देशातील पहिले वनवासी कार्बन न्यूट्रल गाव भिवंडी तालुक्यात उभारण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राजमंत्री गिरीराज सिंह यांच्यासमोर प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आल्यानंतर, त्यांनी प्रकल्पाला निधी देण्याचे जाहीर केले आहे. पहिले वनवासी गाव कार्बन न्यूट्रल करण्यासाठी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. जम्मूमधील पल्ली गाव हे देशातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव झाले आहे. या गावात सौरऊर्जेचावापर केला जात असून, ग्रामपंचायतीतील सर्व रेकॉर्ड डिजिटल आहेत.
Read More