‘प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह’ योजनेअंतर्गत देशातील उत्पादन क्षेत्राला चालना देण्यात आली. ही योजना विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याबरोबरच रोजगाराच्या संधीही निर्माण करत आहे. म्हणूनच जागतिक पातळीवर भारत प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून उदयास येत आहे. आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याबरोबरच ‘मेक इन इंडिया’ला बळ देणारी, ही योजना म्हणूनच ‘गेम चेंजर’ ठरली आहे.
Read More
भारतातील आर्थिक व विकासात्मक धोरणे ठरवणारी संस्था नीती आयोग म्हणून ओळखली जाते. यातच निती आयोगाने एक नवीन निर्णय घेतला आहे. भारतातील उभरत्या नव्या क्षेत्रांचा उलगडा नीती आयोग करणार आहे. जागतिक पातळीवर स्पर्धा करणाऱ्या भारतातील या क्षेत्राला ' ग्लोबल मॅन्युफॅकचरिंग हब ' बनवण्याचे निती आयोगाने ठरवले आहे. या महत्वाच्या सेक्टरवर लक्ष केंद्रित करत त्यानुसार प्रगतीसाठी सकारात्मक रणनीती व धोरणे आखण्याचे नीती आयोगाने ठरवले आहे.
जागतिक उत्पादन केंद्र म्हणून भारताची वाटचाल सुरु आहे. भारत-चीन बिघडलेले राजकीय संबंध तसेच चीनमधील अस्थिर परिस्थितीमुळे जगाची विस्कळीत झालेली पुरवठा साखळी याचा लाभ घेत भारताने उत्पादन क्षेत्राच्या वाढीसाठी योग्य त्या उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे. २०३० पर्यंत भारत हा आघाडीचा देश बनला असेल.
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर संसदेत जोरदार चर्चा सुरू आहे. अदानी कंपनीच्या शेअर्सच्या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत असताना, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी केलेल्या राजकीय हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारत आज समस्या सोडवण्याचे माध्यम बनत आहे. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात सांगितले होते की, एकेकाळी आपल्या बहुतेक समस्या सोडवण्यासाठी इतरांवर अवलंबून असलेला भारत आता जगाच्
‘कुशमॅन अॅण्ड वेकफिल्ड’च्या ‘ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग रिस्क इंडेक्स-२०२१’नुसार भारत चीननंतर दुसर्या क्रमांकावर पोहोचला आहे. गेल्या वर्षी अमेरिका दुसर्या, तर भारत तिसर्या क्रमांकावर होता. यंदाच्या क्रमवारीमुळे अमेरिका आणि आशिया-प्रशांत क्षेत्राच्या तुलनेत ‘मॅन्युफॅक्चरर्स’ भारताला अधिक पसंती देत असल्याचे स्पष्ट होते.