मुंबई महानगरपालिकेने बांधलेल्या धर्मवीर,स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड (दक्षिण) प्रकल्पाला हाजी अली येथील पुलावर मास्टिकचे अतिरिक्त आवरण केल्याची दृश्ये आणि छायाचित्रे सोशलमिडीयावर प्रसारित झाली. त्यावरुन प्रकल्पाच्या बांधकामात दोष असल्याचे आरोपही झाले. मात्र, या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. हा प्रकल्प पूर्णपणे सुरक्षित असून, या रस्त्यावर कोणतेही तडे अथवा खड्डे नाहीत.
Read More
(Lalbaugcha Raja Visarjan 2024) गणेशोत्सवात मुंबईतील आकर्षणाचे प्रमुख केंद्रबिंदू असणारा लालबागचा राजा अखेर दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता परतीच्या प्रवासाला निघाला होता. दहा दिवसांसाठी आलेल्या ह्या लाडक्या पाहुण्याला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर लाखोंचा जनसागर उसळला होता. राजाच्या या भव्य विसर्जन सोहळ्यामध्ये रिलायंस इंडस्ट्रीजचे अनंत अंबानी देखील सहभागी झाले होते. तब्बल २० तास चाललेल्या भव्य मिरवणुकीची सांगता गिरगाव चौपाटीवर झाली.
कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मुंबई येथील गिरगाव चौपाटीवर महापुरुषांच्या जीवनावर आधारित लाईट अँड साउंड शो सुरू होणार आहे. या शिवाय गिरगाव चौपाटी येथील लोकमान्य टिळक उद्यानात ग्लो-गार्डन तयार करण्यात आले.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी १० दिवसांच्या गणपतीचे विसर्जन २८ सप्टेंबरला मोठ्या थाटामाटात पार पडले. यावेळी मुंबईसह राज्यभरातील गणेशोत्सव मंडळांनी मिरवणूक काढून बाप्पाला निरोप दिला. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील लालबागच्या राजाचे विसर्जन तब्बल २३ तासाच्या मिरवणूकीनंतर गिरगांव चौपाटीवर झाले.
१९ सप्टेंबर रोजी झालेल्या गणेशोत्सवामुळे सर्वत्र एक वेगळाच उत्साह पाहण्यास मिळत आहे. सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणपतींसाठी करण्यात आलेली आरास पाहून अगदी मन प्रसन्न होत आहे.
मंगळवार १९ सप्टेंबर, गणेश चतुर्थी दिवशी आपला लाडका बाप्पा घरोघरी विराजमान झाला. १० दिवसांचा हा जणू एक सोहळाच. दहा दिवसांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना प्रत्येक भाविकाच्या डोळ्यात अश्रू आणि पुढील वर्षाची आतुरता पाहण्यास मिळते. अशातच बुधवार २० सप्टेंबर रोजी दीड दिवसाच्या बाप्पाचे मुंबईत मोठ्या उत्साहात आणि पाणावलेल्या डोळ्यांनी विसर्जन करण्यात आले.
सध्या सनी देओल अभिनयित 'गदर २' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अशातच आता अभिनेता सनी देओलच्या मुंबईतील बंगल्याचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावामागचे कारण म्हणजे त्याने बँकेकडून घेतलेले कर्ज अद्याप दिलेले नाही. त्यामुळे बँकेचे कर्ज फेडण्याकरिता मुंबईतील बंगल्याचा लिलाव करण्यात येणार आहे.
मुंबईकर वीकेंडला सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बाहेर फिरायला जातात. मुंबईतील बीचवर सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते. आणि मुंबईत म्हटलं की, बीचवर फिरायला जाणं आलंच. पण तुम्ही जर बीचवर फिरायला जात असाल तर सावध राहा. कारण ऑक्टोबरपर्यंत मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर धोका असल्याची माहिती आहे.
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील बाळासाहेब ठाकरे (गायमुख) चौपाटी दोन वर्षांपूर्वी सुरू झाली. मात्र देखभाल दुरूस्ती अभावी या चौपाटीला अवकळा आली आहे. या चौपाटीवरील शौचालयांची दुरवस्था झाली असुन वीजेचे खांब असूनही वीजच नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे चौपाटीवर अनुचित प्रकार घडू शकतात. गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना आता चौपाटीही सुरक्षित नसल्याचा आरोप मनसे जनहित व विधी विभागाकडून करण्यात आला आहे.
किनाऱ्यावर वाहून येणाऱ्या 'रे' आणि जेलीफिशचा त्रास दीड दिवसांच्या विसर्जनाच्या वेळी गिरगाव चौपाटीवर आलेल्या भाविकांना, तसेच जीवरक्षकांना झाल्याचे निदर्शनास आले आहे. समुद्रात, गुडघाभर पाण्याच्या जागी मोठ्या प्रमाणात स्टिंग रे आणि जेली फिश यांचे दंश लोकांना झाले. परंतु, भरती ओहटीची तीव्रता लक्षात घेता, हा त्रास दीड दिवसाच्या गणपती विसर्जनावेळीच जास्त जाणवला.
मुंबईच्या जुहू चौपाटीवर पोर्तुगीज मॅन ओ' वॉर हा जेलीफिश सदृश समुद्री प्राणी आढळून आला आहे. पावसाळ्यात हे जीव किनाऱ्यावर वाहून येतात. निळी झालर असलेल्या एका हवा भरलेल्या पिशवी सारखे ते दिसतात.यांच्या धाग्या सारख्या शेपटीचा दंश झाल्यावर तीव्र वेदना होतात. गेल्या २-३ दिवसात अजूनही काही नमुने वाहून आल्याचे ड्युटीवर असलेल्या लाईफगार्डने सांगितले.
मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. अश्यावेळी पावसाचा आनंद घेण्यासाठी अनेक जण मुंबईच्या किनारपट्टीवर गर्दी करते. मुंबईच्या सांताक्रूझ परिसरात राहणारा आशिष धूसर आपल्या कुटुंबासोबत जुहू चौपाटी येथे पावसाचा आनंद घेत होते. तिथे एक लहान मुलं पाण्यात बुडत असल्याचे आशिष ने बघितले आणि तात्काळ त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली.
सध्या कोरोनामुळे मुंबईच नाही, तर जगभरातील शहरांच्या प्रदूषणाची पातळी चांगलीच सुधारली आहे. पण, वाहतूक, वर्दळ पूर्वपदावर आल्यानंतर प्रदूषणाच्या पातळीत पुन्हा एकदा वाढ होईल, यात शंका नाही. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीला सायकलवारी साहाय्यभूत ठरु शकते. तेव्हा मुंबईतील सायकल मार्ग कामांचा घेतलेला हा आढावा...
गिरगाव व जुहू चौपाटी यांना ‘क्लिन स्ट्रीट फूड हब’ दर्जा प्राप्त झाला आहे. मंगळवार (दि. ५) सायंकाळी ५.३० वाजता गिरगाव चौपाटी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्धाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरवार, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी आदी उपस्थित राहणार आहेत.
पाळीव प्राण्याला घराबाहेर फिरायला घेऊन गेल्यानंतर ते सार्वजनिक ठिकाणे, रस्ते वा पदपथांवर घाण करतात. यामुळे सार्वजनिक ठिकाणे अस्वच्छ होत असल्याने पालिकेने श्वान मालकांवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.