( Kumbh Mela Authority Act will be introduced like Uttar Pradesh Devendra Fadanvis) “उत्तर प्रदेशातील प्रयागराजच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरणाचा कायदा लवकरच अमलात आणला जाईल,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच, “त्र्यंबकराजाच्या अंगणातील सिंहस्थ कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी धार्मिक, सामाजिक आणि पर्यावरणाला चालना देण्यासाठी विकास आराखड्यात समाविष्ट करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील कामांना मंजुरी घेऊन सुरुवात करा. यासोबतच ही कामे गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार होतील याचीही दक्षता घ्या.
Read More
मुंबईतील जुन्या ब्रिटिशकालीन पुलांचे आता १०० वर्षांहून अधिक आयुर्मान झाले आहे. त्यामुळे भविष्यकालीन वाहतूक व्यवस्था सामावून घेणार्या आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यावर राज्य सरकार लक्ष केंद्रित करत आहे. मागील लेखात आपण मुंबईच्या दादर, भायखळा, रे रोड आणि घाटकोपर येथील रेल्वेमार्गावरून जाणार्या पूल प्रकल्पांचा आढावा घेतला. याच लेखमालिकेच्या दुसर्या भागात आज आपण ‘एल्फिन्स्टन रोड आरओबी प्रकल्पा’चा आढावा घेऊया.
मुंबई महानगरात एसआरए योजना कशी राबवावी? याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (मुंबई क्षेत्र वगळून), ठाणे पराग सोमण यांच्याशी दै. मुंबई तरुण भारतने साधलेला संवाद.
सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड (एससीएलआर) विस्तार प्रकल्पाने नुकताच एक माईलस्टोन गाठत महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. एससीएलआर विस्तार टप्पा १मध्ये वाकोला फ्लायओव्हरवरील २१५ मीटर ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक (ओएसडी) स्पॅनच्या यशस्वी लाँचिंगसह एक महत्त्वाचा टप्पा पार केला.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत बुधवार,दि.१२ फेब्रुवारीला एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला. या प्रकल्पाअंतर्गत धारावीतील तब्बल ५० हजारहून अधिक घरांचे प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या इतिहासातील आजवरचे हे सर्वांत मोठे सर्वेक्षणाचे कार्य आहे.
धारावीकरांचा संभ्रम दूर करण्यासाठीच नावात बदल : एनएमडीपीएल
Mumbai Port ‘मुंबई बंदर प्राधिकरण’, ‘द हेरिटेज प्रोजेक्ट’ आणि ‘मुंबई पोर्ट सस्टेनेबिलिटी फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने, मुंबई बंदराच्या मार्गदर्शित सहलीद्वारे भारताचा समृद्ध सागरी वारसा जाणून घेण्याची संधी मुंबईकरांसाठी नुकतीच खुली करण्यात आली होती. यानिमित्ताने जाणून घेऊया ‘मुंबई बंदरा’च्या समृद्ध सागरी वारशाविषयी काही रंजक माहिती...
मुंबई बंदर प्राधिकरण, द हेरिटेज प्रोजेक्ट आणि मुंबई पोर्ट सस्टेनेबिलिटी फाऊंडेशन यांच्या सहकार्याने, मुंबई बंदराच्या मार्गदर्शित सहलीद्वारे भारताचा समृद्ध सागरी वारसा शोधण्याची आणि शोधण्याची एक अनोखी संधी सादर उपलब्ध करून देण्यात आली. विशेष म्हणजे कोणतेही शुल्क न आकारता, आणि कोणत्याही परवानगीची फॉर्म्यालिटी न करता केवळ एका नोंदणीद्वारा मुंबईकरांना मुंबई बंदराचे कार्य जाणून घेता येत आहे. या अभ्यास सहलीला मुंबईकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभत आहे.
वाढवण प्रकल्प हा बंदर वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारचा खासगी क्षेत्रातील भागीदारांच्या सक्रिय सहभागासह संयुक्त उपक्रम आहे. हे बंदर टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. या बंदराचा पहिला टप्पा 2028 पर्यंत पूर्ण होणार आहे. हे बंदर आंतरराष्ट्रीय जलवाहतूक मार्गांना थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल आणि पारगमन वेळ आणि खर्च कमी करेल. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज असलेल्या या बंदरात डीप बर्थ, कार्यक्षम कार्गो हाताळणी सुविधा आणि आधुनिक बंदर व्यवस्थापन प्रणाली असेल. या
मेट्रो २ बी गर्डरची उंची वाढविण्यासाठी एमएमआरडीए विमानतळ प्राधिकरणाची पत्रव्यवहार करील आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी योग्य कार्यवाही करेल,असे आश्वासन एमएमआरडीए तर्फे देण्यात आल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली.
वाढवण बंदर प्रकल्प विकासामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील. टर्मिनलचे बांधकाम आणि कार्यान्वित करताना स्थानिक तरुणांना कौशल्य निर्माण करण्यात मदत होईल. या प्रकल्पामुळे १०,००,०००हून अधिक व्यक्तींना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी माहिती जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने दिली आहे.
'धारावी बचाओ आंदोलना'त (डीबीए) सहभागी नेत्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे शताब्दीनगरच्या (जे क्लस्टर) रहिवास्यांवर अजून एक पावसाळा जीव मुठीत धरून राहण्याची वेळ आली आहे. नागरिकांनी सर्व्हेक्षणाला विरोध केल्यामुळे म्हाडाच्या तयार इमारतीत पुनर्वसनापासून या नागरिकांना वंचित राहावे लागणार आहे, अशी खंत धारावी पुनर्विकास प्राधिकरणातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.
विमा क्षेत्राशी निगडीत मोठी अपडेट येत आहे. आता विमा (इन्शुरन्स)कंपन्यांना आपल्या कंपनीच्या संचालकपदी एखाद्या व्यक्तीची निवड करताना त्याची पूर्वपरवानगी Insurance Regulatory Authority of India (आयआरडीएआय) या विमा नियामक मंडळाकडून घ्यावी लागणार आहे.
आता मसाला कंपन्या एमडीएच, एव्हरेस्ट पुन्हा एकदा अडचणीत आल्या आहेत. जागतिक स्तरावर या कंपन्या रडारवर आल्या असताना पुन्हा एकदा न्यूझीलंड देशाने मसाला भेसळ प्रकरणी या मसाल्यांची चौकशी करण्याचे ठरवले.आंतरराष्ट्रीय स्तरावरील अडचणीत वाढ होत असताना न्यूझीलंड देशाने मसाल्यातील घातक पदार्थांवर आक्षेप घेत याबद्दल सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगरमधील पूर्वमुक्त मार्गाच्या विस्तारीकरण प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या एक हजार ६९४ झोपड्यांतील रहिवाशांची पात्रता प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, त्यांची प्रारूप यादी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) प्रसिद्ध केली आहे. त्याचबरोबर अन्य झोपड्यांच्या सर्वेक्षणाचे कामही पूर्ण झाले आहे. आता त्यांचीही प्रारूप यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 'एसआरए'कडून येत्या काही महिन्यांत ही प्रारूप यादी जाहीर केली जाईल.
ट्रायने (Telecom Regulatory Authority of India) ने मार्च महिन्यातील सबस्क्राईबरची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीत रिलायन्स जिओने भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या दोन कंपन्यांना सबस्क्राईबर बेसमध्ये मागे टाकले आहे. मार्च २०२४ महिन्यातील सर्वाधिक युजर रिलायन्स जिओचे असल्याचे ट्रायने आपल्या अहवालात म्हटले आहे.
कार्यक्षम प्रशासक म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या काळात कोविड साथीच्या लॉकडाऊन दरम्यान रायगड जिल्हाधिकारी म्हणून यशस्वी कार्यकाळ घेतल्यानंतर जानेवारी २०२३मध्ये त्यांची कोकण विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.ते राज्याचे कामगार आयुक्त देखील होते आणि मुंबईतील असंघटित कामगार क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याचे श्रेय त्यांना जाते.
विमाधारकांचे हित लक्षात घेऊन ‘विमा नियामक आणि विकास प्राधिकरणा’ (आयआरडीए)कडून अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली गेली आहेत. पण, बहुतांश विमाधारकांना त्याविषयी फारशी माहिती नाही. तेव्हा, आजच्या भागात ‘आयआरडीए’ने विमाधारकांच्या हितासाठी घेतलेल्या अशाच काही महत्त्वपूर्ण निर्णयांवर प्रकाश टाकणारा हा लेख...
मध्य आफ्रिकेत गिनीच्या आखातावर वसलेल्या कॅमेरूनमधील क्रिबी येथे एका मेगापोर्टची निर्मिती करण्यात येत आहे. या प्रकल्पाची सुरुवात २०११ मध्ये झाली आहे आणि याचे बांधकाम २०४० मध्ये पूर्ण होणार आहे. डौआला येथील बंदरावरचा भार कमी करण्यासाठी, या बंदराची निर्मिती करण्यात येत आहे.
'स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड'अंतर्गत नवीन भरती केली जाणार आहे. स्टील अथॉरिटीकडून रिक्त पदांकरिता अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 'स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड'कडून पदभरतीकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड पदभरतीकरिता वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अंतिम तारीख जाणून घेऊयात.
टीआरएआयने आज महत्वाचे प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. हे परिपत्रक टेलिकॉम कंपन्यांसाठी मार्गदर्शक तत्वे घोषित केली आहेत. ' बेनामी ' नंबरवरून फोन कमी व्हावेत या उद्देशाने टेलिकॉम कंपन्यांना कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव मोबाईलवर दर्शवण्यासाठी मार्गदर्शक सुचना करण्यात आल्या आहेत.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात नवीन भरती केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत होणाऱ्या नोकरभरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्रातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देऊन ऑलिम्पिक पदकांचे ध्येय गाठण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मिशन लक्ष्यवेध' योजनेची घोषणा गेल्या अर्थसंकल्पात केली होती. त्या घोषणेची आता पूर्तता झाली असून, महायुती सरकारने 'मिशन लक्ष्यवेध' योजना राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १६० कोटी ४६ लाखांच्या भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.
भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत विविध पदांकरिता भरती केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात क्रीडा प्राधिकरणाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणांतर्गत एकूण २१४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या जागांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. (SAI) भरतीसंदर्भात सविस्तर तपशील जाणून घेऊयात.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये (म्हाडा) नवीन वर्षापासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी 'म्हाडा लोकशाही दिन' म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनातील चौथ्या मजल्यावरील सभागृहात दुपारी १२.०० वाजता आयोजित करण्यात येणार आहे.
झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या (एसआरए) माध्यमातून झोपडीधारक लाभार्थ्यांना प्राप्त झालेली विनामूल्य सदनिका १० वर्षांच्या आत कोणत्याही प्रकारे हस्तांतरीत करण्यास मनाई आहे. ही मर्यादा कमी करून सात वर्षे करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. तथापि ही मर्यादा पाच वर्षापर्यंत कमी करण्याच्या लोकप्रतिनिधींच्या मागणीसंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडला जाईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी शुक्रवार, दि. १५ डिसेंबर रोजी विधानसभेत केली.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या पदभरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत अधिसूचनेनुसार सल्लागार, संयुक्त सल्लागार ही रिक्त पदे भरली जाणार आहेत.
म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेतील ५८६३ सदनिकांच्या विक्रीकरिता मंगळवार, दिनांक ०५ डिसेंबर, २०२३ रोजी संगणकीय सोडत पुणे जिल्हा परिषद सभागृह येथे सकाळी ०९.०० वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात येणार आहे.
'मुंबई पोर्ट ट्रस्ट'अंतर्गत विविध पदांकिरता अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट मधील विविध रिक्त पदांच्या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीप्रक्रियेद्वारे मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत अॅप्रेंटिसशीप पदासाठी अर्ज मागविण्यास सुरूवात झाली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणांतर्गत १८५ रिक्त जागांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणातील रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ डिसेंबर २०२३ आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने भरती परीक्षेच्या वेळी हिजाबसारख्या डोकं झाकण्याऱ्या कपड्यांवर बंदी घातली आहे. दरम्यान, परिक्षेच्या वेळी केवळ मंगळसूत्र घालण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच परीक्षा केंद्रात ब्लूटूथ, इयरफोन यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरण अर्थात एयरपोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडिया अंतर्गत लवकरच भरती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधरांना नोकरीची संधी मिळणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणांतर्गत 'एअर ट्राफिक कंट्रोल' या विभागाच्या एकूण ४९६ जागा भरल्या जाणार आहेत.
भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात (FSSAI)कडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरण अर्थात एयरपोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडिया अंतर्गत लवकरच भरती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. Aभारतीय विमानतळ प्राधिकरणाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधरांना नोकरीची संधी मिळणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणांतर्गत 'एअर ट्राफिक कंट्रोल' या विभागाच्या एकूण ४९६ जागा भरल्या जाणार आहेत.
भारतीय विमानतळ प्राधिकरणात मेगा भरती केली जाणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधरांना नोकरीची संधी मिळणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणांतर्गत 'एअर ट्राफिक कंट्रोल' या विभागाच्या एकूण ४९६ जागा भरल्या जाणार आहेत.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) अंतर्गत रिक्त पदासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एनडीएमए अंतर्गत “वरिष्ठ सल्लागार” पदाची एकूण ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर २०२३ असणार आहे.
देशभरात "एक तारीख एक तास” स्वच्छता मोहिम उत्साहात करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुर्ला येथील वत्सलाताई नाईकनगर एसआरए वसाहतीला भेट दिली. यावेळी स्वच्छता ही केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात दिसली पाहिजे. मुंबईतील सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहांची दिवसातून पाच वेळा सफाई झाली पाहिजे, असे म्हणत प्रशासनाला धारेवर धरले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून उमेदवारांना विविध पदांसाठी अर्ज करता येणार आहे. दरम्यान, या भरतीच्या माध्यमातून महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, कनिष्ठ हिंदी अनुवादक पदांच्या एकूण ६२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
'आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण' अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 'आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण' कडून भरतीप्रक्रियेसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून “कार्यकारी संचालक (सुरक्षा बाजार), मुख्य महाव्यवस्थापक (जोखीम व्यवस्थापन)” पदांच्या एकूण ०२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणात मेगाभरती केली जात असून याकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणातील विविध रिक्त जागा भरण्यासाठी आज शेवटची तारीख असणार आहे. दरम्यान, या प्राधिकरणातील विविध पदांच्या तब्बल ३४२ जागा भरतीप्रक्रियेच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.
१० वी आणि १२ वी उत्तीर्णांसाठी 'एयरपोर्टस अथॉरिटी ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून १०वी, १२ वी उत्तीर्णांना सरकारी नोकरी करण्याची नामी संधी चालून आली आहे. दरम्यान, भारतीय विमानतळ प्राधिकरणात कनिष्ठ कार्यकारी, कनिष्ठ सहाय्यक आणि वरिष्ठ सहाय्यक पदांसाठी ११, ३४२ जागा रिक्त असल्याचे जाहीर केले आहे. यासाठी अर्जासाठी अधिकृत वेबसाईट aai.aero ला भेट द्या.
रेल्वे जमीन विकास प्राधिकरण अंतर्गत रिक्त पदांची भरती करण्यात येत आहेत. या रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात झाली असून प्राधिकरणाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दरम्यान, रेल्वे जमीन विकास प्राधिकरण अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती, नागपूर केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून एकूण ५ रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.
महाराष्ट्रातील मुंबई वगळून इतर ५ सागरी जिल्ह्यांकरिता सागरी क्षेत्राच्या आराखड्यास (सी.झेड.एम.पी.) केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यामुळे या ५ जिल्ह्यांमधील अनेक लोकोपयोगी प्रकल्प तसेच खाजगी गुंतवणुकीमधील प्रकल्प मार्गी लागतील तसेच पायाभूत सुविधांच्या कामांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
ई कॉमर्स मधील वाढत्या स्पर्धेमुळे नियमावलीचे पालन हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याविषयी बोलताना छोट्या व्यापाऱ्यांचा हीत रक्षणासाठी नियामक मंडळाची आवश्यक असल्याचे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले आहेत.
शहर व उपनगरातील ऑटोरिक्षा अथवा टॅक्सी चालकाने भाडे नाकारले, जादा भाडे आकारले, गैरवर्तन केल्यास 9152240303 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे तक्रार करण्याचे आवाहन मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, पावसाच्या मोसमात मुंबई व मुंबई उपनगरातील बहुतांशी प्रवाशांची वाहतूक ही काळी पिवळी टॅक्सी व ऑटोरिक्षा मधून होत असते.
आजच्या धावपळीच्या ताणतणावयुक्त जीवनशैलीमुळे मनुष्याला आपले व आपल्या कुटुंबीयांचे शारीरिक स्वास्थ्य जपणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. अस्वास्थ्यकारक आहार हा जागतिक आरोग्य चिंतेचा विषय बनत असताना, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मुलांसाठी जंक फूडच्या विपणनावर बंदी घालण्याची शिफारस केली आहे. मसालेदार अन्न, मैदा, जंक फूडच्या अतिसेवनामुळे पोटाशी संबंधित आजार होतात. यामुळे लठ्ठपणा येतो. पूर्वी हा आजार वयाच्या ७० व्या वर्षी यायचा. आता तो अवघ्या 30 व्या वर्षी दिसत आहे. जर तुम्ही संतुलित आहार घेतला तर पोटाशी संबंधित
ठाणे : स्टेम प्राधिकरणाच्या जलवाहिनीची देखभाल दुरुस्ती आणि ठाणे महापालिकेच्या जलवाहिनीची साकेत पुलावरील दुरुस्ती या कामांमुळे शुक्रवार दि. २६ मे रोजी सकाळी ९ ते शनिवार दि. २७ मे रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. स्टेम प्राधिकरणाच्या जलवाहिनीची देखभाल, दुरुस्ती यांची कामे या अवधीत केली जाणार आहेत. तसेच, ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जल वाहिनीची साकेत पूल येथे दुरुस्ती तसेच व्हॉल्व बदलले जाणार आहेत. या कामांसाठी हा २४ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे.
मुंबई : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्राधिकरणाच्या या वर्षांच्या १ हजार ९२६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता यावेळी देण्यात आली. जुलै २०१८ ते एप्रिल २०२३ या पाच वर्षांच्या काळातील प्राधिकरणाकडून विकास आणि बांधकाम प्रकरणांमध्ये वसुल करण्यात येणारे १०० टक्के अतिरिक्त विकास शुल्क माफ करण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
महाराष्ट्र राज्य हे पाणीपुरवठा व स्वच्छता बाबतीत संस्थात्मक बळकटीकरण आणि मागणी आधारित पुरवठा करणारे देशातील अग्रगण्य राज्य आहे. ग्रामीण महाराष्ट्राशी निगडित सर्वाधिक महत्त्वाच्या अशा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची जबाबदारी सांभाळताना ग्रामीण भागातील नागरिकांना पुरेसे आणि स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे, यासाठी या विभागामार्फत काम सुरू आहे. पाणी मिळाल्यानंतर लोकांच्या चेहर्यांवरचा ओसंडून वाहणारा आनंद पाहणे यासारखे सुख नाही. ते सुख आणि ती पुण्याई या विभागाच्या माध्यमातून काम करताना मिळत आहे.
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मालकीच्या कोणत्याही जमिनीवर एखाद्या व्यक्तीस नवीन किंवा वाढीव पक्के बांधकाम करण्यासाठी म्हाडाच्या वांद्रे पूर्व मुख्यालयातील तळ मजल्यावर असणार्या बांधकाम परवानगी कक्षात विहीत कागदपत्र दाखल करून बांधकामाची परवानगी घेणे अनिवार्य आहे.