ठाणे येथील बाळकुम ते गायमुख या १३.४५ कि.मी. लांबीच्या खाडी किनारा मार्गाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आलेले असून या कामाची एकूण किमंत रू.३,३६४.६२ कोटी इतकी आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी १३.४५ कि.मी. असून यातील ६.६४ कि.मी. लांबी करिता पर्यावरण विभागाच्या परवानगीची आवश्यकता नाही. त्यामुळे या लांबीकरिता काम सुरु करण्यास कोणताही अडथळा नाही, अशी माहिती राज्य सरकारने विधानसभेत दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
Read More
उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी' (बीएनएचएस) आणि वन विभागाच्या 'कांदळवन प्रतिष्ठान'मध्ये सामंजस्य करार झाला आहे. (thane creek mudflat)
ठाणे पोलीस आयुक्तालयासमोर कळवा खाडी पात्रातील अतिक्रमण ठाणे महापालिकेने काही दिवसांपूर्वी निष्कासित केले होते. या मोकळ्या झालेल्या जागेवर निसर्ग उद्यान वॉकिंग पथ आणि दशक्रिया विधी घाट उभारावे. अशी मागणी ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने आमदार संजय केळकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
ऑगस्ट महिन्यात ठाणे खाडीला रामसर पाणथळ स्थळाचा दर्जा मिळणार, असे जाहीर झाले होते. त्याप्रमाणे आज ठाणे खाडीला 'रामसर पाणथळ स्थळाचे प्रमाणपत्र' प्राप्त झाले आहे. ठाणे खाडीसह इतर २८ नवीन स्थळांचा ‘रामसरमध्ये समावेश करण्यात आला आहे. या 28 स्थळांना यामुळे आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वाच्या पाणथळ प्रदेशावरील आधारित ‘‘रामसार’ अधिवेशना’चे २०२२ हे पन्नासावे वर्ष आहे. पानथळ अधिवासाचे महत्व आणि ‘रामसार’ प्रकल्पांबाबतच्या इतिहासाची उहापोह करणारा हा लेख..
'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्या'च्या 'पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रा'ला (इएसझेड) केंद्र सरकारने अंतिम मंजूरी दिली आहे. ४८.३०५ चौ.किमी विस्तार असलेल्या या अभयारण्याचे इएसझेड क्षेत्राची अंतिम अधिसूचना मंगळवारी प्रसिद्ध झाली. या अधिसूचनेमुळे रखडलेल्या बांधकामांना दिलासा मिळाला आहे.