केंद्र सरकारच्या 'स्वच्छ सर्वेक्षण-२०२३' पुरस्कारात महाराष्ट्राने बाजी मारली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गुरुवार, दि. ११ जानेवारी रोजी महाराष्ट्राला ‘बेस्ट परफॉर्मन्स स्टेट’चा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. या यशासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेचे, महानगरपालिका, सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतींचे अभिनंदन केले आहे.
Read More
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत नवी भरती केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात भारत इलेक्ट्रॉनिक्सकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अॅप्रेंटिसशीपसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती करण्यात येणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दक्षिण प्रदेशातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत नवी भरती केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात रेल्वेकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अॅप्रेंटिसशीपसाठी येत्या दि. १० जानेवारीपासून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तसेच, या अॅप्रेंटिसशीपकरिता इच्छुक उमेदवारांना अर्ज करावयाचा आहे.
रस्ते अपघात आणि मृत्यूचा वाढता आलेख अतिशय भीतीदायक आहे. हिटअॅण्ड रन प्रकरणांमध्ये त्यांचाही वाटा आहे. रस्त्यावरील अपघातांना आळा घालण्यासाठी कठोर तरतुदी का हव्यात, याचे उत्तर प्रदेशात होणार्या रस्ते अपघातांची संख्या पाहून मिळू शकते. या संदर्भात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची आकडेवारी धक्कादायक आहे.
'रेल विकास निगम लिमिटेड'अंतर्गत विविध पदांकरिता अधिसूचना जारी करण्यात आली असून विविध पदांकरिता अर्ज करता येणार आहे. रेल विकास निगम लिमिटेडमधील विविध रिक्त पदांकरिता अर्ज मागविण्यात येत असून या भरतीद्वारे एकूण ०४ रिक्त पदे भरली जाणार आहेत. रेल विकास निगम अंतर्गत काम करु इच्छिणाऱ्यांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
भारत इलेक्ट्रॉनिकस लिमिटेड(बीईएल) अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. भारत इलेक्ट्रॉनिकस लिमिटेड अंतर्गत एकूण ५७ रिक्त जागांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 'भारत इलेक्ट्रॉनिकस लिमिटेड'अंतर्गत होणाऱ्या भरतीद्वारे प्रकल्प अभियंता, प्रशिक्षणार्थी अभियंता या पदांवर नियुक्त्या केल्या जातील. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ५ जानेवारी २०२४ असणार आहे.
ज्या बंगालमधून राजा राममोहन रॉय यांनी बालविवाह, सतीप्रथेविरोधात मशाल पेटवली, आज त्याच प. बंगालमध्ये बालविवाहाचे प्रमाण देशात सर्वाधिक असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे ममता सरकारने बालविवाह रोखण्यासाठी राबविलेल्या, ‘कन्याश्री योजने’तील गलथानपणा या कोवळ्या कळ्यांना खुडणाराच म्हणावा लागेल.
मागील दशकात भारतीयांच्या मनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अक्षरश: गारूड केले. मोदींच्या अफाट लोकप्रियतेचा अन्वयार्थ राजकीय पंडित आपापले ठोकताळे वापरुन लावत असले तरी, मोदींच्या लोकप्रियतेचे, भाजपच्या विजयाचे एक कारण मोदींच्या आर्थिक धोरणात दडले आहे. याच आर्थिक धोरणांचा म्हणजेच लोककल्याणकारी ‘मोदीनॉमिक्स’चा घेतलेला हा आढावा...
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था(एम्स) अंतर्गत विविध पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एम्स नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दरम्यान, पदवीधरांना एम्स, नागपूर येथे नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरण अर्थात एयरपोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडिया अंतर्गत लवकरच भरती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधरांना नोकरीची संधी मिळणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणांतर्गत 'एअर ट्राफिक कंट्रोल' या विभागाच्या एकूण ४९६ जागा भरल्या जाणार आहेत.
भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग अर्थात (कॅग) अंतर्गत मोठी भरती केली जाणार आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. दरम्यान, भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागांतर्गत १,७७३ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट cag.gov.in ला भेट द्या.
भविष्य निर्वाह निधीचे २०२२-२३ चे वार्षिक लेखा विवरण सेवार्थच्या https://sevaarth.mahakosh.gov.in या संकेतस्थळावर कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले असून त्याची प्रत्यक्ष प्रत (हार्ड कॉपी) देणे थांबविल्याचे महालेखाकार कार्यालयाने प्रसिद्धी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या विकास आयुक्त (हस्तकला) यांच्या कार्यालयअंर्तगत नागपूर येथील हस्तकला विकास केंद्रातर्फे हस्तकला कारागिरांच्या श्रेणीसाठी ‘शिल्प गुरू व राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार-2018’ याकरीता अर्ज आमंत्रित करण्यात येत आहे.