A new direction for digital inclusion देशात सर्वांना डिजिटल अॅक्सेस मूलभूत अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच एका निकालात म्हटले आहे. हे विधान करताना डिजिटल सुविधांचा प्रचार आणि प्रसार देशातील सर्व नागरिकांपर्यंत होणे गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या अनेक योजना त्याच दिशेने प्रगती करत असून, त्यांनाही मोठ्या प्रमाणात यश मिळत आहे. त्याविषयीचा आढावा घेणारा हा लेख...
Read More
vulgar and casteist language used by director Anurag Kashyap against the Brahmin community
Public welfare schemes केंद्र सरकारने लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी ‘डीबीटी’ प्रणालीचा केलेला वापर, यातील गळती थांबवून थेट निधी हस्तांतरित करण्याचे काम नेमकेपणाने करत आहे. खर्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत पूर्ण पारदर्शकतेने काम करणारी ही योजना, दलालांना बाजूला करणारी ठरली आहे. म्हणूनच, आज बहुतांश योजनांच्या अंमलबजावणीसाठी हीच प्रणाली वापरली जाते.
National Herald गैरव्यवहार प्रकरणी ‘ईडी’ने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांच्यावर आरोपपत्र दाखल केल्याने काँग्रेसी इकोसिस्टीमने लोकशाही धोक्यात असल्याची आरोळी ठोकली. पण, मुळात हा घोटाळा आणि त्यासंबंधीच्या चौकशीला गेल्या काही वर्षांची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे ही राजकीय सूडबुद्धीने केलेली कारवाई मुळीच नाही. पण, मुळात काँग्रेस आणि घोटाळे हे राजकीय समीकरणही जुनेच! आजच्या लेखात नेहरुंच्या काळातील जीप खरेदी घोटाळा, संजय गांधींचा ‘मारुती’ प्रकल्पातील गैरव्यवहार, राजीव गांधींचा ‘बोफ
(Air India Airlines 'Pee-gate' 2.0) एअर इंडिया एअरलाईन्सच्या विमानातील गैरवर्तनाची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एअर इंडियाच्या दिल्ली-बँकॉक विमानामध्ये एका भारतीय नागरिकाने जपानी सहप्रवाशावर लघवी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एअर इंडियाने दिलेल्या निवेदनात केबिन क्रूने यावर तातडीने कारवाई केली असून भारतीय नागरी उड्डाण मंत्रालयाला ही बाब कळवल्याचे म्हटले आहे.
दि. १८ एप्रिल रोजी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा मराठी चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून, या चित्रपटात ज्ञानेश्वरांसह त्यांच्या भावंडाना त्रास देणार्या विसोबा खेचर यांची भूमिका अभिनेते योगेश सोमण यांनी साकारली आहे. त्यांच्या या आगामी चित्रपटाबरोबरच, सावरकरांवरील वेबसीरिज, ओटीटी माध्यमांविषयी योगेश सोमण यांची भूमिका दै. ‘मुंबई तरुण भारत’ने जाणून घेतली.
यंदाच्या कडाक्याच्या उष्णतेचा प्रभाव कमी करता यावा, यासाठी मे महिन्यात सगळ्यांच्या मनाला थंडावा देणारा ‘गुलकंद’ हा चित्रपट दि. १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने अभिनेते आणि विनोदवीर समीर चौघुले यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेली ही दिलखुलास बातचीत...
( MMRDA provide direct financial compensation in the project ) ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’ने (एमएमआरडीए) महत्त्वाचा निर्णय घेत सर्वसमावेशक आर्थिक ऐच्छिक भरपाई धोरण लागू करण्यास मान्यता दिली आहे. या माध्यमातून ‘एमएमआरडीए’च्या महत्त्वाच्या शहरी पायाभूत प्रकल्पांमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया अधिक वेगाने पार पाडणे, हा या धोरणाचा उद्देश आहे. हा ठराव 159व्या प्राधिकरण बैठकीत मंजूर करण्यात आला.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, अंधत्वाचे प्रमुख कारण ठरणार्या आजारांपैकी एक म्हणजे काचबिंदू (Glaucoma). हा एक डोळ्यांचा गंभीर आजार असून वेळीच निदान आणि उपचार न केल्यास कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकते. याच आजाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘जागतिक काचबिंदू सप्ताह’ दरवर्षी मार्च महिन्यात साजरा केला जातो. आज दि. १२ मार्च हा दिवस ‘जागतिक काचबिंदू दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने नेत्ररोगतज्ञ, ‘अनिल आय हॉस्पिटल्स ग्रुप’च्या मेडिकल डायरेक्टर, डॉ. अनघा हेरूर यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्
मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक-निर्माते राजेश मापुस्कर आणि कास्टिंगच्या दुनियेत बादशाह म्हणून ओळखले जाणारे रोहन मापुस्कर हे दोघे भाऊ एकत्र येऊन प्रेक्षकांसाठी एक खास भेट घेऊन आले आहेत. मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स , थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत 'एप्रिल मे ९९’ हा चित्रपट येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणजे, १६ मे २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या चित्रपटाचे पो
मुंबईतील न्यू इंडिया कॉ-ऑपरेटिव्ह बँकेत १२२ कोटींचा गैरव्यवहार झाल्याने, या बँकेवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संचालक मंडळाविरोधात कायदेशीर कारवाई सुरू झाली असली, तरी सामान्य खातेदारांना त्याचा फटका बसणार आहेच. ऑडिट किती महत्त्वाचे आहे, हे या बँकेच्या गैरकारभारातून स्पष्ट झाले आहे.
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक आणि मुख्य वनसंरक्षक पदावर अनिता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे (anita patil director). राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक पदावर पहिल्यांदाच भारतीय वन सेवेतील महिला अधिकाऱ्याची पूर्णवेळाकरिता नियुक्ती करण्यात आली आहे (anita patil director). पाटील या २०१० च्या तुकडीच्या अधिकारी असून त्या भारतीय वन सेवेतील महाराष्ट्रामध्ये नेमणूक झालेल्या पहिला महिला अधिकारी आहेत. (anita patil director)
स्वत:मधील कलेच्या आवडीला करिअर म्हणून बघत, त्यामध्ये देदिप्यमान कामगिरी करणार्या रंगभूमीवरील कला क्षेत्रातील नव्या दमाचा दिग्दर्शक असलेल्या वृशांक कवठेकर यांच्याविषयी...
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ( Punyashloka Ahilyabai Holkar ) यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्ष निमित्ताने ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या मुंबई येथील कीर्ती एम. डुंगुरसी महाविद्यालय (स्वायत्त) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे आयोजन शुक्रवार, दि. १० जानेवारी व शनिवार, दि. ११ जानेवारी रोजी करण्यात आले होते.
(Zero Pendency) उच्च आणि तंत्र शिक्षण विभागातील एकही फाइल प्रलंबित राहू नये, यासाठी या विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला असून, येत्या ३१ जानेवारीपर्यंत 'झीरो पेंडन्सी' उपक्रम राबवला जाणार आहे.
श्यामबाबूंनी ( Shyam Benegal ) ज्या काळात ते सिनेमे केले आहेत, त्या काळाच्या कसोटीवर ते सिनेमे खरे उतरले आहेत, या दृष्टीने त्यांचा विचार करणे महत्त्वाचे ठरते.
'पुष्पा २: द रुल' हा अल्लू अर्जूनचा चित्रपट सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत ‘पुष्पा २’ चित्रपटाने १४०० कोटींच्या पुढे बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे. या चित्रपटाच्या हैदराबादमधील प्रिमिअरला झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेला जीव गमवावा लागला होता. आणि त्या महिलेचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. श्रीतेज असं त्या मुलाचं नाव असून या प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. परंतु तेलंगणा उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर एका दिवसानंतर त्याची सुटका
दिग्दर्शकाला ‘चित्रपट दिसतो’ असे म्हणतात. पण, म्हणजे नेमके त्याला चित्रपट किंवा त्यातील प्रत्येक दृश्य व्हिज्युअली कसे दिसेल, ते समजणे म्हणजे नेमके काय, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘झिरो से रिस्टार्ट’ हा चित्रपट. दिग्दर्शक विदु विनोद चोप्रा गेली ४५ वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. १९७६ सालापासून त्यांनी ‘शॉर्ट फिल्म्स’ने त्यांचा दिग्दर्शकीय प्रवास सुरू केला, तो आज २०२४ सालापर्यंत अविरत सुरू आहे. नुकताच त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘१२वी फेल’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकून तुफान प्रतिसाद मिळवला. द
मुंबई : मुंबै बँक, रायगड बँकचे संचालक व ‘मुंबई हाऊसिंग फेडरेशन’चे अध्यक्ष आणि भाजपचे मुंबई उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रकाश दरेकर यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’चे ( MTB ) स्पेस सेलिंग सेल्स एक्झिक्युटिव्ह रविंद्र जाधव यांनी त्यांच्या दहिसर कार्यालयात भेट देत ‘निवडक कालजयी सावरकर’ पुस्तक देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक आणि निर्माते सुभाष घै यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीमुसार, घै यांना श्वास घेण्यास त्रास आणि अशक्तपणा आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष घै यांच्या तब्येतीत आता सुधारणा होत असून डॉक्टर करत असलेल्या उपचारांना ते प्रतिसाद देत आहेत.
मुंबई : महावितरणचे कार्यकारी संचालक ( Executive Director ) (प्रकल्प) सुनिल रंगनाथ पावडे (वय ५४ वर्षे) यांचे सोमवारी रात्री जळगाव येथे ह्दयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुख:द निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर पारनेर (जि. अहिल्यानगर) तालुक्यातील दरोडी या त्यांच्या मूळ गावी बुधवारी (दि. ४) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार होते.
राज्याच्या पोलिस महासंचालकपदी पुन्हा एकदा रश्मी शुक्ला यांची नियूक्ती करण्यात आली आहे. त्या लवकरच आपला पदभार स्विकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रश्मी शुक्लांना पदावरून हटवण्यात आले होते.
रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम रिटर्न्स या चित्रपटाची कथा मराठमोळे दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन ( Kshitij Patwardhan ) यांनी लिहिली असून नेमकी ती कशी सूचली, रामायण हाच कथानकाचा भाग असावा असं का वाटलं अशा अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांनी Unfiltered गप्पा मारत दिल्या.
शिक्षणामुळे एखाद्या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. पण, तो बिघडूही शकतो, याचं उत्तम सादरीकरण करणारा चित्रपट म्हणजे ‘छबिला’. अनिल भालेराव दिग्दर्शित आणि लिखित ‘छबिला’ हा चित्रपट 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ‘इफ्फी’च्या ‘फिल्म बाजार’ या विभागात लक्षवेधी ठरला. ‘लमाण’ या समाजाविषयी फारशी लोकांना माहिती नसेल. खाणीतील दगड फोडून आपला उदरनिर्वाह करणारा अगदी अल्पसंख्याक असा हा लमाण समाज. शिकल्या-सवरलेल्या समाजाने त्यांना कायमच दूर ठेवल्यामुळे त्यांच्या मानसिक, आर्थिक, शारीरिक अडचणी कोणी जाणून घेतल्या
(ED) सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने देशविरोधी ‘व्होट जिहाद’चा कणा मोडून मालेगाव, नाशिक आणि मुंबईसमध्ये छापेमारी केली आहे. यावेळी ‘व्होट जिहाद’साठी वापरण्यात येणाऱ्या १२५ कोटी रुपयांच्या बेनामी व्यवहारांचा बुरखा फाडण्यात आला आहे
राज्याच्या पोलिस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या पदावर कोणाची नियूक्ती होणार? अशी चर्चा सुरु असताना आता संजय वर्मा यांची वर्णी लागली आहे.
राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. विरोधकांकडून वारंवार त्यांच्या बदलीची मागणी करण्यात येत असताना आता केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांची बदली कोणत्या ठिकाणी केली याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक गुरुप्रसाद यांचा रविवार दिनांक ३ नोव्हेंबर २०२४ रोजी दुर्दैवी अंत झाला. बंगळुरू येथील त्यांच्या फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. वयाच्या ५२व्या वर्षी त्यांचे निधन झाले असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन-तीन दिवसांपूर्वीच त्यांनी आत्महत्या केली असा अंदाज आहे. ‘एडेलू मंजुनाथ’ आणि ‘डायरेक्टर्स स्पेशल’ अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन गुरुप्रसाद यांनी केले.
जगभरातील संगीतप्रेमींसाठी एक धक्कादायक बातमी आहे. लोकप्रिय 'वन डायरेक्शन' या बँडचा गायक लियाम पायने याचा हॉटेलमध्ये मृत्यु झाला. अर्जेंटीना देशातील ब्यूनस आयर्स शहरात लियाम पायने येथे गायकाचा दुर्दैवी अंत झाला. मिळालेल्या माहितीनुसार हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीमधून कोसळत लियामचा मृत्यू झाला. वयाच्या ३१ व्या वर्षीं त्याचा मृत्यू झाला असून लियामच्या अकस्मान निधनाने जगभरातील संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, घडलेल्या घटनेचा सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
Phullwanti : निमित्ताने दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या स्नेहल प्रवीण तरडेंशी खास गप्पा
पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनात 'पब्लिक ट्रस्ट बिल २.०' मांडले जाऊ शकते, असे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले. वाणिज्य मंत्रालय 'पब्लिक ट्रस्ट बिल २.०' वर काम करत असून पुढील वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक संसदेत सादर केले जाण्याची शक्यता आहे, असेही केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले.
हरहुन्नरी नाट्य दिग्दर्शक, लेखन आणि अभिनेते योगेश सोमण यांनी आजवर आपल्या लिखाण आणि अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. १९८७ पासून त्यांची रंगभूमीशी जोडलेली नाळ आजही कायम आहे. त्याचा हाच कलाप्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न दै. मुंबई तरुण भारतने केला आहे. यावेळी त्यांनी अभिनयाबद्दल त्यांचे स्पष्ट मत देखील मांडले.
देशांतर्गत पर्यटनवाढीसाठी सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येत असते. मागील पाच महिन्यांच्या कालावधीत परदेशी पर्यटकांच्या आगमनात मोठी वाढ दिसून आली आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांच्यामुळे कुणाला मार खावा लागला असेल यावर तुमचा विश्वास बसतो का? नाही ना. पण खरंच असं घडलं होतं. '12th फेल' या चित्रपटाचे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी एकदा अमिताभ बच्चन यांना ४ कोटी रुपयांची रोल्स रॉयस भेट दिली होती. आणि त्यानंतर काय घडलं होतं याचा किस्सा त्यांनी शेअर केला आहे. २००७ साली विधू विनोद चोप्रा यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'एकलव्य: द रॉयल गार्ड' या चित्रपटात काम केले होते. कमी बजेटमुळे त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासाठी ६५ हजार रुपयांची रुम बुक
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी सोहळा लवकरच रंगणार असून या चित्रपटसोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ चित्रपट निर्माते शेखर कपूर यांची निवड करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी गोव्यामध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ५५व्या आणि ५६व्या आवृत्तीसाठी कपूर महोत्सव प्रमुख असणार आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टीतील कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शिका फराह खान आणि दिग्दर्शक साजीद खान यांच्या आईचं निधन आहे. त्यांच्या आईचे नाव मेनका असं होतं. मेनका या बालकलाकार हनी इराणी आणि डेसी इराणी यांच्या बहिण होत्या. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
प्रा. डॉ. शिवाजी सरगर यांची मुंबई विद्यापीठ सेंटर फॉर डिस्टन्स अॅण्ड ऑनलाइन लर्निंगच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवार, दि. 12 जुलै रोजी ते संचालकपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. डॉ. शिवाजी सरगर हे गेली 30 वर्षे अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी गेली 10 वर्षे मुंबई विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
अभिनेत्री-दिग्दर्शिका श्वेता शिंदे हिच्या साताऱ्यातील घरी ३ जून २०२४ रोजी चोरी झाली होती. त्या चोरीचा छडा लालण्यात सातारा पोलिसांना यश आले. या चोरट्याकडून पोलिसांनी १३ लाख ३१ हजारांचे १८ तोळे वजनाचे सोन्याचांदीचे दागिने जप्त केले आहेत. दरम्यान, ज्यावेळी चोरी झाली तेव्हा घरात कुणी नसल्याचे श्वेताने पोलिसांना सांगितले होते. त्या नुसार दाखल केलेल्या तक्रारीचा तपास पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना तपास करण्याचे आदेश दिला
नवनिर्वाचीत भाजप खासदार कंगना राणावत हिच्यासोबत चंदीगढ विमानतळावर सीआयएसफमध्ये काम करणाऱ्या एका महिला कॉन्स्टेबलने गैरव्यवहार केला होता. खासदारासोबत अशी गैरवर्तणूक करणाऱ्या सीआयएसएफ कुलविंदर कौर यांना नोकरीवरुन काढून टाकले आहे. तसेच, या प्रकरणानंतर कंगनाच्या पाठिशी अनेक लोकं उभी राहिली आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर आणि कंगना यांच्यातील वादंग सर्वांनाच माहित आहेत. पण वाद आणि भांडण बाजूला ठेवून करण जोहर यांनी कंगनाच्या समर्थनात प्रतिक्रिया दिली आहे.
महावितरणकडून शेतीसाठी सौर ऊर्जेचा देशात सर्वाधिक वापर करण्यात येणार असून यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत वीज पुरवठा मिळणार असून औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांवरील सबसिडीचा बोजा कमी होईल. स्वस्त सौर ऊर्जेमुळे वीज खरेदीच्या खर्चात मोठी बचत होऊन सर्वच वीज ग्राहकांचे वीज दर मर्यादित राखण्यात मदत होईल.
सीमाशुल्क, राज्य पोलीस विभाग, केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय), इमिग्रेशन यांसारख्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या प्राधिकरणांकडून अधिकारी आणि सरकार मंत्रालयातील अधिकारी असल्याचा दावा केला करत नाविक, खलाशी किंवा कुटुंबातील सदस्यांकडून फसव्या बहाण्याने पैसे मागण्याच्या काही घटना निदर्शनात आल्याने पत्तन, पोत आणि जलमार्ग मंत्रालय, केंद्र सरकार आणि नौवहन संचानालय, मुंबई यांनी एक ऍडव्हायजरी जारी केली आहे. ज्याद्वारे अशा फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी खलाशी आणि त्यांच्या कुटुंबियांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना करण्
हिंदीं चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन (Sangeeth Sivan) यांचे बुधवार दिनांक ८ मे रोजी रात्री निधन झाले. वयाच्या ६१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. संगीत सिवन यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीतील कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट असून गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. सिवन (Sangeeth Sivan) यांनी त्यांच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीत क्या कुल है हम, अपना सपना मनी मनी असे अनेक विनोदी चित्रपट दिग्दर्शित केले होते.
हिंदी आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन झाले. त्याच्या निधनामुळे मनोरजंनसृष्टीत शोककळा पसरली असून कलाकारांकडून शोक व्यक्त केला जात आहे. सिवन यांच्या निधनामुळे अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) प्रचंड दु:खी झाला असून त्याने अत्यंत भावूक पोस्ट सिवन यांच्यासाठी केली आहे.
भारताला चित्रपट हे मनोरंजनाचे माध्यम देऊ करणाऱ्या चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची आज जयंती. दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांनी १९१३ साली भारत देशाला पहिला कृष्णधवल मुकपट ‘राजा हरिश्चंद्र’ चित्रपट दिला. त्यांनी त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीत ९० पेक्षा अधिक चित्रपट दिग्दर्शित, निर्मित केले. आज दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांच्या जयंतीदिनी जाणून घेऊयात त्यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट कसा तयार केला होता.
भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आणि दिग्दर्शक-अभिनेते-निर्माते महेश कोठारे यांच्यात एक समान धागा असून त्याबद्दल महेश कोठारे यांनी ‘महाएमटीबी’च्या Unfiltered गप्पा with कलाकारच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली असता माहिती दिली. सध्या ‘झपाटलेला ३’ चित्रपटामुळे महेश कोठारे (Mahesh Kothare) चर्चेत असून याही चित्रपटात कोणती नवी टेक्नॉलॉजी पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
सिडकोने बेलापूर व वाशी येथे दिलेल्या सार्वजनिक वाहनतळ भूखंडावर आता सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्वावर (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप - पीपीपी) बहुमजली (मल्टीस्टोरीड) वाहनतळासोबत वाणिज्य संकुल (कमर्शिअल कॉम्फ्लेक्स) उभारण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्याकरिता या दोन्ही भूखंडाचा वापर बदल करण्याकरिता महापालिकेने गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात सिडकोकडे ना हरकत (एनओसी) प्रमाणपत्र मागितले होती.
भारताच्या थेट कर संकलनात (Direct Tax Collection) १७.७ टक्क्याने वाढ झाली आहे. तज्ञांनी अपेक्षित केल्यापेक्षाही कर संकलनात वाढ झालेली आहे. वैयक्तिक आयकर संग्रहणात ५०.०६ टक्क्यांहून ५३.३ टक्क्यांवर ही वाढ झाल्याने थेट कर संकलनात ही वाढ झाली आहे. मात्र कॉर्पोरेट कर संकलनात ४९.६ टक्क्यांवरून घट होत ही ४६.५ टक्क्यांने संकलन झाले आहे.
मुंबई महानगरपालिकेने शहरातील तुटलेली दिशादर्शक फलक काढून, त्या ठिकाणी नवीन फलक बसवण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही ठिकाणी नव्याने दिशादर्शक फलक व वाहतूक चिन्हे बसवण्यात येणार आहेत.
आई सोबत असली की, आयुष्यात कितीही संकटे आली किंवा कोणतीही अडचण आली, तर तिचा सामना करण्यासाठी आपल्या मनगटात बळ असते. आई आणि मुलीचे किंवा मुलाचे नाते, हे शब्दांपलीकडे असते. आपल्या बाळाने मनातील एखादी गोष्ट जरी सांगितली नाही, तरीही नकळतपणे ती समजून त्यावर उपाय सांगणारी हक्काची मैत्रीणदेखील आईच! आजवर अनेक चित्रपटामंध्ये आई-मुलीचे नाते फार वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्यात आले आहे. पण, आजची तरुण पिढी आणि त्यांच्या पालकांमधील भावनिक, मानसिक नाते मोठ्या पडद्यावर तसे क्वचित पाहायला मिळते. पण, ‘माय लेक’ या चित्रपटातून दि
अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) दिग्दर्शित आणि अभिनित ‘संगीत मानापमान’ या चित्रपटाचे पहिले पोस्ट गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमध्ये सुबोध भावे (Subodh Bhave) एका वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहेत. शिवाय त्याच्या पेहरावामुळे या चित्रपटाची भव्यता झळकून येत आहे.