राज्यात “वन डिस्ट्रिक्ट, वन रजिस्ट्रेशन” ही योजना अंमलात आणण्यात आली असून, नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यात कुठल्याही उपनोंदणी कार्यालयात मालमत्तेची नोंदणी करता येणार आहे. राज्यभरातील नागरिकांना ही योजना दिलासा देणारी ठरणार आहे. यापुढे एकाच जिल्ह्यातील कोणत्याही कार्यालयात नोंदणी करता येणार असल्यामुळे वेळ आणि कागदपत्रांचा त्रास टळणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
Read More
कायदेशीररित्या गर्भलिंगनिदान करून बेकायदेशीर गर्भपात करणार्यांना चाप लावण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली असून अवैध गर्भलिंगनिदान केंद्राची माहिती देणार्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक केंद्राची ९० दिवसांनी आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात येत असून उल्लंघन करणार्या आणि त्रुटी आढळणार्या केंद्रांवर कायदेशीर कार्यवाही केली जात आहे. तसेच २०२४-२५ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या नियंत्रणाखाली झालेल्या तपासणीमध्ये चार संशयित केंद्रांवर प्राधिकृत अधि
( Kharge expelled district president because chairs remained empty during rally ) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या रॅलीत गर्दी जमलीच नाही त्यामुळे रिकाम्या खुर्च्यांसमोर त्यांना भाषण आटपावे लागले. याचा राग मनात ठेवत त्यांनी बिहारच्या बक्सरचे जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज पांडे यांची पदावरून हकालपट्टी केली आहे.
(Karnataka MGNREGA Fraud) कर्नाटकच्या यादगीर जिल्ह्यातील मल्हार गावात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (मनरेगा) फसवणुकीची घटना समोर आली आहे. माहितीनुसार, मनरेगा योजनेअंतर्गत मजुरी मिळविण्यासाठी काही पुरुषांनी साड्या परिधान करुन महिला असल्याचे भासवून बनावट फोटो सादर केले होते.
मुंबई : ( ecosystem for investment in every district Devendra Fadanvis ) “महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी विना अडथळा सुविधा पुरविली जात आहे. राज्यातील सर्वच भागांत गुंतवणूक व्हावी, यासाठी ‘इकोसिस्टम’ तयार केली जात आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांत राज्यातील सर्वच भागांचा संतुलित विकास झाल्याचे दिसेल,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. ८ एप्रिल रोजी दिली.
( Bhoomi Pujan Palghar District Office of Bharatiya Janata Party ) पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, खासदार हेमंत सावरा, आमदार श्री हरिश्चंद्र भोये , भाजपा जेष्ठ कार्यकर्ते माननीय श्री बाबजी काठोले सर यांच्या शुभहस्ते पार पडला.
( Dr Indurani Jakhar is new District Collector of Palghar ) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची बदली पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारिपदी करण्यात आली आहे.
(Beed District Jail) बीडच्या जिल्हा कारागृहात सोमवार दि. ३१ मार्चला वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि बबन गिते टोळीचा महादेव गिते एकमेकांना भिडल्याचे समोर आले. कारागृहात गिते आणि कराड समर्थक यांच्यात जोरदार राडा झाला होता. दरम्यान, या घटनेनंतर महादेव गितेसह आणखी चार जणांना छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले होते. तसेच आता मकोका मधील आठवले टोळीतील आरोपींची रवानगीही नाशिक कारागृहात करण्यात आली आहे.
(Gangwar in Beed Jail) गेल्या काही महिन्यांपासून बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेचा विषय ठरलेला वाल्मिक कराड. कुठल्यान कुठल्या कारणामुळे हे नाव सतत समोर येत राहिले. सध्या कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. मात्र चर्चा त्याच्या दहशतीची नसून त्याला झालेल्या मारहाणीची आहे. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांना बीड जिल्हा कारागृहात मारहाण झाल्याची बातमी समोर आलीय. या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली.
( Plastic free Palghar district campaign launched by Guardian Minister Ganesh Naik ) जनतेच्या सेवेसाठी आपण या ठिकाणी आहोत याचे भान ठेवून अधिकारी आणि कर्मचारी यांनी जनतेची कामे तात्काळ करावी असे निर्देश वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी अधिकारी व कर्मचारी यांना दिले.
( Palghar dependent on Gujarat after 10 years of district formation the work of the district hospital is still incomplete ) जिल्हानिर्मिती होऊन दहा वर्षे लोटली, तरी पालघर अद्याप गुजरातवर अवलंबून असल्याचे वास्तव समोर आले आहे. येथील गोरगरीब रुग्णांना दिलासा देण्यासाठी नंडोरे या गावात जिल्हा रुग्णालय उभारण्यास मंजुरी देण्यात आली. परंतु, अद्याप 75 टक्केही काम पूर्ण न झाल्याने रुग्णांचे हाल कायम आहेत.
यंदा देशात बहुतांश ठिकाणी होळी आणि धुलिवंदनाचा सण शांततामय वातावरणात पार पडला असला तरी, झारखंडमध्ये मात्र धर्मांधांनी हिंदूंच्या मिरवणुकीवर केलेल्या हल्ल्यामुळे गालबोट लागले. पण, त्याहीपेक्षा शरमेची आणि तितकीच धक्कादायक बाब म्हणजे, सोरेन सरकारने हिंदूंवर फौजदारी गुन्हे दाखल केले आणि धर्मांधांना पाठीशी घातले.
( one-window scheme for sugarcane harvesting workers in all districts of the state: Deputy Speaker Neelam Gorhe ) मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगारांसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागातील अधिका-यांचा समावेश करून विकास व सहाय्य समिती स्थापन करा. ऊस तोडणी कामगारांसाठी शासनाच्या योजना एकाच प्लॅटफॉर्मवर देता येतील यासाठी एक ॲप तयार करावे, ट्रॅकींग सिस्टीम,रेशनची पोर्टिबीलीटी यासारख्या अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने योजना राबवण्यावर भर द्यावा.बीड जिल्ह्या प्रमाणे इतर जिल्ह्यातही का
आजची पिढी ही मोबाईलच्या युगात वावरणारी. तेव्हा, हिंदू धर्मातील सण, संस्कृती आणि परंपरा यांची नवीन पिढीला माहिती व्हावी आणि एक सशक्त समाज निर्माण व्हावा, यासाठी बालसंस्कार वर्गाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या हेमा नरेंद्र पवार कार्यरत आहेत. त्यांच्याविषयी...
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाकडून दोन वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गुरुवार, २० फेब्रुवारी रोजी याप्रकरणाची सुनावणी पार पडली.
(Ulhasnagar) उल्हासनगर येथे राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीने आपल्या प्रियकराच्या आणि कुटुंबियांच्या सांगण्यावरुन आपल्या एक महिन्याच्या बाळाला कळव्यातील एका कुटुंबाला कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय केवळ १० हजार रुपयात दत्तक दिले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लिव्ह इन रिलेशनशिप (Live in Relationship) मध्ये राहत असलेल्या प्रियकराच्या सांगण्यावरून बालिकेला दत्तक दिले असल्याची माहिती संबंधित तरुणीने दिली आहे. यावेळी तिने संपूर्ण प्रकार सांगत बालिकेला पुन्हा देण्याची मागणी केली आहे.
अमरावती जिल्ह्यात असलेली निष्क्रीयता दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असून यापुढे अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार चालणार नाही, अशी तंबी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण राज्यात खळबळ माजली असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हा निर्णय घेतला आहे.
(Chhattisgarh) महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेप्रमाणेच छत्तीसगडमध्येही महतारी वंदन योजना सुरु आहे. मात्र काहीजण या योजनांचा चुकीच्या पद्धतीने वापर करताना दिसतात. दरम्यान एका काँग्रेस नेत्याने चक्क अभिनेत्री सनी लिओनीच्या नावाने या योजनेतून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
महाराष्ट्रात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा जाहीर होताच जागतिक बँकेने महाराष्ट्रासाठी एक मोठी घोषणा केली आहे. जागतिक बँकेकडून महाराष्ट्रासाठी कर्ज मंजूर झाले आहे. आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी अधिक जिल्ह्यांना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या पुढाकाराला जागतिक बँक पाठिंबा देईल, असा विश्वास जागतिक बँकेने महाराष्ट्राला दिला आहे. जागतिक बँकेने प्रसिद्धीपत्रक काढत ही माहिती दिली आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात मोठ्या पवारांची एकाधिकारशाही महायुतीने मोडीत काढली आहे. पुणे जिल्ह्यातील निकाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा नेते शरद पवार यांच्या वर्चस्वाला धक्का देणारे ठरले आहेत. मविआच्या जागावाटपात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक जागा घेऊनदेखील पवारांचा बहुतांश जागांवरील पराभव हा खूप मोठा संदेश देऊन जातो.
शिमला : हिमाचल प्रदेशातील बहुचर्चित संजौली मशीद ( Sanjauli masjid ) वादाची जिल्हा न्यायालयात पुढील सुनावणी आता दि. २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. शिमला आयुक्त महापालिका न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ऑल हिमाचल मुस्लीम वेल्फेअर असोसिएशनने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. भिवंडी पश्चिम येथे भरारी पथक व नारपोली पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत संशयित वाहनांमध्ये रू. ३ लाख ३१ हजार ६०९ रुपयांचा मुद्देमाल विनातपशील आढळला असून ज्यात चांदी व चांदीचे काम असलेल्या वस्तूंची बिले तपासणीदरम्यान सादर न केल्याने भरारी पथकाने हा मुद्देमाल जप्त केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
( Nagpur District Bank Scam Case ) नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तब्बल १५० कोटींचा घोटाळा करूनही २० वर्षे आरोपी मोकाट होते. सर्वसामान्य नागरिक, गोरगरीब मजूर, शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या घामाचे पैसे लुटून त्यांनी कोट्यवधींची माया जमवली. सत्तापदे उपभोगली. आलिशान बंगले बांधले. महायुती सरकार सत्तेत येताच या भ्रष्टाचार्यांना अद्दल घडली. न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा सुनावल्यानंतर संबंधित आरोपीची आमदारकी रद्द करण्यात आली. पण, काँग्रेसने याच आरोपीच्या पत्नीला विधानसभेच्या मैदानात उतरवले आहे. त्यामुळे या
Nashik district hospital : बाळांची अदलाबदल? नाशिकच नाही मराठवाड्यातही घडले असे प्रकार!
(Nashik District Hospital) नाशिक जिल्हा रुग्णालयातील बालकांच्या अदलाबदलीच्या प्रकरणातील एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. नोंदवहीतील चुकीच्या नोंदीमुळे हा प्रकार घडल्याचे माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने बाळांची अदलाबदल झालीच नसल्याचा अहवाल दिला आहे.
नाशिक : (Nashik District Hospital) मुलाला प्रसुती दिलेल्या महिलेच्या हातात मुलगी ठेवल्याचा प्रकार नाशिक शहरात समोर आला आहे. हा प्रकार नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात घडला आहे. येथे एका महिलेने मुलाला जन्म दिला. मात्र डिस्चार्ज घेताना रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून त्यांच्या हातात मुलगी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात एका महिलेला प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले. प्रसूतीनंतर या महिलेने गोंडस मुलाला जन्म दिला. पण, डिस्चार्ज घेताना मुलगी झाल्याचे सांगत बाळ हातात देण्यात आले. रुग्णालयाच्या नोंदव
(World's Largest Dencentralized Solar Power Project) शेतकर्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात जगातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. एकूण १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या पहिल्या पाच सोलर पार्कचे लोकार्पण शनिवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी येथे करण्यात आले.
(Jitendra Sonawane)भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे मुंबई सचिव तथा दै. ‘मुंबई तरुण भारत’चे ऑपरेशन्स मॅनेजर जितेंद्र कानिफनाथ सोनावणे यांची मुंबई शहर जिल्ह्याच्या नियोजन समितीवर विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह एकूण १२ जणांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. गुरुवार, दि. १९ सप्टेंबर रोजी राज्याच्या नियोजन विभागाकडून यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला.
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या नातेवाईकांच्या हत्येप्रकरणी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पठाणकोट जिल्हा न्यायालयाने सर्व १२ आरोपींना जन्मठेपेसह प्रत्येकी दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
जिल्हा न्यायपालिका हा कायद्याचा महत्त्वाचा घटक आहे, असे प्रतिपादन देशाचे सरन्यायाधीश डॉ. डी वाय चंद्रचूड यांनी केले आहे. तसेच, जिल्हा न्यायपालिका न्यायव्यवस्थेचा कणा असून ते कायद्याचा एक महत्त्वाचा घटक असल्याचे चंद्रचूड यांनी सांगितले.
विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाच्या मान्यतेने मुंबई महापालिका क्षेत्रातील ३६ विधानसभा मतदारसंघासाठी मिळून एकूण सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी याबाबतचे आदेश नुकतेच निर्गमित केले आहेत.
आसाममध्ये सामान्यरित्या लोकसंख्याशास्त्रीय बदल झालेला नाही. हा बदल घुसखोरीचा परिणाम आहे. बंगाललाही या समस्येने ग्रासले आहे, असे विधान बंगाल भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार यांनी केले. त्यांना पत्रकारांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या विधानावर प्रश्न विचारला होता. तेव्हा त्यांनी सरमा यांच्या विधानाचे समर्थन केले.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि झोपडपट्टी भागातील सुधारणेसाठीच्या भरीव उपाययोजना करिता सन २०२४-२५ मध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) १०१२ कोटी, अनुसूचित जाती उपयोजना ७१ कोटी व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना (ओटीएसपी) अंतर्गत ५.७१ कोटी असा एकूण १०८८.७१ कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता झिरो बॅलन्स अकाऊंट ओपनिंगची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी दिली आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सहकार मंत्र्यांकडे केली आहे. या बँकेच्या सहा शाखांमध्ये कर्मचाऱ्यांनी २ कोटी ४३ लाख रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ती आणि अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत सधन असणार्या, नाशिक जिल्ह्याच्या काही भागांत कुपोषित बालके व माता आढळाव्यात ही बाब खेदजनकच आहे. जिल्ह्यातील वनवासी दुर्गम भागांत विशेषतः गर्भवती माता व नवजात अर्भकांचे योग्य जागृती अभावी पोषण होत नसल्याचे, निरीक्षण आरोग्य यंत्रणेला आढळले.
लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. ठाणे जिल्हयातील ठाणे,कल्याण आणि भिवंडी या तीन लोकसभा मतदार संघात एकुण ६५ लाख १ हजार ६७१ मतदार असुन यात २९ लाख ९४ हजार ३१५ महिला मतदार आहेत. एकट्या ठाणे लोकसभा क्षेत्रात ११ लाख २७ हजार ९९५ महिला मतदार आहेत.
पत्नीच्या नावावर काढलेले गृह कर्ज न फेडताच पत्नीला सोडून पलायन केलेल्या पतीला ठाणे न्यायालयाने चांगला दणका दिला आहे. थकलेले सर्व कर्ज फेडण्याची आणि प्रति महिना ५० हजार रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले. न्यायालयाने ज्या पतीला कायद्याचा दणका दिला आहे, तो एका मोठ्या कंपनीत लीगल हेड पदावर कार्यरत आहे.
सोमवारी पालकमंत्री मंगलप्रभात लोढांच्या हस्ते मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथ महोत्सवाचे उद्धाटन पार पडेल. दरवर्षी राज्य शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर तर्फे ग्रंथ महोत्सव साजरा केला जातो. यावर्षीदेखील ४ आणि ५ मार्च रोजी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने बुधवारी ३१ जानेवारीला एतिहासिक निर्णय देत ज्ञानवापी परिसरातील व्यासजी का तेहखाना ( तळघर ) या ठिकाणी हिंदूंना पूजा करण्याची परवानगी दिली आहे. सात दिवसांत तळघरात पूजा करण्याची व्यवस्था करण्याचे आदेश न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. हे तळघर ज्ञानवापी परीसरात असलेल्या मशिदीच्या खाली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आता तेथे नियमित पुजा विधी होणार आहेत
संस्कृतच्या प्रचार, प्रसार तसेच व्यवहारातील पुनरूज्जीवनासाठी प्रयत्नरत असलेल्या ‘संस्कृतभारती’ संस्थेच्या ठाणे शाखेद्वारा संस्कृत अभ्यासक, संस्कृत शिक्षक तसेच संस्कृतप्रेमींसाठी पर्वणी ठरेल, असे एक दिवसाचे ‘ठाणे जिल्हा संस्कृत संमेलन’ आज रविवार, दि. २१ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने ‘संस्कृतभारती’च्या कार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कुपोषित मुलांची संख्या शून्यावर आणण्यासाठी "दत्तक- पालकत्व अभियान" ठाणे जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सद्यस्थितीत जिल्ह्यातील तीव्र कुपोषित (सॅम) बालकांची संख्या ८३ तर मध्यम कुपोषित (मॅम) बालकांची संख्या ११६१ अशी एकुण संख्या १२४४ इतकी आहे.
काँग्रेसचे नेते दिग्वीजय सिंह यांना ठाणे न्यायालयाने दणका दिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) परमपुज्य गोळवलकर गुरुजीं बाबत सोशल मिडियात (एवस) अवमानजनक टिप्पणी केल्याप्रकरणी १ रुपया आणि स्वाक्षरी सहीत लेखी माफीनामा सादर करण्याचे आदेश न्यायमूर्ती सुर्यवंशी यांनी दिले.
पालघर जिल्ह्यातील तरुणांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध करण्यात आली आहे. येत्या ४ जानेवारीला जिल्ह्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत काम करण्याची संधी मिळणार आहे. या मेळाव्यास १० वी उत्तीर्णांपासून ते पदवीधरांपर्यंत सर्वांना नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी नागपूर जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. त्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. नागपूर जिल्ह्याच्या खर्चाच्या नियोजनाची जबाबदारी इंडियन इन्सिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नागपूर यांच्याकडे देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना मोठा झटका बसला आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्याप्रकरणी सुनील केदार यांना नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी मानून दोषी ठरवले आहे. त्यासोबतच अन्य पाच जणांवरील गुन्हासुद्भा सिद्ध झाला आहे. त्याव्यतिरीक्त तिघांची न्यायालयाने पुराव्याच्या आधारे निर्दोष मुक्तता केली आहे.
मुंबई महापालिकेतर्फे सप्टेंबर महिन्यात 'ओपन स्पेस अडॉप्शन पॉलिसी'चा मसुदा प्रसारित करण्यात आला होता. या धोरणाअंतर्गत महानगरपालिकेची मालकी असलेल्या जागा, देखभाल करण्यासाठी खाजगी तत्वावर दत्तक देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाबाबत पुन्हा एकदा नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याद्वारे शुक्रवार दिनांक १ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात बैठकीचे आयोजन केले. धोरणात्मक चर्चेसाठी नागरिक, प्रशासन आणि सरकार यांना एकत
ठाणे जिल्हा परिषदेच्या (झेडपी) गट क संवर्गातील महाभरतीसाठी ११ हजार ५८८ उमेदवारांनी अर्ज केले होते. परंतु ही संपुर्ण भरती प्रक्रियाच रद्द करण्यात आली होती. पैकी १ हजार ४४७ अर्जदारांपैकी ज्यांनी परिपुर्ण माहिती संकेतस्थळवर भरली होती, त्या ७४४ उमेदवारांना परिक्षा शुल्क पोटी २ लाख १४ हजार २५० रुपये परत करण्यात आले आहेत.तरी उर्वरीत उमेदवारांनी संकेतस्थळावर बँक खात्याच्या तपशिलासह परिपुर्ण माहिती भरून शुल्क परतावा घेण्याचे आवाहन झेडपी द्वारे करण्यात आले आहे.
विज्ञानाची आवड असल्यामुळे त्याच्या प्रचार-प्रसारासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून पोटतिडकीने विद्यार्थी घडवणार्या डॉ. सुधीर कुंभार यांची ही विज्ञानविश्वातील सफर...