बाबासाहेब उत्तम प्रशासक होते. त्यांनी विकासाचा पाया रचला. त्यामुळे बाबासाहेब हे आमचे राष्ट्रपुरूष आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, १४ एप्रिल रोजी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी दिनी चैत्यभूमी येथे अभिवादन केले.
Read More
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करावे. तसेच देशभरातून जयंती उत्सवासाठी चैत्यभूमीवर येणाऱ्या लाखो नागरिकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, ३ मार्च रोजी दिले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादर चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी माजी मंत्री भाई गिरकर यांनी काही मागण्या केल्या. या मागण्या मान्य करत अनुयायांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमी ( Chaityabhoomi ) येथे येतात. त्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. दरम्यान, महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुट्टी जाहिर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवरील सुविधांचा कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी आढावा घेतला. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखों अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. दरम्यान, त्यांच्यासाठी प्रशासनामार्फत विविध सोयीसुविधा केल्या जातात. डॉ. देशमुख यांच्यामार्फत या कामांची पाहणी करण्यात आली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येत्या ३ डिसेंबर २०२३ रोजी ‘चैत्यभूमी’ या सोमनाथ वाघमारे दिग्दर्शित माहितीपट कोलंबिया यूनिव्हर्सिटीत दाखवला जाणार आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटीमधील इन्स्टिटयूट फॉर कॅम्पाराटीव्ह सोसायटी अँड लिटरेचर या विभागातर्फे हा माहितीपट दाखवला जाणार आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांनी इंदू मिल स्मारकाच्या कामाचा आढावाही घेतला.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्ताने दि. १४ एप्रिल २०२३) रोजी चैत्यभूमीवर अनुयायांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असते. याअनुषंगाने मुंबई महानगरपालिकेने विविध नागरी सेवा - सुविधा पुरविण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. प्रामुख्याने चैत्यभूमी परिसरासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असणाऱ्या 'राजगृह' याठिकाणी आणि इतर महत्वाच्या ठिकाणी विविध सेवा सुविधा देण्यात येणार आहेत. चैत्यभूमीसह विविध ठिकाणी महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या सेवा - सुविधांबाबत वेळोवेळी महानगरपालिका आ
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिना निमित्त सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी साधेपणाने अभिवादन करण्याचे आवाहन केले आहे. जयंती उत्साहात आणि प्रथा परंपरेनुसार शासन स्तरावरही साजरी करण्यात येईल. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता, घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जावे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १५ ऑगस्ट १९३६ साली ‘इंडियन लेबर पार्टी’ची स्थापना केली. समाजातील सरंजामी, भांडवली व जातीयवादी मनोवृत्तीच्या विरुद्ध कामगारांना न्याय मिळवून देणे व कामगार वर्गामध्ये असलेला जातीवाद नष्ट करणे, असे ‘इंडियन लेबर पार्टी’चे मुख्य उद्दिष्ट होते, तसेच मुंबईमधील कापड गिरणीमध्ये काही खात्यामध्ये अस्पृश्य जातीच्या कामगारांना काम दिले जात नव्हते.
काही जण म्हणतात की, “तू कसं असं म्हणतेस? किन्नरांच्या म्हणजे तृतीयपंथीयांच्या जीवनात काही बदल झाला का? कालही तसेच होते, आजही तेच आहेत.” पण, मी, अभिमानाने सांगते की, “बाबासाहेबांच्या कायद्यामुळे आज आम्ही सुरक्षित आहोत. माणूस म्हणून आम्ही जगत आहोत. माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या सुविधा मिळायला हव्यात, त्या सर्व बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने देशातील सर्वांना मिळाल्या आहेत. त्या बापाला, भीमाला वंदन.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार