कोथरुडमधील नामांकित शल्यविशारद आणि समाजसेवक डॉ. विलास जोग यांना मंगळवार, १४ जानेवारी रोजी दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था व संशोधन केंद्राच्या वतीने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Read More
(Zero Pendency) उच्च आणि तंत्र शिक्षण विभागातील एकही फाइल प्रलंबित राहू नये, यासाठी या विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला असून, येत्या ३१ जानेवारीपर्यंत 'झीरो पेंडन्सी' उपक्रम राबवला जाणार आहे.
तुम्ही स्वत:चं नुकसान करुन फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं भलं केलं, असा टोला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना लगावला आहे. संजय राऊतांनी भाजपवर केलेल्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी शुक्रवारी यवतमाळ येथे माध्यमांशी संवाद साधला.
राज्यातील मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली असून यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मुलींच्या शिक्षणासाठी हे क्रांतिकारी पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत यावर प्रतिक्रिया दिली.
मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठात बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन विद्यापीठ (MERU) कार्यक्रमाचा शुभारंभ सोहळा मंगळवारी पार पडला. यावेळी जम्मू येथून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. एसएनडीटी महिला विद्यापीठाला प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत मेरू साठी १०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक निपुण विनायक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सध्याच्या युगात विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञानही आवश्यक आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (SNDT) अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांनी संस्कृती शिक्षा उत्थान न्यास आणि भारतीय शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०: आव्हाने, उपाय आणि पुढील वाटचाल' या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. दि. ०१ फेब्रुवारी २०२४ रोजी सर विठ्ठलदास ठाकरसी विद्याविहार, जुहू आवार येथे हा एकदि
मराठा आरक्षणासाठी मागासवर्ग आयोगाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, कुणबी प्रमाणपत्र तपासण्याची ८५ टक्के कार्यवाही पूर्ण झाल्याची माहिती राज्य सरकारतर्फे मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांना देण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखालील सरकार सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या क्युरेटिव्ह पिटीशन ऐकण्याच्या संधींचा नक्की फायदा घेईल, असे वक्तव्य उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. राज्य सरकारकडून दाखल करण्यात आलेली मराठा आरक्षणासंबंधी पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्विकारली आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई विद्यापीठात रिक्त पदांवर मनुष्यबळ भरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार लवकरच प्राध्यापकांची १३८ रिक्त पदे भरण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवार, दि. १८ डिसेंबर रोजी विधानसभेत दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगासमोर जी आत्मनिर्भर भारताची संकल्पना मांडली, ती कौशल्य विकासावर आधारलेली आहे. त्या बळावरच आपण आर्थिक महासत्ता होण्याचे ध्येय पूर्ण करू शकतो. राज्याच्या कौशल्य विकास विभागाकडून सुरू असलेले विविध उपक्रम पंतप्रधानांच्या संकल्पनेला पूरक असेच आहेत. त्यामुळे त्यांचे मनापासून अभिनंदन, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी मंगळवार, दि. १२ डिसेंबर रोजी नागपूर येथे केले.
मराठा समाजाला आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. पण ते देत असताना ओबीसी किंवा अन्य कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी करणार नाही. शिवरायांची शपथ घेऊन मी सांगितले आहे. त्यामुळे चिंता करू नका. सगळी प्रक्रिया मॅरेथॉन पद्धतीने सुरू आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे, टिकणारे आरक्षण देणार, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथे दिली.
विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या तृयीयपंथी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवार, दि. ५ डिसेंबर रोजी केली. त्याचप्रमाणे नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला अधिक गती देण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली.
आगामी शिक्षक, सिनेट, पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी सुरू झाली आहे. परंतु, मतदारांना अर्ज भरताना विविध समस्या येत असल्याने अनेकजण मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची भीती आहे. त्यामुळे मतदार नोंदणीची अंतिम मुदत वाढवण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी करण्यात आली आहे.
उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांची सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच त्यांचे सोलापूर शहरात आगमन झाले. सोमवार दि. १६ रोजी रोजी शासकीय कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी रविवारी सायंकाळी शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद हुतात्मा किसन सारडा, मलाप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले व महात
मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीने दोन महिन्यांत अहवाल सादर करावा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
देशभरात 'हर घर तिरंगा' (घरोघरी तिरंगा) उपक्रम राबवण्यात येत असून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही कोथरुडमधील आपल्या निवासस्थानी राष्ट्रध्वज उभारुन या उपक्रमाची सुरुवात केली आहे. तसेच त्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदनादेखील दिली आहे.
पद्म पुरस्कारांच्या नावांची शिफारस करण्यासाठी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत दिलीप वळसे पाटील , दादा भुसे, चंद्रकांत पाटील, धनंजय मुंडे, उदय सामंत आणि अप्पर मुख्य सचिव यांचा समावेश करण्यात आला आहे. आता ही समिती शासनाकडे विविध माध्यमातून प्राप्त झालेल्या नावांची छाननी करुन केंद्र पाठवणार आहे. केंद्र सरकारला पद्म पुरस्कारांसाठी ही समिती मदत करेल.
पुणे शहर पोलिसांच्या कोथरुड पोलीस ठाण्याच्या गस्तीवरील पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना १८ जुलैच्या मध्यरात्री पकडले होते. वाहनचोरी करीत असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर या तिघांना त्यांच्या कोंढव्यातील घरी झडती घेण्यासाठी नेण्यात आले होते. त्यावेळी या तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्यांना पाठलाग करुन पुन्हा पकडले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण देखील केले जाणार आहे. यासोबतच ते पुण्यामधील दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेणार आहेत. मोदी यांच्या स्वागतासाठी पुणे सज्ज झाले असून प्रशासनासह शहर भाजपाने जोरदार तयारी केली आहे. पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली असून पाच हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे.
पुणेकरांचा मेट्रोचा प्रवास अधिक सुखकर होणार असून येत्या काही दिवसातच पिंपरी चिंचवड ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक आणि वनाझ मेट्रो स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक मेट्रो स्थानक पर्यंत थेट प्रवास करता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दि. १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यात या मार्गांचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन जुळ्या शहरे मेट्रोद्वारे जोडले जाणार आहेत. दरम्यान, हे मेट्रो मार्ग आता लवकरच सेवेत दाखल होणार आहेत.
एका विशिष्ट समाजातील महिलांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करीत फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी मुकेश माचकर याच्या विरोधात अलंकार पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम १५३ (अ) ५००, ५०५(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, माचकरच्या सडक्या मेंदूच्या विचारांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे : कोंबिंग ऑपरेशन आणि गुन्हेगार तपासणी मोहिमेदरम्यान काही गुन्हेगारांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. हे आरोपी स्टेट बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकणार होते. ही घटना शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास वारजे येथील रोजरी स्कूलजवळ घडली. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून पोलिसांनी देखील प्रत्तुतरादाखल गोळीबार केला. या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुंबई : आयटी क्षेत्रात जगभरात अग्रगण्य असणाऱ्या ‘एचसीएल टेक’ कंपनीसोबत महाराष्ट्र समग्र शिक्षा मार्फत सामंजस्य करार करण्यात आला असून राज्य शासनातर्फे ‘महाराष्ट्र यंग लीडर ॲस्पिरेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम (MYLAP) राबविला जाणार आहे. दरम्यान, एचसीएल टेक कंपनीच्या ‘एचसीएल टेक-बी’ या उपक्रमांतर्गत ३८ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून २० हजार विद्यार्थ्यांना स:शुल्क प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
पुणे : हरे राम हरे कृष्णा...जय जगन्नाथ, जय बलराम, जय सुभद्रा... चा अखंड जयघोष, वरुणराजाची संततधार आणि भाविकांचा मोठा उत्साह अशा भक्तीमय वातावरणात पुण्यामध्ये जगन्नाथ रथयात्रा सोहळा जल्लोषात साजरा झाला. ओडिसामधील जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ - इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे आयोजित रथयात्रेत हजारो भाविक पारंपरिक वेशात सहभागी झाले होते.
२०२४ लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने काही निवडक मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. बड्या राजकीय घराण्यांच्या परंपरागत मतदारसंघांमध्ये भाजपचा उमेदवार निवडून आणण्याचे भाजपचे मनसुबे आहेत. त्यात शरद पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामतीवर भाजपचे विशेष लक्ष आहे. भाजपकडून घोषित करण्यात आलेले 'मिशन बारामती' पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोडवर आले असून या लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचा एक बडा नेते लवकरच भाजपात डेरेदाखल होणार आहे. त्यामुळे पवारांसमोरील आव्हान दिवसेंदिवस तगडे होत जात आहे.
पुणे : बूथ कार्यकर्ता हा भाजपाचा महत्वाचा घटक आहे. आगामी काळ हा निवडणुकांचा काळ आहे. भाजपाच्या केंद्र आणि राज्यातील सरकारने लोकोपयोगी कामे केलेली असून अनेक महत्वाकांक्षी योजना देखील राबविलेल्या आहेत. देशहित आणि जनहितासाठी केलेल्या कामांची सर्व माहिती सरल अॅपमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांपर्यंत हे अॅप पोचवून त्यांची नोंदणी करुन घेण्याचे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
मुंबई : अनुसूचित जाती, जमाती,ओबीसी आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी शासन खूप सकारात्मक आहे. बार्टी, टीआरटीआय, सारथी आणि महाज्योती या चारही संस्थांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या शैक्षणिक योजनांमध्ये एकसूत्रता असावी आणि विद्यार्थ्यांना समान लाभ देण्यासाठी या चारही संस्थांनी समन्वय ठेवावा अशा सुचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिल्या.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावातील विविध समस्या सोडविण्यासाठी तसेच २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी. यासह २७ गावातील नागरिकांना दहा पट मालमत्ता कर आकारला जात आहे. कोणत्याही सोयी सुविधा दिल्या जात नसताना हा कर भरणे नागरीकांना अशक्य आहे. त्यामुळे तो रद्द करण्यात यावा. २७ गावे महापालिकेतून वगळल्यास कराचा हा प्रश्न संपुष्टात येईल या मागणीसाठी सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी सुभाष मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले.
पुणे : महापालिकेमार्फत स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असल्यास घरपट्टीमध्ये ४० टक्के सवलत यापुर्वी मिळत होती. ही सवलत पुन्हा सुरू करण्याबाबत पुणेकर नागरिकांची असलेली अनेक वर्षांपासुनची मागणी लक्षात घेता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन मार्च २०२३ मध्ये अधिवेशन काळात मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला
छत्रपती संभाजीनगर : राज्यात शिवसेना भाजपा युती अभंग आहे. राष्ट्रवादीची गरज आम्हाला पडेल असे वाटत नाही, असे स्पष्ट मत भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त करून सद्याच्या राजकीय चर्चाना विराम दिला. ते म्हणाले, "मुळात शिवसेना-भाजप युती हेच जनतेचे मत आणि हाच जनतेचा कौल आहे."
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं बाबरी मशिदीच्या संदर्भात असलेले नाव पुसण्याचे काम करत असल्याचा आरोप केला आहे. "बाबरी पाडणारे आमचे शिवसैनिक होते." यावर बोलत असतांना बाळासाहेब ठाकरे बाबरी कांड प्रकरणात प्रमुख आरोपी होते असेही म्हणत हे भाजपला माहिती नाही का? असा सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. आता यावर डॉ. मिंधे बोलणार का? असा ही सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदीबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यानंतर राऊतांच्या विधानाचा समाचार भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. संजय राऊतांना फार गांभीर्याने घेण्याचं काही कारण नाही. तुरुंगात जावं लागल्याने त्यांची पातळी घसरली आहे. हे सामान्य माणसाला आवडत आहे असं नाही. आजही सर्वांनी मोदींना जगातील सर्वात सर्वोच्च नेते म्हणून गौरवलं आहे. त्यामुळे मोदी यांनी जगाची अर्थव्यवस्था पुढं नेली आहे. मोदी यांच्या विषयी बोलून राऊत यांना समाधान मिळत असेल तर माहिती नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
‘दि मॅजेस्टिक’या महाराष्ट्र राज्य विधानमंडळ अतिथीगृह तथा आमदार निवास वास्तूच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन व कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाज तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. राजे
पुणे महापालिकेकडून मिळकत करातून देण्यात येणारी ४० टक्के सवलत रद्द करण्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने महाविजय २०२४ अभियान जाहीर केले असून या अभियानाची संयोजन समिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी घोषित केली. या अभियानाचे प्रदेश संयोजक म्हणून आ. श्रीकांत भारतीय यांची नियुक्ती करण्यात आली आहे . संयोजन समितीच्या सदस्यपदी प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर , प्रदेश मुख्यालय प्रभारी रवीन्द्र अनासपुरे , प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील , प्रदेश सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक , प्रदेश सचिव श्वेता शालिनी , अरविंद
‘श्री श्री शंकर देव सेवा समिती’ आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून महापे येथे ‘माझे शहर लव्ह जिहाद मुक्त शहर’ सभेचे शुक्रवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेच्या प्रमुख वक्ता समाजसेविका साक्षी गायकवाड म्हणाल्या की, “ ‘लव्ह जिहाद’ म्हणजे भारतीय समाज आणि संस्कृतीला प्रताडित करण्याचे षड्यंत्र आहे.” यावेळी ‘लव्ह जिहादमुक्त नवी मुंबई’ या विषयी प्रास्ताविक गायत्री गोहाँई यांनी केले. नवी मुंबईमध्ये घडलेल्या ‘लव्ह जिहाद’च्या घटना आणि त्यांचे परिणाम त्यांनी मांडले. तसेच, रविवार, दि. २
देशाच्या कानाकोपर्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र पोचविण्याचे काम शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे समर्पित भावनेने केले. त्यांनी हे काम केले नसते, तर शिवाजी महाराज यांची ओळख तितक्या मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोचली नसती.शिवाजी महाराजांचे जीवन हे एका राजाचे जीवन नसून एका विचारांचे जीवन आहे. स्वधर्म, स्वराज्य, स्वभाषा हा शिवाजी महाराजांचा विचार नव्या पिढी पर्यंत पोचविण्याचे काम या शिवसृष्टीद्वारे होईल. असेही केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांनी सांगितले.
दिवंगत आ. लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागेवर भाजपच्या अधिकृत उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी आज सोमवारी (दि. ६) रोजी पोटनिवडणुकीसाठी थेरगाव येथील निवडणूक कार्यालयात निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे. त्याबरोबरच माजी नगरसेवक शंकर जगताप यांनीदेखील आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे. तो डमी अर्ज असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, खा. बारणे, आ. महे
राजकीय पक्षांनी निवडणुका लढताना अजिबात गाफील राहता कामा नये, असे सांगताना आपला पक्ष सावध असल्याची सूचक प्रतिक्रिया पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिली आणि पक्षात गुणवत्तेनुसारच निवड प्रक्रिया होत राहील, असा गर्भित इशारादेखील आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि अतिमहत्त्वाकांक्षा बाळगणार्यांना देत त्यांनी नेम साधला. सध्या पुण्यात कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकांचा ज्वर शिगेला आहे. या निवडणुका घोषित होताच, या दोन्ही मतदारसंघांतून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांनी आपापल्यापरीने रणनीती आ
एसटी महामंडळाच्या पत्रानंतर ग्रामीण भागातील विविध मार्गांवरील ‘पीएमपीएमएल’ची बससेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय ‘पीएमपीएमएल’ प्रशासनाने घेतला होता. मात्र, ही बससेवा पुन्हा पूर्ववत करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘पीएमपीएमएल’चे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांना दिल्या असून, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मिळकत करामध्ये ४० टक्के सवलत देण्याबाबत आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेणार आहेत.
पुढील काळात कौशल्य विकास प्रशिक्षण असेल तरच तरुणांना नोकऱ्या मिळतील. त्यामुळे शैक्षणिक संस्थानी कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करावेत. यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले
एकीकडे पुण्याला जागतिक दर्जाचे विकसित आणि एकूणच ऐतिहासिक, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर करण्यासाठी आधीच्या पिढीपासून ते आताच्या पिढीपर्यंत लोक सक्रिय दिसत असताना आता विरोधकांनीदेखील अचंबित होऊन तोंडात बोटे घालावी, अशी कामगिरी करण्यासाठी फडणवीस-शिंदे सरकार सज्ज झाले आहे. दोनच दिवसांपूर्वी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला झालेली राज्यातील ‘दोन राजे` आणि राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांची भेट ही विरोधकांची बोलती बंद करण्यास पुरेशी ठरते.
आदित्यंची 'निष्ठायात्रा' सरकार पाडूनच थांबेल!
उठता- बसता फुले शाहू आंबेडकर यांचा नावांचा वापर करायचा आणि दुसरीकडे देशाला प्रथमच एक वनवासी महिला राष्ट्रपती मिळत असताना त्यांचे पाय खेचायचे यातून विरोधकांचा पुरोगामीपणाचा बुरखा फाटलाय अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे
ओबीसींच्या राजकीय आरक्षणसंदर्भातील दिलेला शब्द आमच्या महायुती सरकारने पाळला, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला मान्यता दिली
द्रौपदी मुर्मूंना महाराष्ट्रातून भरघोस मतं मिळतील!
भाजपकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर झालेले श्रीकांत भारतीय यांनी विधानभवनात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला
राज्यसभा निवडणूक २०२२ महाराष्ट्रातून बिनविरोध व्हावी यासाठी मविआ आग्रही आहे.
"आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमचा उमेदवार मागे घेणार नाही" असा ठाम निर्धार भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. या ठाम निर्धाराने भाजपने महाविकास आघाडीकडून आलेला प्रस्ताव फेटाळून लावला आहे