चित्रपट एक माध्यम आहे. भाषेची अडचण न भासणारं एक सार्वत्रिक माध्यम. दृक्श्राव्य माध्यम म्हणतो आपण त्याला. पण, तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. एक सहज लक्षात न येणारी तिसरी बाजू म्हणजे अनुभव. तो अनुभव मूर्त नसतो. जे अमूर्त ते घडवण्याची कामगिरी दिग्दर्शक करत असतो. स्टॅनली कुब्रिक हा असाच एक दिग्दर्शक. चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यापूर्वी केवळ छायाचित्रे तो जमवत असे. यातून स्थळ निवड झाली की मगच चित्रीकरणाला सुरुवात होई. ‘परफेक्शनिस्ट’ म्हणून त्याला उगाच म्हणत नाहीत.
Read More