UBT arvind sawant मातोश्रीच्या अंगणात जागा मिळावी, म्हणून उबाठा गटाचे पदाधिकारी तोंडाची निष्फळ वाफ दवडण्याची एकही संधी सोडत नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या नजरेत हिरो ठरण्यासाठी आटापिटा करणारे हे लोक, जनतेच्या नजरेत मात्र झिरो ठरत आहेत हे का बरं त्यांच्या लक्षात येत नसेल? नाशिकमध्ये भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त आलेल्या खा. अरविंद सावंत यांनी, भाजप आणि महायुतीवर आरोप करण्याच्या नावाखाली मुक्ताफळे उधळली.
Read More
प्रसारमाध्यमांमध्ये उबाठा गटाची भूमिका मांडण्यासाठी अधिकृत प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली असून यात दोन जणांची मुख्य प्रवक्तेपदी तर सहा जणांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
उबाठा गटाला हिंदूत्वासोबतच हिंदूंचीही ॲलर्जी होत आहे. आज बाळासाहेब असते तर उबाठा गटाचे भाषण ऐकून त्यांना वेदना झाल्या असत्या, अशी टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी बुधवार, २ एप्रिल रोजी संसदेत केली. वक्फ सुधारणा विधेयकाबाबत उबाठा गटाने घेतलेल्या भूमिकेला त्यांनी उत्तर दिले.
तुम्ही काँग्रेसच्या नादी लागून बाळासाहेबांचे विचार विसरलात. सोनिया गांधी आणि राहूल गांधींनी वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करण्यासाठी आदेश दिले असतील आणि हे लोक काँग्रेसी विचारांचे गुलाम झाले आहेत, असा हल्लाबोल खासदार नरेश म्हस्के यांनी उबाठा गटावर केला. त्यांनी नवी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला.
नवी दिल्ली : वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) बुधवारी मसुदा अहवाल आणि सुधारित सुधारित विधेयक ( JPC Accepts Revised Waqf Bill ) स्वीकारले. जेपीसी ३० जानेवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना अहवाल सादर करेल. तथापि, विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही अहवालावर त्यांच्या असहमतीच्या नोंदी सादर केल्या आहेत.
मुंबई : “मी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून चांगला लढा देणार आणि जिंकणार,” असा विश्वास येथील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार शायना एनसी ( Shayana NC ) यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्यावर उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केलेल्या अभद्र टिपणीचाही त्यांनी समाचार घेतला आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’ ने त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.
महिलांविषयी अपशब्द वापरणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना जनता माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया माजी आमदार अतुल शाह यांनी दिली आहे. उबाठा गटाचे नेते अरविंद सावंत यांनी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या महायूतीच्या उमेदवार शायना एनसी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. यावर दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना अतुल शाह यांनी प्रतिक्रिया दिली.
( Shaina NC ) शिवसेना शिंदे गटाच्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार शायना एन.सी. यांनी मुंबईतील नागपाडा पोलीस ठाण्यात शुक्रवार दि. १ नोव्हेंबर रोजी शिवसेना उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना नेत्या शायना एन.सी. यांच्याविषयी बोलताना अपमानास्पद शब्दप्रयोग केल्याने मोठा गदारोळ निर्माण झाला आहे.
"आदित्य ठाकरे यांनी आता नवीन मतदारसंघाचा शोध सुरु केला आहे. राहुल गांधी पराभूत झाल्यानंतर जसे वायनाडच्या शोधात निघाले होते, तसंच आता आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रातील आपला वायनाड शोधण्यास सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरे आता वरळीतून लढणार नाहीत," असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणेंनी केलंय. लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर दक्षिण मुंबई लोकसभेत उबाठा गटाने बाजी मारली. पण उबाठाचा बालेकिल्ला असलेल्या वरळीत मात्र आदित्य ठाकरेंसाठी धोक्याची घंटा वाजली. दक्षिण मुंबई लोकसभेत उबाठा गटाचे नेते अरविंद सावंत यांनी विजय मिळवला
राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणूकांची धामधूम सुरु आहे. सर्वच पक्ष निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत. दरम्यान, वरळी विधानसभा मतदारसंघात वरळीकरांकडून पोस्टबाजी करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईत बदल घडवणार अशा आशयाचे पोस्टर याठिकाणी लावण्यात आले आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेस नेते मिलींद देवरा हे शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. मिलींद देवरा हे मुंबईतील दक्षिण मुंबई मतदारसंघातून निवडणुक लढवण्यात इच्छूक आहेत. पण काँग्रेस पक्षातू त्यांना तिकीट मिळणार नसल्याने ते शिवसेनेत जाणार असल्याच सांगितल जात आहे.
उबाठाचे खासदार अरविंद सावंत हे मोदीलाटेत निवडून आले असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागावाटपावरून सुरु असलेले वादविवाद पुन्हा एकदा समोर आल्याचे बोलले जात आहे. शनिवारी महाराष्ट्र टाईम्सशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
नुकतेच महाराष्ट्रातील २३५९ ग्रामपंचायतीमध्ये निवडणूका झाल्या आणि त्यांचा निकालही लागला. मराठा आरक्षण, राज्यातील काही भागांमध्ये पडलेला दुष्काळ, अशा वातावरणात महाराष्ट्रात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत जनतेने भाजपवर आणि महायुतीवर विश्वास व्यक्त केला. आणि उद्धव ठाकरेंना आणि महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला. त्यामुळे सतत निवडणुका घ्या,मग कळेल महाराष्ट्रात कोणाची ताकद किती आहे, अशी विधान आपोआप कमी झाली. दरम्यान आता ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. उबाठा गटाने आता लोकसभेच्या कोल्हापूर , इच
खासदार सुप्रिया सुळेंनी काल (८ ऑग.) लोकसभेतील भाषणात मणिपुरचा विषय मांडला. त्यांच्या या भाषणाचे ट्विट उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केले. व्हिडीओ ट्विट करत युवराजांनी सुप्रिया सुळेंचं तोंडभरुन कौतुक ही केलं. मात्र, युवराजांना आपल्या खासदाराची दखलही घेता आली नाही, हे पुन्हा एकदा दिसुन आले.
लोकसभेत अविश्वास ठरावावरील चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उबाठा गटावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी उद्धव सेनेला आपली औकात दाखवली जाईल. आणि उबाठाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. यादरम्यान सभापतींच्या खुर्चीवर बसलेल्या राजेंद्र अग्रवाल यांनीही नारायण राणेंना अडवत वैयक्तिक वक्तव्य टाळण्याचा सल्ला दिला.
उद्धव ठाकरे यांनी 2024 लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आखली आहे. मुंबईतील लोकसभा मतदारसंघातील अनेक उमेदवार बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण मुंबईतून सध्याचे खासदार अरविंद सावंत यांच्या जागी राज्यसभा खासदार अनिल देसाई यांच्या नावाची चर्चा असून त्यांना संधी दिली जाऊ शकते. तसंच अरविंद सावंत यांना उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या पूनम महाजन यांच्याविरोधात उमेदवारी दिली जाऊ शकते.
“या शतकात जरी लता मंगेशकर यांच्यासारख्या गायिका एकट्याच झाल्या असल्या, तरीही दुसर्या आशा भोसलेही झाल्या नाहीत, ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे,” असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचा सन्मान करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. दि. २४ मार्च रोजी सायंकाळी २०२१ सालचा ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार आशा भोसले यांना मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे संपन्न झालेल्या दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ’भारतरत्न’ सचिन तेंडुलकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सा
राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. सलग दोन आठवडे ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. अनेक मुद्दे कोर्टासमोर मांडण्यात आले. ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात जोडपत्रं सादर केलं आहे. या जोडपत्रातून त्यांनी पाच मुद्द्यांवर कोर्टाचं लक्ष वेधलं आहे. कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंच मोठं वक्तव्य केलं आहे. 90 टक्के शक्यता आहे हे प्रकरण पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवणार. राहुल नार्वेकरांकडे पुन्हा हे प्रकरण जाईल असं सरोदे म्हणाले.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर अत्यंत महत्त्वाचा निकाल निवडणूक आयोगाने दि. १७ फेब्रुवारी रोजी दिला. आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. २३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपली. त्यामुळे पक्ष चिन्ह, पक्षप्रमुख पद आणि पक्षाचे नाव ही उद्धव ठाकरे यांच्या हातून निसटले. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून बांधण्यात आलेले दादर येथील शिवसेना भवन अद्याप ही उद्धव ठाकरेंकडेच आहे. पंरतू शिवसेना भवन हे जरी शिवसेनेचे मुख्यालय असले तरी त्याच
महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, छत्रपती शिवाजी महाराज अवमान याबाबत तक्रार केल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. या भेटीनंतर त्या दिल्लीत माध्यमांशी बोलत होत्या. गृहमंत्री अमित शाह नक्की मार्ग काढतील. असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
"माझ्या शब्दांचे अर्थ नीट समजून घ्या...", Arvind Sawant यांचा आणखी एक दावा!
गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या ठाकरे-शिंदे गटातील वादाचे रूपांतर अखेर मारामारीत झाल्याचे दादरमध्ये दिसून आले.
याकूब मेमनची कबर भाजप सरकारच्याच काळात तयार झाली असल्याचा दावा करत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेकडून सारवासारवीचा प्रयत्न केला आहे
शिवसेनेत दोन गट पडल्याने महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापले आहे. आता ही लढाई राजकीय राहिली नसून, ती कायदेशीर लढाई झाली आहे, असे शिवसेना नेते अरविंद सावंत म्हणाले आहेत. आम्ही १६ आमदारांविरुद्ध कायदेशीर कारवाईला सुरुवात केली आहे. रविवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वकिलांचा ही दाखला दिला.
"लोकसभेमध्ये आवाज उठवला म्हणून एका महिला खासदाराला संसदेच्या वास्तुत शिवसेनेचे खा. अरविंद सावंत यांच्याकडून उघडपणे धमकी दिली जाण्याची घटना अतिशय वेदनादायी आणि लज्जास्पद आहे. अशी घटना पाहिल्यावर आपण शिवरायांच्या भूमीत राहतो की मोगलांच्या अंमलाखाली राहतो आहे," असा सवाल भाजपा प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी उपस्थित केला आहे.
अरविंद सावंत यांचा सर्वात मोठा प्रमाद म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या स्वयंभू व कर्तृत्ववान व्यक्तीच्या मृत्यूचे राजकारण करण्याचा त्यांनी केलेला अश्लाघ्य प्रकार. आपल्या सर्वांना माहिती आहेच की, गोपीनाथजींच्या जीवनाचा अंत एका दुर्दैवी अपघातात झाला. मात्र, आता त्याची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी करत अरविंद सावंत यांनी अतिशय खालच्या दर्जाचे राजकारण करुन दाखवले आहे.
खासदार अरविंद सावंत यांना आता कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. ठाकरे सरकार स्थापनेवेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
तोट्यात असणाऱ्या १९ मोठ्या कंपन्या बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. लोकसभेमध्ये काँग्रेसचे खासदार अदूर प्रकाश यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी ही माहिती दिली. एचटीएम, हिंदुस्तान केबल्स आणि इंडियन ड्रग्स या कंपन्यांचा यामध्ये समावेश असणार आहे.
जालन्याचे खासदार रावसाहेब दावने व दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार अरविंद सावंत यांनी मराठीत घेतली. राष्ट्रपती भवनात हा शपथविधी पार पडला.
अपेक्षेप्रमाणे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ भाजप-शिवसेना युतीने जिंकला. नुसता जिंकला असे नव्हे तर गेल्यावेळेपेक्षा अधिक मताधिक्क्याने जिंकला.
२०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेने इथे अरविंद सावंत यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराकडून मिलिंद देवरा यांचा पराभव केला आणि काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ काँग्रेसकडून शिवसेनेकडे गेला.