( Fraud work action against contractor ) ‘एम पश्चिम’ विभागातील लहान नाल्यातून गाळ काढण्याच्या कामात फसवेगिरी करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात मुंबई पालिका प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. गाळ उपसा कामात हलगर्जीपणा करून पालिकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी या कंत्राटदाराला तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. तसेच, त्याची महानगरपालिकेतील अभियांत्रिकी विषयक नोंदणी रद्द करण्यात आली आहे.
Read More
रॉयल्टी बुडवणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून याप्रकरणी दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करा, असे आदेश महसूल मंत्री बावनकुळे यांनी सोमवार, ७ एप्रिल रोजी दिले.
पूर्व द्रुतगती महामार्गावरील सेवा रस्ते वाहतूकयोग्य असावेत. त्यासाठी आवश्यक त्या सुधारणा योग्य ठिकाणी पुनर्पृष्ठीकरण करावे. पुनर्पृष्ठीकरण करताना सखल भागात पावसाचे पाणी साचणार नाही, याची खबरदारी बाळगावी. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. रस्त्यांच्या डागडुजीची कामे दिनांक ७ जूनपूर्वी पूर्ण करणे अनिवार्य, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले.
महाराष्ट्राच्या समृद्धीची रेषा ठरलेल्या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी राज्यातील वेगवान अशा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला नागपूरपासून पुढे गोंदियापर्यंत विस्तार करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते चंद्रपूर, नागपूर ते गोंदिया आणि भंडारा ते गडचिरोली महामार्गच्या तांत्रिक निविदा खुल्या केल्यानंतर मंगळवारी ‘एमएसआरडीसी’ने या प्रकल्पांसाठीच्या आर्थिक निविदा खुल्या केल्या आहेत.
एसआरएम कॉन्ट्रॅक्टर (SRM Contractor) आयपीओ बाजारात गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे. २६ ते २८ मार्चपर्यंत आयपीओचे बिडींग खुले राहणार आहे. या आयपीओची प्राईज बँड प्रति समभाग (शेअर) २०० ते २१० प्रति समभाग असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. या आयपीओत कमीत कमी ७० समभाग खरेदी करावे लागतील. एकूण ६२ लाख मूल्यांकन असलेले समभाग गुंतवणूकदारांसाठी वितरित केले जाणार आहेत ही प्राथमिक माहिती प्रसारमाध्यमांनी निश्चित केलेली आहे.
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात रोजंदारी करणाऱ्या मजुरांच्या झोपड्या जाळल्याची घटना समोर आली आहे. बाधित १२ झोपड्यांना आग लागल्याचा आरोप कंत्राटदार मोहम्मद रफिक याच्यावर आहे. त्यांच्याकडे थकबाकीची मागणी करणाऱ्या कामगारांना रफिकला जिवंत जाळायचे होते, असा आरोप आहे. पोलिसांनी एफआयआर नोंदवून रफिकला अटक केली आहे. ही घटना रविवारी, दि. १७ मार्च २०२४ घडली.
अयोध्येतील भव्य राम मंदिरात अरूण योगिराज यांनी साकारलेल्या रामललाच्या लोभसवाण्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली. आकर्षक आणि मनमोहक अशी रामललाची मूर्ती घडविणार्या शिल्पकार अरूण योगिराज यांच्या कलकौशल्याचे जगभरातून कौतुक झाले. मात्र, अयोध्येत पार पडलेला रामललाच्या भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद कर्नाटकातील काँग्रेस सरकारला झालेला दिसत नाही.
अॅपल कंपनीचा आयफोन वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. पुढील महिन्यात अॅपलचे अधिकृत (फ्लगशीप) स्टोअर मुंबईत सुरू होणार आहे. यामुळे अॅपलची सर्व उत्पादने थेट खरेदी करता येतील.अॅपल ही एक लोकप्रिय टेक कंपनी आहे. या कंपनीचे आयफोन आणि अन्य उपकरण वापरणे प्रत्येकाचे स्वप्न असते. अॅपलने अलिकडच्या काळात भारतीय बाजारपेठमध्ये गुंतवणूक वाढविण्यावर अधिक भर देण्यास सुरुवात केली असून त्यातुनच मुंबईत पहिले अधिकृत स्टोअर सुरू करण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शीख समुदायाविषयी विशेष स्नेह आहे. त्यांनी शीख समुदायासाठी आणि शीख धर्मासाठी खूप काही केले आहे. त्यामुळे आयएसआयच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या अमृतपालसारख्यांचा भारतीय शीखांशी कोणताही संबंध नाही, असे प्रतिपादन दल खालसाचे संस्थापक आणि माजी खलिस्तान समर्थक जसवंत सिंग ठेकेदार यांनी केले आहे.
मुंबई महापालिका प्रशासनाद्वारे महापालिका क्षेत्रातील सात ठिकाणांवर होऊ घातलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या किंमतीवरून सध्या मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झालेला आहे.
मुंबईतील पूर्व, पश्चिम आणि शहर विभागात महानगरपालिकेच्या रस्त्यावर वाहतूक सुविधा अंतर्गत दिशा नामफलकाच्या १५० कोटींच्या निविदाबाबत निश्चित करण्यात आलेल्या अटी व शर्ती विशिष्ट कंत्राटदार असलेले ‘आरपीएस इन्फ्रास्ट्रक्चर’ आणि ‘स्पेको इन्फ्रास्ट्रक्चर’ यांना लाभदायक असल्याने स्पर्धा होणार नाही.
मुंबई महापालिका २ लाख कोटी खर्च करते मग हे कुठे गेले? काय घडले या शहरात ? त्यामुळे आज मुंबईकरांची अवस्था ही हमें तो हादसोंने सांभाला है अशी झाली आहे अशी शब्दात भाजपा आमदार ॲड आशिष शेलार यांनी मुंबईकरांची व्यथा आज विधानसभेत मांडली
मुंबई महापालिकेच्या शाळांच्या स्वच्छतेचे कंत्राट असलेल्या गेल्या तीन वर्षांपासून नवीन कंत्राटदारांना देण्यात आलेलेच नसल्याचे समोर आले आहे
मनसेने भंडाफोड केल्यानंतर प्रशासनाला जाग
आजपासून मुंबई लोकलचे दरवाजे महिलांसाठी सरकारने खुले, तर मोेनो रेल्वे १८ ऑक्टोबरला आणि मेट्रो १९ ऑक्टोबरला रुळावर आली खरी. पण, या ‘लॉकडाऊन’च्या काळात मुंबईतील लोकलला पर्याय ठरु शकणार्या मेट्रो रेल्वे प्रकल्पांची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यानिमित्ताने मुंबईतील विविध मेट्रो मार्गांची प्रगती कुठवर आली आहे, त्याचा घेतलेला हा आढावा...
३ लाख ६२ हजार मेट्रिक टन गाळ गेला कुठे?
महापालिका कंत्राटदाराला मोजणार १२ कोटी
रस्तेघोटाळाप्रकरणी प्राप्तिकर विभागाकडून पालिकेतील कंत्राटदारांवर धाडी टाकल्या जात आहेत
बाजीगर, खिलाडी, बादशाह अशा अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये साकारल्या होत्या भूमिका
महापालिका क्षेत्रांमध्ये दरदिवशी निर्माण होणारा सुका कचरा उचलण्यासाठी महापालिकेच्यावतीने खासगी कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे.