देशातील जनता केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेत भारतीय म्हणून एकसंघ होत असताना, स्वतःला पुरोगामी, निधर्मी म्हणवून घेणारी काँग्रेस जातीपातीच्या लेबलखाली पुन्हा त्यांना विभागण्याचे पाप करत आहे. मध्य प्रदेशात भाजपचा वाढता जनाधार हा विकासाभिमुख राजकारणाचे फलित असल्याने, निवडणुका जिंकण्यासाठी पुन्हा एकदा जातीय जनगणनेचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे.
Read More
देशातील प्रमुख मुस्लिम संघटना जमियत-उलेमा-ए-हिंदने देशातील कथित वाढत्या जातीयदावादावर चिंता व्यक्त केली आहे. अल्पसंख्याकांच्या विरोधात वैरभाव पसरविण्याचा प्रयत्न होत असताना सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकाने देशातील बहुसंख्य समुदायाच्या मनात अल्पसंख्यांकांविषयी विष कालविल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
एकंदरीतच हा बुरखे फाटण्याचा मोसम अजून किती काळ चालणार हे पाहावे लागेल. कारण, यांचे बुरखे फाटून त्याची लक्तरे निघत नाहीत, तोपर्यंत यांना अस्सल मानणार्यांचेही डोळे खाडकन उघडणार नाहीत.
‘ना जात, ना धर्म’ असे प्रमाणपत्र एका महिलेने मिळविले आहे. स्नेहा असे या महिलेचे नाव असून असे प्रमाणपत्र मिळविणारी ही पहिली भारतीय महिला आहे.
भाजपवर जातीयवादाचा आरोप करून त्याला पराभूत करता येईल, असे विरोधकांना वाटत असेल तर तो भ्रम आहे. कारण, जातीयवादाचा आजवर आरोप होऊनही भाजप मागच्या निवडणुकीत जिंकला, याचे कारण या आरोपातील फोलपणा आता लोकांच्या लक्षात आला आहे. आता नवी परिस्थिती निर्माण झाली आहे. भूतकाळातील डावपेचांनी त्याला उत्तर देता येणार नाही.
श्रीमंत कोकाटेसारख्या जातीयवादी व्यक्तीला सोबत घेऊन प्रकाश आंबेडकर खुद्द बाबासाहेबांच्या विचारांनाच हरताळ फासण्याचे काम करीत आहेत. ‘एक विरुद्ध दुसरा’ उभे करण्याचे हे राजकारण महाराष्ट्रासाठी घातक आहे.