DoT

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

(Tamil Nadu drops official Rupee Symbol from State Budget) तामिळनाडूमधील एमके स्टॅलिन यांचे सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भाषेच्या मुद्द्यावर तणावाचे वातावरण आहे. यात आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (M K Stalin) यांच्या निर्णयामुळे हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. तामिळनाडू सरकारने राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये रुपयाच्या चिन्हाऐवजी (₹) तमिळ भाषेतील रुबई मधील पहिले अक्षर ‘रु’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम तमिळ भाषेत प्रसारित करा, गृहमंत्री अमित शाह यांचा दावा

Amit Shah तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी हिंदी भाषेविरोधात फतवा काढला असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. हिंदी भाषेमुळे तमिळ भाषेकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्टॅलिन यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: एमके स्टॅलिन यांना सांगितले की, राज्यात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण हे तमिळ भाषेत सुरू करावे. ७ मार्च २०२५ रोजी रानीपेट जिल्ह्यातील थाकोलममधील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ५६ व्या स्थापन दिनाच्या समारंभात अमित शाह यांनी संबोधित केलं.

Read More

"आपली मुलं महागडया शाळेत शिकतात तिथंही हिंदी भाषा शिकवली जाते मग.....," राष्ट्रीय शिक्षण धोरणाला विरोध करणाऱ्या द्रमुकला अन्नामलाईंकडून चपराक

आपलीही मुलं महागड्या शाळांमध्ये शिक्षण घेतात. तिथेही हिंदी, इंग्रजी आणि तमिळ भाषेचे ज्ञान दिले जाते. याला आता अन्नामलाईंनी द्रमुकचे ढोंग आहे का? प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सुनावले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० वरून तामिळनाडूत मोठा वादंग निर्माण झाला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे नेते एमके स्टॅलिन यांनी या धोरणाविरूद्ध आवाज उठवला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे धोरण तामिळनाडूवर हिंदी भाषा लादण्याचे षडयंत्र असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Read More

सनातनविरोधी वक्तव्यावरुन कोर्टाने 'स्टॅलिन'ला सुनावलं

एमके स्टॅलिन पुत्र आणि तामिळनाडू सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या टिप्पणीवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी, दि. ४ मार्च २०२४ चांगलेच खडेबोल सुनावले. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने तामिळनाडू, महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीर, बिहार, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये केलेल्या वादग्रस्त टिप्पणीबद्दल दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) एकत्र करण्यासाठी उदयनिधी स्टॅलिन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना उदयनिधी यांच्या विधानावर तीव्र ना

Read More

बरळल्या रामाबद्दल इतका द्वेष? स्टॅलिनच्या कार्यकर्त्यांना झालयं काय?

“राम राजवाड्यात हजारो महिलांसोबत राहत होता आणि दारूही प्याला होता. तुम्ही ते तुमच्या मुलांसाठी उदाहरण म्हणून वापराल का? जगण्याची हिंमत नसल्याने त्याने सरयूमध्ये उडी मारून आत्महत्या केली. तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या उदाहरणाने वाढवाल का? हा कसला मूर्खपणा? रामाने स्वतःच्या पत्नीवर संशय घेतला आणि तिला जंगलात पाठवले, तुम्ही लोक हे उदाहरण म्हणून दाखवाल का?" प्रभू श्रीरामाबद्दल असे वादग्रस्त वक्तव्य तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या निकटवर्तीय आणि द्रविड कळघम तमिझार पेरीवाईच्या सरचिटणीस उमा इलैक्कि

Read More

ममता बॅनर्जींना इंडी आघाडीच्या बैठकीचे आमंत्रण नाही; नाराजी केली व्यक्त

तीन राज्यात भाजपच्या विजयानंतर इंडी आघाडीच्या बैठकीबाबत राजकीय वातावरण तापले आहे. भाजपकडून काँग्रेसचा दारुण पराभव झाला. यानंतर, 6 डिसेंबर रोजी दिल्लीत होणारी इंडी आघाडीची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सीएम एमके स्टॅलिन, नितीश कुमार आणि अखिलेश यादव यांनी बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी बैठकीला न येण्याचे कारण दिले आहे. या बैठकीसंदर्भात राहुल गांधींनी फोन केल्याचेही सांगितले. ममता बॅनर्जी यांनी यावेळी आपली नाराजी ही बोलून दाखवली आहे.

Read More

विधानसभा निकालातून सनातनविरोधकांना सणसणीत चपराक

‘कोण भारतमाता? तिचा शोध घ्यावा लागेल’ यांसारखी बेजबाबदार आणि उद्दाम विधाने पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान करणार्‍या राहुल गांधींना मतदारांनी या निकालातून सणसणीत चपराक लगावली. मात्र, या निकालातून कोणताही धडा न घेता, द्रमुकच्या खासदाराने ‘गोमूत्रवाल्या राज्यांत भाजपचा विजय झाला,’ असे म्हणत हिंदू धर्म, सनातन संस्कृतीला अपमानित करण्याचा पुन्हा एकदा केविलवाणा प्रयत्न केला. तेव्हा विधानसभा निवडणूक निकालाप्रमाणेच आगामी लोकसभा निवडणुकीतही मतदारांनी अशा सनातनविरोधी नेत्यांना मतपेटीतून त्यांची जागा दाखवून दिल

Read More

उदयनिधी स्टॅलिन यांना हिंदुस्तानी भाऊचा सल्ला; म्हणाले- 'हिंदुस्तानी भाऊ एकटा...'

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू-मलेरिया या आजारांशी केली होती. त्यांच्या या विधानावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान आता हिंदुस्तानी भाऊने ही उदयनिधींच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. हिंदूस्तानी भाऊ म्हणाले की, " सनातन धर्म डेंग्यू मलेरियासारखा असून त्याला नष्ट करायला हवे, असे विधान करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांनी लक्षात घ्यावे की, सनातन धर्म संपवण्यासाठी असे अनेक जण आले. पण सनातम धर्म संपला नाही, तर ते लोकचं संपले. तसे

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121