(Supriya Sule) "गौरव तुम्ही माझ्या फोनचे उत्तर का देत नाही, आता निवडणूका घोषित झाल्या आहेत. आम्हाला बिटकॉईन तातडीने हवे आहेत. आता बिटकॉईनची जी किंमत आहे त्यानुसार त्याला चांगली किंमत मिळणार आहे. तुमच्याकडे बिटकॉईनची रोख रक्कम तुमच्याकडे आहे. मला पैसे हवे आहेत, गुप्ता कुठे गायब आहे. मला माहिती नाही पैशांची गरज आहे," राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या आवाजाशी साधर्म्य असलेल्या एका ऑडिओ क्लीपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
Read More
(Ajit Pawar) बारामतीमध्ये काटेवाडी येथे बुधवारी सकाळी सातच्या दरम्यान मतदानाचा हक्क बजावल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सुप्रिया सुळेंच्या कथित ऑडिओ क्लिपबद्दत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, "सदर ऑडिओ क्लिपमध्ये ज्या दोन लोकांचे आवाज ऐकू येत आहेत. त्यांना मी ओळखतो. एक आवाज माझ्या बहिणीचा आहे. तर दुसरा आवाज विधानसभेतील माझ्या एका सहकाऱ्याचा आहे. या सहकाऱ्याने आमच्याबरोबर महाविकास आघाडीत काम केले होते. या प्रकरणाची सरकारकडून चौकशी केली जाईल. त्यान
मुंबई : काँग्रेस नेते नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी परदेशी चलन बिटकॉईनचा वापर केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घोटाळ्याची तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर ( Pravin Darekar ) यांनी बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी केली.
‘तो आवाज तुमचा नाय.’ ज्यांनी तुमच्यावर आरोप केला, त्यांच्यावर तुम्ही अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार. हं पण, तुमचे ‘एकच वादा अजितदादा’ तर म्हणाले, “हा आवाज आमच्या तायडीचाच.” ‘एक अकेला देवेंद्र क्या करेगा’ म्हणणारे देवेंद्र फडणवीस म्हणालेत की, “आरोप गंभीर आहेत आणि त्याची गंभीरपणे चौकशी झाली पाहिजे.” ताई अहो ताई, हे ‘बिटकॉईन’ काय असते, कसे असते, तुम्ही जरा सांगाल का?
बिटकॉईनमध्ये विक्रमी वाढ होत नव्या उच्चांकाला बिटकॉईन पोहोचले आहे. या उलथापालथीच्या काळात क्रिप्टो करन्सी (Crypto Currency)वरील विश्वास वृद्धींगत होताना दिसत आहे. जागतिक पातळीवर बिटकॉईनमध्ये वाढलेली समाजमान्यता पाहता परदेशातही मोठ्या प्रमाणात बिटकॉईनमध्ये व्यवहाराचे प्रमाण वाढले आहे. संस्थात्मक गुंतवणूकदार व इथेरेयुम (Ethereum) मधील विकसितता यामुळे बाजारात यांचा परिणाम होत बिटकॉईनमध्ये विक्रमी वाढ होत त्यांचे मूल्य ७०००० डॉलरवर पोहोचला आहे..
बिटकॉइनमध्ये दोन वर्षांनंतर वाढ झाली आहे. यावेळी बिटकॉइनमध्ये वाढ ५०००० डॉलर ( सुमारे ४१५०२५० रूपये) झाली असून बिटकॉइने बाजारात पुनरागमन केले आहे असे म्हणायला वाव आहे.याआधी बिटकॉइनने किंमतीत उसळी मारत ५०३७९ डॉलर पर्यंत बिटकॉइन गेला होता. किंमतीबाबत संवेदनशील म्हणून क्रिप्टोकरन्सी कडे पाहिले जाते. बाजारात बदल होत बिटकॉइनने ही मोठी मजल मारली आहे. मिडिया वृत्तानुसार सिंगापूर येथे डिजिटल असेटचा आज सकाळी ४९९६० डॉलरचा व्यवहार झाला आहे. शेवटी दरात नोव्हेंबर २०२१ मध्ये वाढ होत १९००० डॉलर पर्यंत बिटकॉइन गेला होता.
दसरा मुहूर्तावर क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये नवचैतन्य दिसले आहे. त्यातच बिटकॉइन चलनात में २०२२ नंतर प्रथमच ३५००० डॉलर हून अधिक चलनाची ट्रेडिंग पार पडली आहे. १८ महिन्यातील आकड्यांचे हे सर्वात जास्त भावाची नोंदणी बिटकॉइनने केली आहे. मार्केटमध्ये अमेरिका बिटकॉइन ला व्यापार चलनाचा दर्जा देऊ शकते अशी वावटळ बाजारात उठली आहे. तसे झाल्यास या दरात अजून देखील तेजी येऊ शकते.
सामाजिक कार्य करणे ही बरेचदा ‘फॅशन’ बनत चालली आहे की काय, इतकी ती सपक झालेली दिसते. सामाजिक कार्याच्या नावाखाली अनेकदा चुकीच्या गोष्टी केल्या जातात. याच चुकीच्या गोष्टींना टाळून त्यातून सामाजिक संस्था आणि देणगीदार यांना एकत्र एका मंचावर आणून त्यांचे काम सुलभ करण्यासाठी, तसेच या संपूर्ण व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणून देणगीदारांना त्यांनी दिलेल्या देणगीचे सार्थक होत आहे, हे समाधान मिळवून देण्याचे काम आपल्या ‘टेकपोज’ या ‘स्टार्टअप’मधून केले आहे सुश्मिता कनेरी यांनी. त्यांच्याविषयी...
" बिटकॉइन , इथेरियम किंवा एनएफटी सारख्या क्रिप्टोकरन्सीला भविष्यात कधीही अधिकृत चलनाचा दर्जा मिळणार नाही " असे केंद्रीय मुख्य अर्थसचिव टी. व्ही. सोमनाथन यांनी स्पष्ट केले आहे
‘क्रिप्टोकरन्सी’, ‘बिटकॉईन’ हे एरवी कधी कानावरही न पडणारे शब्द एव्हाना अगदी लहानांपासून ते मोठ्यांच्याही परिचयाचे झालेले दिसतात. परंतु, हे प्रत्यक्ष चलनासारखे चलन नसून आभासी चलन आहे, यापलीकडे या विषयातील फारशी माहिती अद्याप बर्याच भारतीयांना नाही. त्यामुळे योग्य माहितीच्या अभावी आणि दिशाभूल करणार्या जाहिराती आणि मार्गदर्शकांमुळे तरी कित्येकांंची उत्सुकतेपोटी पावले या आभासी चलनाकडे वळलेली दिसतात. तेव्हा, नेमके हे ‘क्रिप्टोकरन्सी’चे आभासी मायाजाल आहे तरी काय, याचा अगदी सोप्या शब्दांत आढावा घेणारा हा लेख...
बिटकॉईनची किंमत ६२ हजार डॉलर्सच्या पार पोहोचली आहे. सध्या ६२ हजार ७० डॉलर्स इतकी उसळी घेऊन ट्रेड करत आहे. यापूर्वीच बिटकॉईनने ६० हजारांचा पल्ला गाठला होता. एप्रिल २०२१मध्ये बिटकॉईनची किंमत इतकी वाढली होती.
हॅकर्सकडून बिटकॉइनची मागणी
ट्विटरकडून अद्याप प्रतिसाद नाही
बिटकॉईनसारख्या आभासी चलनांवरील बंदी उठवावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी देताना या चलनावरील बंदी उठवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. बुधवारी या प्रकरणी सुनावणी झाली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने आपले मत मांडले आहे. आभासी चलनाद्वारे व्यवहार करण्यास परवानगी देण्यात येईल, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.