अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरूद्ध एक हजारावा एकदिवसीय सामना खेळल्याने भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. क्रिकेटविश्वात एक हजारावा एकदिवसीय सामना खेळणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. एक हजार सामने खेळणे हे क्रिकेटविश्वात आतापर्यंत केवळ भारतालाच शक्य झाले आहे. हे केवळ भारतालाच का जमले, याचाही विचार होणे तितकेच गरजेचे आहे.
Read More
तुमच्याकडे दोन हजारांची नोट असेल तर ती आत्ताच खपवा, असे व्हायरल मेसेज गेल्या काही दिवसांत तुम्हालाही मिळाले असतील. दोन हजारांची नोट एटीएममधून बाहेर येण्यास अडचण येत असल्याने त्याऐवजी आता आरबीआय एक हजाराची नवी नोट आणणार असल्याचेही या मेसेजमध्ये सांगण्यात आले असेल पण खरेच दोन हजारांची नोट बंद होणार आहे का ? तुमच्याकडे असलेल्या दोन हजारांच्या नोटा तुम्हाला बदलाव्या लागणार आहेत का ? वाचा सविस्तर...