केंद्रीय वन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी राज्यातील २३६.८५ एकर वनजमीन वापरण्यास मान्यता दिली आहे. यामुळे बुलेट ट्रेनच्या कामाला आता महाराष्ट्रात गती मिळणे अपेक्षित आहे. वनजमीन वगळून, या प्रकल्पासाठी लागणरी ४२ टक्के जमीनीचे अधिग्रहण 'नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड' कडून आधीच पूर्ण झाले आहे. राज्यात सरकार बदलल्याने दोन-तीन वर्षे रखडलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती मिळाली आहे.
Read More
राष्ट्रीय हरित लवादने (एनजीटी) केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या पर्यावरण मंजुरीला आव्हान देणारी याचिका रद्द केली आहे. या आठवड्यात याबाबतचा निर्णय देण्यात आला. ही याचिका कोळी समाजातील एका नेत्याने २०१७ साली दाखल केली होती.