(Priyanka Chaturvedi on SpiceJet Holi Celebration) देशभरात १४ मार्चला धूलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान १३ मार्चला राजधानी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानातील प्रवाशांनादेखील होळीचा आनंद लुटण्याची संधी मिळाली. स्पाईस जेटच्या क्रू मेंबर्सकडून प्रवाशांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, उबाठा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी या सगळ्यावरुन स्पाइस जेटवर निशाणा साधत टीका केली आहे.
Read More
फडणवीस कुटूंबियांनी साजरी केली होळी अमृता फडणवीस या आपल्या गाण्यासाठी व राजकीय वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. होळीनिमित त्यांनी सर्वांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. सोबत सहकुटूंब फोटोही सोशल मीडिया साईट्सवर शेअर केल्या आहेत. आपल्या पोस्टमध्ये त्या म्हणतात,
राज्यात कोरोनाची दुसरी लाट अधिक वेगाने फैलावत आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात होळीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी निर्बंध अधिक कडक करण्यात येत आहेत.
होळीनंतर पाच दिवसांनी येणारा रंगपंचमीचा सण नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. नाशिकमध्ये असलेल्या रहाड संस्कृतीमुळे या रंगांच्या सणाची रंगत अधिकच खुलत असते. त्यातच शनी चौक, दिल्ली दरवाजा, तांबट लेन व तिवंधा येथील रहाड हे तर नाशिकचे भूषण म्हणून प्रसिद्ध आहेत.
होळी व धूलिवंदन हा देशातील प्रमुख सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीच्या पहिल्या दिवशी होळी दहन केली जाते तर दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धूलिवंदन असे म्हटले जाते.
अनोख्या रंगोत्सवाची सुरुवात कृष्णपूजन करून होणार असून त्याचसोबत कृष्णभजन, कृष्णराधा नृत्य, गोफ, गाणी आणिविशेष उपस्थित असणाऱ्या सेलिब्रिटीबरोबर गप्पा असा भरगच्च कार्यक्रम धुळवडीनिमित्त डोंबिवली येथे आयोजित करण्यात आला आहे.
शहरांत कोणतेही अचूक प्रकार होऊ नये यासाठी शरातील प्रमुख नाक्यांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.