भारताने इराणबरोबर चाबहार पोर्टसाठी १० वर्षांचा करार केला होता. चाबहार पोर्टच्या या करारामुळे भारताच्या औद्योगिक संधीत मोठी वाढ झाली आहे.जागतिक पातळीवरील या पोर्टचे भौगोलिक स्थान महत्वाचे असल्याने भारताची व्यापारी झेप जगभर वाढणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लॉजिस्टिकसदृष्ट्या भारताला मध्य आशियात व्यापार करणे सुलभ होणार असल्याने कार्गो वाहतूकीत मोठा लाभ होणार असल्याचे इंटेलिजन्स संस्था ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशेटिव (GTRI) या संस्थेने म्हटले आहे.
Read More
युक्रेन युद्धानंतरही भारताने रशियाकडून तेल विकत घेणे सुरूच ठेवले होते. तेव्हा अमेरिकेला भारताविरोधात निर्बंध लागू करता आले नव्हते. आता इराणने इस्रायलविरोधात लष्करी कारवाया केल्यानंतरही भारताने इराणशी आर्थिक करार केल्यामुळे अमेरिकेचे पित्त खवळले आहे. पण, अमेरिकेचा दरारा घटत चालला असून वेगाने आत्मनिर्भर होणार्या भारतासारख्या देशावर अमेरिकेचा चाबूक चालत नसल्याचे दिसून येते.
इराणमधील चाबहार बंदराचे नियंत्रण पुढील दहा वर्षे भारताकडे असणार आहे. भारत आणि इराण दरम्यान यासंदर्भात करार झाला असून, त्यामुळे भारताला मध्य आशियासह अफगाणिस्तानात थेट प्रवेश मिळाला आहे. इराणबरोबर करार केल्यामुळे अमेरिकेच्या नाकाला मिरच्या झोंबल्या असल्या, तरी भारताने अमेरिकेकडे दुर्लक्ष करत हा करार प्रत्यक्षात आणला.
पश्चिम आशियातील महत्त्वाचा देश असलेल्या इराणचे चाबहार बंदर भारत चालवणार आहे. यासाठी भारत आणि इराणमध्ये १० वर्षांचा करार होत आहे. भारत आणि इराणमधील या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी भारताचे बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल सोमवार, दि. १३ मे २०२४ इराणच्या दौऱ्यावर गेले आहेत.
इस्रायल-‘हमास’ युद्ध सुरू झाल्यापासून जागतिक राजकारणात पश्चिम आशिया क्षेत्र केंद्रस्थानी आले. इस्रायल-‘हमास’ युद्ध, गाझा पट्टीतील छोट्याशा भूभागावर लढण्यात येत असले तरी, या युद्धाचे राजकीय, आर्थिक परिणाम संपूर्ण जगाला भेडसावत आहेत. पश्चिम आशियातील प्रादेशिक शक्ती विरूद्ध जागतिक महाशक्ती असा संघर्षही इस्रायल-‘हमास’ युद्धामुळे उफाळून आला. यात जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होताना दिसतात.
अफगाणिस्तानच्या मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत झाकिया वर्दक यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. अफगाणिस्तानची मुंबईतील पहिली महिला वाणिज्यदूत असल्याचा अभिमान वाटत असल्याचे सांगून झाकिया वर्दक यांनी आपल्या कार्यकाळात भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे राज्यपालांना संगितले.
शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, हे सार्वकालिक सत्य सर्वांनाच माहिती असेल. आंतरराष्ट्रीय राजकारणातही या रणनीतीचा वापर करून शह-काटशहाचे डावपेच आखले आणि तडीसही नेले जातात. आता भारतानेदखील याच नीतीचे अनुसरण करत पाकिस्तानला तगडा झटका दिल्याचे दिसते. देशोदेशी कटोरा घेऊन भीक मागण्यापर्यंत अधःपतन झालेल्या पाकिस्तानचे भारताने उत्पन्नाच्या व व्यापाराच्या पातळीवर दात घशात घालण्याचे काम केले आहे. पाकिस्तानचा शेजारी देश म्हणजेच अफगाणिस्तानबरोबरील व्यापार घटून निम्म्याच्याही खाली आल्याचे नुकतेच समोर आले असून त्याला कारण ठरल
भारत, इराण आणि अफगाणिस्तानच्या सहकार्याने इराणमधील चाबहार बंदर विकसित करण्यात आले. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर अफगाणिस्तान आणि इराणशी भारताचे संबंध अधिक मैत्रीपूर्ण झालेच. पण, या दोन्ही देशांशी व्यापार वाढवण्यासाठी भारताने चाबहार बंदरातील जेट्टी आणि तेथील आर्थिक क्षेत्रात उद्योगधंदे, खासकरून लोखंड शुद्धीकरणाचा कारखाना उभारायचे काम हाती घेतले.
चाबहार हे केवळ बंदर चालविण्याचे काम नाही. सगळ्यानांच लाभ मिळवून देण्याची क्षमता असलेला हा प्रकल्प आहे. भारताच्या मूळ हेतूविषयी कुठल्याही राष्ट्राला शंका नसल्याने यातून जे काही आकारास येईल ते ‘भारत भाग्यविधाता’ या राष्ट्रगीताल्या शब्दाचा एक वेगळा अर्थ निर्माण करेल, असा आशावाद बाळगायला हरकत नाही.
अमेरिकेने इराणबरोबर केलेला अणु करार रद्द करण्याविषयी केलेल्या घोषणेनंतर अमेरिकेने इराणवर नवीन बंधने लाधली आहेत. या बंधनामुळेच भारत इराणमध्ये गुंतवणूक करत नसल्याची भीती इराणला वाटत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून रशियाच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात ते रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत.