मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या यांच्या एका कथित व्हिडीओवरून विरोधी पक्षातर्फे धुमाकूळ घातला जात आहे. मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनातही या घटनेचे पडसाद उमटले असून विरोधकांनी या प्रकरणी आरोपांची राळ उठवली आहे. यावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली असून 'त्या' कथित व्हिडीओ प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणार असल्याचे जाहीर केले आहे.
Read More
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी कोण विराजमान होणार? यामुळे महाविकास आघाडीत सध्या चांगलाच तणाव निर्माण झाला आहे. 'विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळावं', असा दावा महाराष्ट्र काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी केला होता. मात्र उद्धव ठाकरेंनी गुरुवारी (दि. १० ऑगस्ट) ठाकरे गटातील आमदार अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेते पदासाठी शिफारस केल्याने त्यांची वर्णी लागली. त्यामुळे ठाकरेंच्या याच निर्णयामुळे सध्या आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या मित्रपक्षांकडून नाराजीचे वारे वाहताना दिसतायत. इतकंच नव्हे तर ठाकरे गट