"सायबर ग्रुप एचओएएक्स 1337" आणि "नॅशनल सायबर क्रू" सारख्या पाकिस्तान-पुरस्कृत हॅकर गटांनी गुरुवारी भारतातील काही संकेतस्थळे हॅक करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. सायबर सुरक्षा यंत्रणांनी हे हॅकिंग प्रयत्न त्वरित ओळखले आणि निष्क्रिय केले आहेत.
Read More
(Pakistan Cyber Attack) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या सायबर सुरक्षेलाच आव्हान देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पाकिस्तानी हॅकर्सकडून भारताच्या सायबरस्पेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र त्यात पाकिस्तानला अपयश आले आहे.
Israel-Iran War : युद्धभूमीवर न उतरता इस्त्रायलनं इराणला चितपट कसं केलं?
गेल्या काही दिवसांत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) प्रगतीचे नवनवीन शिखर गाठत असतानाच आता इस्त्रोकडून एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. इस्त्रोवर दररोज १०० हून अधिक हल्ले होत असल्याची माहिती पुढे आली आहे. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी ही माहिती दिली आहे.
भारताने लष्करी ड्रोनच्या देशांतर्गत उत्पादकांना चीनमध्ये बनवलेले घटक वापरण्यास मनाई केली आहे. रॉयटर्सने पाहिलेल्या दस्तऐवज आणि चार संरक्षण आणि उद्योग अधिकार्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलिकडच्या काही महिन्यांत हे सुरक्षेच्या कारणास्तव केले गेले आहे.
दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात ‘एम्स’च्या सर्व्हरमध्ये आलेला तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, ही घटना म्हणजे ‘सायबर हल्ला’ असल्याचा आणि हॅकर्सद्वारे खंडणी मागितल्याचा दावा तथ्यहीन असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.
पूर्व भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या विधानाचे पडसाद अद्याप उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्यात चक्क ‘सायबर’ हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
युद्ध म्हटलं की, वित्तहानी आणि जीवितहानी ही अटळ! सायबरयुद्धाच्या या नव्या युद्धनीतीमध्ये, तर शत्रूची अपरिमित ‘डिजिटल’ हानी करण्याचे सामर्थ्य! त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही नख लावण्याचे उद्योग सायबर युद्धखोरांमार्फत सध्या जोमात आहेत. याला बलाढ्य रशियाही अपवाद नाही आणि युद्धग्रस्त युक्रेनही. दोन्ही देशांच्या सायबर फौजांनी युद्धारंभ झाल्यापासून सायबर हल्ल्यांनीही एकमेकांना चोख प्रत्युत्तर देण्याची रणनीती अवलंबलेली दिसते. त्यामुळे यापूर्वीचे जागतिक संघर्ष आणि सध्याचे रशिया-युक्रेन युद्ध यामध्ये हा मूलभूत फ
चीनने इस्रायलवर आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर अटॅक केला आहे. चीनने आधी कधीही इस्रायलवर सायबर अटॅक केला नव्हता. भारत आणि इतर देशांवर हे आक्रमण केले गेले आहे,परंतु पहिल्यांदा चीनने इस्रायलवर हे आक्रमण केले आहे.चीनवर याआधी सायबर अटॅकचे आणि हॅकिंगचे आरोप आहेत. मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या एक्सचेंज सर्वर हॅक केल्याचा फार मोठा आरोप चीनवर आहे. जो बायडेन या बाबतीत चीनवर क्रोधीत आहेत,तसेच चीनने या अशा कारवाया लवकर बंद कराव्या अशा सूचनाही त्यांनी चीनला वारंवार दिल्या होत्या.
आजच्या डिजिटल युगात आपले बहुतांश व्यवहार हे ऑनलाईन पार पडतात. पण, हल्ली या ऑनलाईन व्यवहारांमध्ये फसवणुकीचे प्रमाणही तितकेच वाढलेले दिसते. तेव्हा, या सायबर गुन्ह्यांपासून एकूणच सावध कसे राहायचे, नेमकी काय खबरदारी घ्यायची, यासंबंधीची माहिती आजपासून दर रविवारी आपण ‘सायबर सुरक्षा’ या नवीन लेखमालिकेतून वाचकांसमोर मांडणार आहोत. आज या लेखमालिकेच्या पहिल्या भागात जाणून घेऊया 'फिशिंग’विषयी...
जसा ‘सर्जिकल स्ट्राईक’ आपण काश्मीरमध्ये केला होता, अशाच प्रकारचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ सायबर लढाईमध्ये चीनवर वेळोवेळी करण्याची गरज आहे. त्यांना हे दाखवून देणे महत्त्वाचे आहे की, जर तुम्ही आमच्यावर हल्ला करून आमच्या ‘क्रिटिकल इन्फॉर्मेशन अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर’ला धोका निर्माण केला, तर त्यापेक्षासुद्धा मोठा धोका आम्ही तुमच्या ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ला निर्माण करून तुमचेसुद्धा नुकसान करू शकतो, म्हणून असा हल्ला करायची हिंमत करू नका.
सर्व्हर हॅक करुन मोठी रक्कम गिळंकृत करणे, हाच या सायबर हल्ल्यांचा प्रमुख हेतू असला तरी एखाद्या देशाची माहिती-तंत्रज्ञान यंत्रणाच खिळखिळी करण्यासाठीही या सायबर हल्ल्यांचे प्रमाण सध्या वाढले आहे. तेव्हा, आपले युद्ध अजून सुरुच आहे. तेव्हा सतर्क राहा आणि सुरक्षित राहा!
तुम्हाला आकर्षित करणारा किंवा आर्थिक प्रलोभन देणारा विषय [Email Subject] असलेला इमेल पाठवला जाईल.जसे की फ्री कोविड टेस्ट, फ्री कोविड-१९ किट (Free Covid Test, Free Covid-१९Kit) त्या इमेल मध्ये काही लिंक क्लिक करण्यासाठी किंवा अटॅचमेंट डाऊनलोड करण्यासाठी सांगितले असेल. हा खोटा इमेल covid2019@gov.in / ncov2019.gov.in अश्या प्रकारच्या खोट्या सरकारी इमेल वरून पाठवल्याचे भासवले जाऊ शकते.
सरकारसह खासगी क्षेत्रांना केले लक्ष्य
अमेरिका आणि चीन या जगातील दोन आघाडीच्या अर्थव्यवस्थांमधील व्यापारयुद्ध हा आता नवीन विषय राहिला नाही. रोज याबाबत आपण काही ना काही ऐकत असतो. अशीच एक घटना अमेरिका आणि चीन यांच्या या व्यापारयुद्धात घडली आणि जगातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेली 'हुवावे' ही कंपनी यात भरडली गेली.
अमेरिका-चीन व्यापारयुद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या आणीबाणीच्या निर्णयाकडे दुधारी अस्त्र म्हणूनच पाहता येईल. कारण, एकीकडे राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून दुसरीकडे चीनला व्यापारीदृष्ट्या शह देणारी ही ट्रम्प यांची खेळी म्हणावी लागेल.
भारतीय जनता पक्षाचे संकेतस्थळ मंगळवारी सकाळपासून ठप्प झाली असून संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर एक संदेश झळकतो आहे. या संदेशामुळे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत संकेतस्थळ हँक झाले असल्याची चर्चा होत आहे.
सराय रोहिल्ला या दिल्लीतील पंजाब नॅशनल बॅंकेच्या शाखेवर शनिवारी सायबर हल्ला झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
कोट्यवधींची संपत्ती काही सेकंदात हडप करणार्या सायबर हल्लेखोरांची ताकद गेल्या काही दिवसांत वाढत चालल्याचे चित्र आहे. सायबर हल्ले होण्याच्या प्रमाणावर देशाचा जगात २१ वा क्रमांक आहे.
भारतीय जनता पक्षाचे गोवा राज्यातील संकेतस्थळ ‘हॅक’ करण्यात आले आहे. हॅक करणाऱ्यांनी पाकीस्तान जिंदाबाद या आशयाचा मजकूर वेबसाईटवर लिहीला आहे. सोमवारी दि. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.
कॉसमॉस बँक दरोडा प्रकरणी क्राईम सेलच्या गुन्हे शाखाने दोघांना औरंगाबाद आणि नांदेड येथून अटक करण्यात आली आहे.
हल्लीचे दरोडेखोर संगणकाच्या माध्यमातून नवनवीन प्रकारे लूट करत आहेत. त्यासाठी त्यांनी बँकेमध्ये जाणे गरजेचे नाही.