राजस्थानातील बांसवाडा जिल्ह्यातील हिंदू भैरवनाथ देवाच्या मंदिराला चर्चमध्ये रुपांतरीत केल्याची घटना घडली आहे. संबंधित गावातील ग्रामस्थांनी काही वर्षांआधी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. हे चर्चही त्याच तेव्हाच बांधण्यात आले आहे. आता पुन्हा एकदा धर्मांतर केलेल्यांनी घरवापसी केली आहे. यानंतर, आता ग्रामस्थ बनावट चर्चचे मूळ मंदिरात रुपांतर करत आहेत. त्या मंदिरात भगवान भैरवनाथांच्या मूर्तीची स्थापन केली जाणार असल्याची माहिती आहे.
Read More
Anti-Conversion Law अरुणाचल प्रदेशात धर्मांतर कायद्याविरोधात आता राज्यात ख्रिश्चन धर्मातील लोकांनी ६ मार्च रोजी ईटानगरमधील बोरम मैदानावर निदर्शने दर्शवली आहेत. त्यांनी अरुणाचल प्रदेश धर्म स्वातंत्र्य अधिनियम १९७८ ला संबंधित कायदा हा क्रूरपद्धत असल्याने हा तो रद्द करण्याची मागणी केली. त्यांनी दावा केला की, ख्रिश्चन समुदायाला टार्गेट करण्यात आले. त्यांनी असा दावा केला की, चीनच्या सीमेला लागून असलेल्या राज्यात हिंसाचाराचे अधिक प्रमाण वाढले आहे.
convert छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातून धर्मांतरण (convert) करण्याचा प्रकार समोर आला आहे. साक्री पोलीस ठाण्यातील पाद्री संतोष मेशो आणि पत्नी अनु मेशो या गरीब लोकांना आमिष दाखवत धर्मांतरणाच्या जाळ्यात अडकवले जात असल्याचे बोलले जात आहे. या संबंधित माहिती एका पीडितेने दिली आहे.
conversion मध्य प्रदेशातील आदिवासी विद्यार्थींनींसाठी बांधण्यात आलेल्या वसतिगृहामध्ये ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी २७ जानेवारी रोजी घडली आहे. यावेळी विद्यार्थींनींना बायबल वाचण्यास आणि रात्रीच्या वेळी ख्रिश्चन प्रार्थना करण्यास भाग पाडले आहे. दरम्यान पीडितांचा मानसिक छळही करण्यात आला होता. या प्रकरणात तपासादरम्यान, गटशिक्षण अधिकारी यांनी रिता खर्ते यांना निलंबित करण्यााचा निर्णय घेतला आहे.
उत्तरप्रदेशातील लखीमापूर खेरीमध्ये ख्रिश्चन धर्मांतरासाठी सक्रीय आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे हिंदू आदिवाशांना आमिष दाखवत ख्रिस्ती धर्मांतरासाठी परावृत्त केले जात आहे. हे प्रकरण नीमगाव पोलीस ठाणे हद्दीतील बेझम गावातील आहे. जिथे ख्रिश्चन मिशनऱ्यांशी संबंधित असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गोरगरिबांना एका तांदळाचे पोते देऊन त्यांचे ख्रिस्ती धर्मांतरण करुन घेतले गेले. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मिशनऱ्यांच्या खेळाचा पर्दाफाश करत या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली.
अनुसूचित जाती जमातीच्या न्यायालयाचे विशेष न्यायाधीश रामविलास सिंह यांनी एका ख्रिस्ती जोडप्याला ५ वर्षे तुरूंगवास आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ख्रिस्ती धर्मांतरण प्रकरणावर उत्तर प्रदेशातील धर्मांतरणविरोधी कायद्यांतर्गत शिक्षा असल्याची माहिती समोर आली आहे. ख्रिस्ती धर्मातरणास जबरदस्ती करणाऱ्यांचे नाव हे पती जोश आणि पत्नी सिजा असे नाव होते. या प्रकरणात शिजाला १८ जानेवारीला तुरुंगात तर जोसला २२जानेवारीला तुरुंगात पाठवण्यात आले.
Return Hinduism ख्रिस्ती धर्मात धर्मांतरण केलेल्या एकूण ५० कुटुंबांची हिंदू धर्मात वापसी करण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषदेमुळे हे शक्य झाले आहे. यामध्ये एकूण ३८ महिला आणि १२ पुरूषांचा समावेश आहे. त्यानंतर त्यांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या मंदिरात दर्शणासाठी नेण्यात आले आहे.
ख्रिश्चन धर्मप्रथेप्रमाणे दि. 25 डिसेंबर हा येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस मानला जातो आणि च्याच दिवशी जगभरात नाताळचा सण मोठ्या उत्साहात साजराही केला जातो. पण, 25 डिसेंबर हा जो येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस साजरा करतात, त्याला कसलाही ऐतिहासिक, शास्त्रीय आधार नाही. तेव्हा अवघ्या काही दिवसांवर असलेल्या नाताळच्या पार्श्वभूमीवर 25 डिसेंबर हा येशूचा जन्मदिवस की सूर्याचा जन्मदिवस, हे समजून घेऊया.
Waqf Amendment Bill मोदी सरकारने केलेल्या वक्फ दुरूस्ती विधेयकाला विरोध करण्यासाठी ख्रिश्चन संघटनांनी मुस्लिमांना पाठिंबा दिला आहे. त्याच वेळी, वक्फ बोर्डाने केरळ येथे ख्रिस्ती आणि हिंदूंच्या ४०४ एकरांवर दावा केल्यानंतर, लोक हे दुरूस्ती विधेयक संसदेत मंजूर व्हावे अशी मागणी करत आहेत. ही मागणी केवळ केरळच नाहीतर कर्नाटक आणि तामिळनाडूसह अनेक राज्यातील हजारो कुटुंबांकडून केली जात आहे, कारण त्यांच्या जमिनीवरील वक्फ दाव्यांमुळे त्यांचे जीवन धोक्यात आले असल्याचे संकेत नाकराता येत नाही.
Conversion उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ख्रिश्चन सभेचे आयोजन करून गरीब लोकांना ख्रिश्चन धर्मात परिवर्तन करण्याचा कट उघड झाला. यावेळी हिंदू देवी-देवतांचा अपमान केला जात असल्याचे समोर आले आहे. केवळ येशु ख्रिस्त हाच खरा देव आहे असे बोलले जात होते. याची माहिती मिळताच रविवारी ८ डिसेंबर २०२४ हिंदू संघटना घटनास्थळी पोहोचल्या. तक्रारीनंतर पोलिसांनी ५ आरोपींना ताब्यात घेतले आहे.
Conversion बिहारमध्ये बक्सर येथे हिंदूंचे मोठ्या प्रामाणावर ख्रिश्चन धर्मांतरण झाल्याची घटना घडली आहे. ५० ते ६० हिंदू स्री-पुरूषांचे ख्रिश्चन धर्मांतर केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. महिलांना गंगेत अंघोळ केल्यावर पुजारी त्यांच्या मागणीनुसार सिंदूर लावतात आणि नंतर त्यांच्या भांगेत ख्रिस्ती धर्माचे क्रॉस लावण्यात आले होते. याप्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून हिंदू संघटनांनी जोरदार विरोध केला. याप्रकरणात दोन्ही पुजाऱ्यांना अटक केली. हे प्रकरण गुरूवारी १४ नोव्हेंबर २०२४ सिमरी
पाश्चात्त्य देश म्हंटले की, अभिव्यक्तिस्वातंत्र्य समता वगैरे वगैरे संकल्पना लोकांच्या डोळ्यासमोर आजही येतात. मात्र, मध्य अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये तर १९५३ साली महिलांना पहिल्यांदा मतदानाची संधी मिळाली आणि या देशाला पहिली महिला राष्ट्राध्यक्ष मिळण्यासाठी २०२४ साल उजाडावे लागले. आजही दर दिवशी मेक्सिकोमध्ये दहा महिलांचा खून होतो आणि वर्षाला हजारो महिला बेपत्ता होतात. त्या मेक्सिकोमध्ये जन्माने ज्यू असलेल्या क्लाऊडिया शीनबाम राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्या. अर्थात, याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले नसते त
विविध प्रकारची प्रलोभने दाखवून मूळ आदिवासींचे धर्मांतरण करणाऱ्या कू-शक्तींना आता चाप लागणार आहे. या गंभीर विषयासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याची ग्वाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गुरुवार, दि. १४ डिसेंबर रोजी विधानपरिषदेत दिली. त्याचप्रमाणे जबरदस्तीने धर्मांतरण केल्याच्या तक्रारी आल्यास सरकार त्याची तात्काळ दखल घेईल आणि कारवाई केली जाईल, असेही लोढा यांनी स्पष्ट केले.
धर्मांतरीत व्यक्तींना अनुसूचित जामातींच्या यादीतून वगळा, ही मागणी घेऊन जनजाती सुरक्षा मंच कोकण प्रांतातर्फे ‘ज्वाला डी-लिस्टिंग महारॅली’चे जांबोरी मैदान, वरळी, मुंबई येथे दि. 26 नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. त्यात आज ’संविधान दिन’ही आहे. त्यानिमित्ताने ‘डी-लिस्टिंग’ची मागणी, संस्कार संस्कृती आणि संविधान याबद्दलचे वास्तव या लेखात मांडण्याचा केलेला हा प्रयत्न....
आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने श्री ब्रह्मरंभ मल्लिकार्जुन स्वामी वराला देवस्थानमच्या एका कर्मचाऱ्याने हिंदू धर्मातून ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर त्याची सेवा समाप्त करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर संबंधित व्यक्ती हिंदू राहिलेली नाही आणि ही बाब धार्मिक संस्था कायद्याच्या विरोधात असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
पुरा लुका वेगाला काल-परवाच फिलिपाईन्स पोलिसांनी अटक केली. गेले अनेक दिवस पुरा लुका वेगाच्या विरोधात जगभरातले कट्टर ख्रिस्तीधर्मीय आकाशपाताळ एक करीत होते. त्याने ख्रिस्ती धर्माच्या श्रद्धेचा अपमान केला आणि अत्यंत अश्लाघ्य, अश्लील आणि कोणत्याही प्रकारची माफी मिळणार नाही, असा गुन्हा केला, असे फिलिपाईन्सच्या तमाम ख्रिस्ती पादरी लोकांचे मत.
उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये ख्रिश्चन धर्मांतराच्या आरोपाखाली पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे. सलमान आणि त्रिभुवन राम अशी अटक आरोपींची नावे आहेत. या दोघांकडून बायबल आणि लाऊडस्पीकर जप्त करण्यात आला आहे. याच गावातील एका तक्रारदाराने या सर्वांवर हिंदूंना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. ही घटना दि. २४ सप्टेंबर रोजी घडली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
त्यांचा झुंड येतोय. ते आपल्याला मारून टाकतील. आपला गळा कापतील. सगळ्यांनी पळा...” जीवाच्या आकांताने पाकिस्तानातील जारनवालामधील सिस्टर नाएला भट्टी कंठ फाटेस्तोवर ओरडत होती. त्यांच्यासोबतच्या ख्रिश्चन बांधवांनीही घरातून नेसत्या कपड्यांनिशी, मुलाबाळांना कडेवर घेत कसाबसा घरातून पळ काढला...कोणी रिक्षा पकडून पसार झाले, तर कोणाला त्यांच्या मुस्लीम शेजार्यांनी घरात आश्रय दिला.
प्रभू येशू तारणहार आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा असे सांगत जबरदस्तीने बायबल वाचून दाखवत देवदेवतांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी तिघाजणांविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जबरदस्तीने गोरगरिबांना फूस लावून ख्रिस्ती धर्माकडे वळविण्याचा प्रयत्न जागरूक मागासवर्गीय कुटुंबामुळे फसला. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे.
उत्तर कोरियामध्ये ख्रिश्चनांचा छळ होत असल्याचे एका आंतरराष्ट्रीय अहवालातून समोर आले आहे. उत्तर कोरियात एका २ वर्षाच्या मुलाला त्यांच्या घरात बायबल सापडल्यांने जन्मठेपेची शिक्षा सूनावण्यात आली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या 'इंटरनॅशनल रिलिजिअस फ्रीडम रिपोर्ट'मध्ये ही बाब समोर आली आहे. या अहवालानुसार ख्रिश्चन धर्माचे पालन करणाऱ्यांना इथे मृत्यूला समोरे जावे लागते.
जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत ख्रिश्चन धर्मावर श्रद्धा असणार्यांच्या संख्येत वेगाने घसरण होत आहे. धर्मावरील उदासीनतेमुळे अनेक लोकांनी चर्चमध्ये जाणे बंद केले आहे. जपानमध्येही श्रध्दाळूंच्या संख्येत झपाट्याने घट होत असल्याचे एका सर्वेक्षणातून उघड झाले आहे.
केरळ उच्च न्यायालयाने ख्रिश्चन धर्म स्वीकारलेले आमदार ए राजा यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. ते CPIच्या तिकिटावर अनुसूचित जाती (SC) साठी राखीव असलेल्या जागेवरून निवडून आले होते. हायकोर्टाने त्यांचा कायदा रद्द केला आणि म्हटले की, कोणीही ख्रिस्ती झाल्यानंतर हिंदू असल्याचा दावा करू शकत नाही. न्यायमूर्ती पी सोमराजन यांनी निरीक्षण नोंदवले की राजा हे केरळ राज्यातील ‘हिंदू पारायण’चे सदस्य नाहीत आणि अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या विधानसभेतील जागा भरण्यासाठी निवडण्यासाठी ते पात्र नाहीत.devikulam-mla-rajas-election-
इंदौरमध्ये धर्मांतरासाठी दबाव निर्माण केल्याची घटना समोर आली आहे. पोलीसांना दिलेल्या तक्रारीत ख्रिश्चन धर्मगुरू क्रिस नार्मन बेबर्ताने एका २१ वर्षीय तरुणांला ख्रिश्चन धर्म स्विकारण्यासाठी धमकी दिली. दि. ५ मार्च रोजी पीडितेने पोलीसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, क्रिस नार्मन बेबर्तापासून मला संरक्षण द्यावे. तसेच आपल्या जीवितास आणि मालमत्तेला धोका असल्याचे ही पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. हे प्रकरण इंदूरच्या खुदाई पोलीस स्टेशन क्षेत्राशी संबंधित आहे.
केरळमध्ये रोमन कॅथलिक चर्चेसमध्ये रविवारी होणार्या ‘होली मास’ प्रथेवरुन फूट पडली आहे. अनेक ख्रिश्चन संघटनांकडून जोरदार हिंसक आंदोलने करण्यात आल्याने ३५ चर्च बंद करण्यात आले आहेत. त्यांच्याबाहेर पोलीस बल तैनात करण्यात आले आहे. पोलिसांच्या मते, शांततामय वातावरण तयार झाल्यानंतरच चर्चेसना प्रार्थनेसाठी उघडले जाईल.
धर्मांतरित झालेल्या दलितांना आरक्षणाचा लाभ द्यायचा की नाही, याविषयी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत
इतकी कुकृत्ये एकट्या भारतात ख्रिश्चन मिशनर्यांनी केलेली आहेत की, ती संपणार नाहीत. त्यामुळे पोप फ्रान्सिस यांनी फक्त कॅनडात न जाता भारतातही येऊन माफी मागावी आणि ज्यांना ख्रिश्चन मिशनर्यांनी बळजोरीने धर्मांतरित केले, त्यांनाही आपल्या मूळ धर्मात परत पाठवण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यातून त्यांचा प्रामाणिकपणा पाहायला मिळेल, तोंडदेखल्या माफीनाम्याने काहीही होणार नाही.
बेकायदेशीर धर्मांतरण, दुसऱ्या धर्माचा विद्वेष करणे आणि पसरवणे या गुन्ह्यांसाठी गोव्यातील म्हापसा पोलिसांनी दि. २६ मे रोजी उत्तर गोव्याच्या सड्ये शिवोली येथील फोर्थ पीलर चर्चच्या डॉमनिक डिसोझा आणि त्याची पत्नी जोऑन मास्कारेन्हास यांना अटक केली. या प्रकरणामुळे गोव्यातील ख्रिस्ती धर्मांतरणाचा एक काळा चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आला आहे. त्यानिमित्ताने हे नेमके प्रकरण काय आहे आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या मदतीने एकूणच या सगळ्याचा कसा पर्दाफाश करण्यात आला, त्याचे शब्दबद्ध केलेले हे वास्तव...
बैरागढ भागातील ख्राईस्ट मेमोरियल स्कूल मध्ये लोकांची माथी भडकावून लोकांचे छुप्या पद्धतीने धर्मांतर केले जात असल्याची घटना पोलिसांनी उघड केली आहे
गरीब जनतेला विविध प्रकारांना भुलून धर्मांतरास बळी पडत असल्याचे दिसून येत आहे. धर्मांतरासाठी केंद्र सरकारने कायदा केल्यास संपूर्ण देशामध्ये तो अस्तित्वात येईल आणि अशा कायद्यामुळे धर्मांतरास मोठ्या प्रमाणात आळा बसण्यास मदत होईल.
महाराष्ट्र शासनाने शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त २६ जून हा ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून घोषित केला आहे. या दिनाचे औचित्य साधून आपण सार्यांनी ‘सामाजिक न्याया’ची संकल्पना समजून घेणे क्रमप्राप्त आहे.
चर्चने प्रेमसंबंधांना पाप ठरविले आहे. चर्चच्या अधिकृत पदांवर काम करणारे दोन व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात असलेले समोर आले, तर मात्र आपल्या चर्च या व्यवस्थेवरून लोकांचा विश्वास उडेल. म्हणून मग स्वत:च्या कथित पापाचे साक्षीदार झालेल्या अभयाला जिवंत जाऊ देणे, फादर थॉमस आणि सिस्टर सेफीला परवडणारे नव्हते. फादर थॉमस आणि सिस्टर सेफी दोघांनी मिळून अभयाला मारहाण केली. अभयाच्या डोक्यात जबर दुखापत झाली. चर्चच्या विहिरीत तिला बेशुद्ध अवस्थेत टाकून देण्यात आले. अभयाला मारहाण होताना झटापट झाली असेल. त्यानंतर चर्चमध्ये आवाज
आज जेव्हा आर्मेनिया विरुद्ध अझरबैजान युद्धाच्या बातम्या वाचल्यावर अनेक जण या देशांचे आकार आणि भारतापासूनच अंतर पाहून त्याकडे दुर्लक्ष करतात. हे युद्ध छोटेखानी असले तरी भारतासाठी फार महत्त्वाचे आहे.