (एनसीआर) सोमवारी सकाळी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील धौलाकुवा हा भागातील दुर्गाबाई देशमुख कॉलेज ऑफ स्पेशल एजुकेशनच्या जवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता आणि भूकंपाची तीव्रता ही ४.० रिश्टर स्केल एवढी होत
शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पण, गेल्या काही दशकांत शेतकर्यांना फक्त आश्वासनांची भुलथापच मिळाली. कधी कर्जमाफीच्या नावाखाली शेतकर्यांना फसवले गेले, तर कधी दलालांच्या जाळ्यात अडकवून शेतकर्यांना कर्जबाजारी केले गेले. मोदी सरकारने मात्र हे चित्र बदलण्याचा निर्धार केला असून, ‘ई-नाम’ या कृषी डिजिटल मंडईची निर्मिती एप्रिल २०१६ साली झाली. आता या मंडईच्या विस्तारासह दहा नवीन कृषी वस्तूंचा समावेश करून सरकारने शेतकर्यांना भेट दिली आहे.
Developed India 2047 राजकारणात काही मैत्री या चर्चेच्या विषय ठरतात. मोदी आणि ट्रम्प यांचा याराना असाच. त्यामुळे ट्रम्प निवडून आल्यावर या दोन्ही नेत्यांच्या भेटीकडे जगाचे लक्ष लागले होते. सत्तेत आल्यापासून, अमेरिकेच्या हिताचे निर्णय घेण्याचा आक्रमकपणा दाखवणारे ट्रम्प मोदींशी कसे वागणार याची उत्सुकता देशातील विरोधी पक्षालाही होती. मात्र, पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौर्यात देशाच्या पदरात सन्मान पडला असताना, विरोधकांची ओंजळ मात्र रिकामीच राहिली. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी अमेरिका दौर
(PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. शुक्रवार दि. १४ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ च्या सुमारास त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. . प्रदीर्घ बैठकीनंतर मोदी व ट्रम्प यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. दरम्यान, बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना एक खास गिफ्ट दिले आहे.
Narendra Modi हे परदेश दौऱ्यावर आहेत. अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार आणि भारत-अमेरिकेच्या संबंधांवर चर्चा केली. तेव्हा, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना व्यापार करारांबाबत एक प्रश्न करण्यात आला. त्यावर पत्रकाराने जकातीच्या बाबतीत सर्वाधिक कोण कठोर? असा प्रश्न केला होता.
(PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. फ्रान्स दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी एआय अॅक्शन समिटला हजेरी लावली. यावेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. या समिटनंतर काल दि. १२ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्स राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मार्सेला येथील माझारग्युस वॉर सेमेटरी (mazargues war cemetery) येथे भेट दिली.
(PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. नुकतेच तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यानंतर आता ते अमेरिकेत दाखल झाले आहेत. तिथे पोहोचताच भारताचे अमेरिकेतील राजदूत विनय मोहन क्वात्रा यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी त्यांचे तिथे स्वागत केले आहे.
नरेंद्र मोदी दि. १२ आणि दि. १३ फेब्रुवारी रोजी अमेरिकेला भेट देत आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या महिन्याभरात हा दौरा पार पडत आहे. तसेच फ्रान्समध्येही ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ परिषदेला मोदींनी काल संबोधित केले. त्यानिमित्ताने मोदींच्या या फ्रान्स आणि अमेरिका दौर्याचे महत्त्व अधोरेखित करणारा लेख...
नरेंद्र मोदींचा अमेरिका फ्रान्स दौरा कोणते मुद्दे गाजणार? Narendra Modi's-France Visit
Narendra Modi हे फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी ११ फेब्रुवारी रोजी पॅरिसमध्ये सुरू असलेल्या एआय अॅक्शन समिटमध्ये त्याचे मित्र राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत सामील होते. पंतप्रधानांनी या परिषदेचे सह-अध्यक्षपदही भूषवले. या परिषदेत १०० देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एआयचे महत्त्व पटवून दिले आहे.