तामिळनाडू सरकारमधील उच्च शिक्षण मंत्री पोन्मुडी यांच्या निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयाने छापेमारी केली असून ईडीच्या रडारवर असणारे हे दुसरे मंत्री आहेत. दरम्यान, याआधी दि. १४ जुलै रोजी तामिळनाडू सरकारचे मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांना ईडीने मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर आता ईडीने मंत्री पोन्मुडी यांच्या निवासस्थानी छापेमारी केली.
Read More
तामिळनाडू सरकारमधील मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांना ईडीने पुन्हा एकदा अटक केली असून याआधी त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. दरम्यान, तामिळनाडू स्टालिन सरकारमधील महत्त्वाचे मंत्री म्हणून सेंथिल बालाजी ओळखले जातात. व्ही. सेंथिल बालाजी यांना राज्याच्या परिवहन विभागात झालेल्या नोकऱ्यांसाठीच्या रोख घोटाळ्याप्रकरणी ईडीने गेल्या महिन्यात अटक केली होती
विरोधी पक्षात असताना एक भूमिका घ्यायची आणि सत्तेवर आल्यावर दुसरी भूमिका घ्यायची, यामध्ये स्टॅलिन पटाईत आहेत.आपले वर्तन लोक विसरून गेले असतील, असा समज करून घेऊन स्टॅलिन यांनी राज्यपालांच्या आदेशावर आक्षेप घेतला. आता या आदेशाला स्थगिती देण्यात आली असल्याने अॅटर्नी जनरलचे मत घेऊन पुढील पावले टाकण्याचे राज्यपालांनी ठरविले आहे.
नवी दिल्ली : मंदिरांमध्ये पुजाऱ्यांची नियुक्ती करताना जात महत्त्वाची नसून संबंधिक व्यक्ती त्याच्या कर्मात म्हणजेच कामात किती सक्षम आहे, हे पाहणे महत्त्वाचे असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी दिला आहे.
तामिळनाडूचे ऊर्जा मंत्री वी सेंथिल बालाजी यांना दि. १४ जून रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. कॅश फॉर जॉब घोटाळ्यासंदर्भात त्यांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते. मात्र अटक केल्यानंतर त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. यानंतर त्याला मेडिकलसाठी नेण्यात आले, तिथे ते रडताना दिसले.