(Tahawwur Rana Extradition) २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी तहव्वूर राणाचे अखेर गुरुवारी १० एप्रिल रोजी तब्बल १७ वर्षांनी भारतात यशस्वी प्रत्यार्पण झाले आहे. तत्पूर्वी, अमेरिकेने कडक सुरक्षेत कॅलिफोर्नियामध्ये राणाला भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देतानाचे फोटो आता समोर आले आहेत. त्यांचे विमान संध्याकाळी ६.२२ वाजता दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरले. त्यानंतर, वैद्यकीय तपासणीनंतर त्याची रवानगी एनआयए कोठडीत करण्यात आली आहे.
Read More
अमेरिकेतील हिंदू मंदिरांमध्ये तोडफोडीच्या, तसेच हिंदुंवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाल्याचे नुकतेच निदर्शनास आले होते. यामुळे हिंदू अमेरिकी नागरिकांमध्ये, काळजीचे वातावरण असणे साहजिकच आहे. अशातच अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील नागरी हक्क विभागाने, एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. दि. २० मे रोजी प्रसिद्ध झालेल्या या ५६० पानांच्या अहवालातून समोर आलेल्या आकडेवारीने, अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. कारण धार्मिकदृष्ट्या हिंदुंविरोधी द्वेषाचे गुन्हे कॅलिफोर्नियातील दुसर्या क्रमांकाचे सर्वाधिक नोंदविल
नुकतेच अमेझॉन कंपनीचे ओटीटी प्लॅटफॉर्म ( अमेझॉन प्राईम व्हिडिओ) अडचणीत सापडला आहे. अमेझॉन प्राईम व्हिडिओवर हातचलाखीचा आरोप करत एफटीसी या संस्थेने कॅलिफोर्निया फेडरल कोर्टात गुन्हा दाखल केला आहे. प्राईम व्हिडिओवर ग्राहकांना पूर्वीच वार्षिक वर्गणी भरूनदेखील ' जाहिरात सपोर्टेड प्लॅन' दाखवून विना जाहिरात नवीन प्लॅनसाठी अधिक पैसे भरण्याची मागणी केल्याचा आरोप अमेझॉन प्राईम व्हिडिओवर करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात अमेझॉन प्राईमने आपले धोरण बदलत' अँड सपोर्टेड' योजना घोषित केली होती.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये दुसऱ्यांदा हिंदू मंदिरावर हल्ला झाला आहे. यावेळी हेवर्ड येथील शेरावली मंदिरात ही घटना घडली. १४ दिवसांतील हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी नेवार्कमधील मंदिरावर हल्ला झाला होता.
कोरोना काळात नोकरीच्या निमित्ताने कार्यालयात जाणे जवळपास दुरापास्त झाले होते. त्यामुळे वर्क फ्रॉम होम ही संकल्पना नावारुपाला आली. त्यानंतर आजमितीस मोजक्या आयटी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा अद्याप उपलब्ध आहे. परंतु, याच वर्क फ्रॉम होम संकल्पनेमुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) एलॉन मस्क यांनी दि. २० जून रोजी सांगितले की, इलेक्ट्रिक कार निर्मात्यांना भारतात लवकरात लवकर गुंतवणूक करू इच्छिते. तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर मस्क यांनी ही माहिती दिली.टेस्लाच्या भारतात गुंतवणूक करण्याच्या योजनांबद्दल विचारले असता मस्क म्हणाले की, "मला खात्री आहे की टेस्ला भारतात असेल आणि ते शक्य तितक्या लवकर गुंतवणुक करेल" तसेच पंतप्रधान मोदींनी दिलेल्या समर्थनाबद्दल मस्क यांनी आभार मानले.
राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. तिथे भारतीयांना संबोधित करण्याचा काम ते करत आहेत. त्यावेळी दि. ३१ मे रोजी कैलिफोर्निया येथे खलिस्तानी झेंडे फडकवले गेले. दरम्यान राहुल गांधीच्या एका कार्यक्रमातील व्हिडीओ सोशलमीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात भारताचे राष्ट्रगीत सुरू असते पंरतू तिथे उपस्थित असलेले कोणीही राष्ट्रगीतसाठी उभे राहत नाही.
चीन आणि तैवान असा संघर्ष पेटवून अमेरिकेला तैवानला मोठ्या प्रमाणात संरक्षण सामग्री विकावयाची आहे. अशा आक्रमणाची भीती दाखवून तैवानच्या शेजारी असणार्या देशांना ही संरक्षण सामुग्री विकण्याचा अमेरिकेचा मनसुबा आहे
अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली ही बँक दिवाळखोरीत निघाली आहे. कॅलिफोर्नियाच्या डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल प्रोटेक्शन अँड इनोव्हेशनने बँक बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. बँक दिवाळखोरीत गेल्यानंतर बँकेची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
कॅलिफोर्नियातील १३ शहरांमध्ये बर्फाच्या वादळामुळे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. वादळात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. बर्फवृष्टीमुळे ७० हजारांहून अधिक घरांमध्ये वीज नसून व्यवहार ठप्प आहेत.
अमेरिकेच्या पश्चिम भागात यंदा भयंकर दुष्काळ पडला आहे. राज्यांची पाणी पूर्तता करणार्या धरणांनीही तळ गाठला. त्यामुळे शेती व्यवसाय कोलमडून गेला. उद्योगधंदे बंद करावे लागले. सरकारने यंदाचा दुष्काळ इतिहासातील सर्वात मोठा दुष्काळ जाहीर करावा, या दुष्काळग्रस्त भागाला विशेष मदत जाहीर करावी. वेळीच यावर उपाययोजना केली नाही, लक्ष दिले नाही, तर या समस्येमुळे खूप प्रश्न निर्माण होऊ शकतात, अशी मागणी दहा गव्हर्नरांनी अमेरिकेच्या राष्ट्रपतींकडे केली. ही बातमी कुठली असेल?
इन्स्टाग्रामवर कुठल्याही प्रकारची शिविगाळ करणारा किंवा DM करताना अश्लील संदेश पाठवणाऱ्याला युझरवर कडक कारवाई केली जाणार आहे. इन्स्टाग्रावर आता अशा युझर्सवर नजर ठेवून आहे. इंस्टाग्राम आपल्या नियमावलींमध्ये आमुलाग्र बदल करण्याच्या तयारीत आहे. एखाद्या युझरबद्दल रिपोर्ट केल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी लागणारे आवश्यक पुरावे दिल्यानंतर त्याचे अकाऊंट कायमचे बंद करण्याचा निर्णय इन्स्टाग्राम करणार आहे.
आयफोन वापरणाऱ्या युझरने कंपनीला कोर्टात खेचले
कॅलिफोर्निया स्टेट असेंब्लीकडून सुशांतला मरणोत्तर पुरस्कार!
मार्केट वॉच या संस्थेच्या अनुसार, 'कॅलिफोर्नियामध्ये मेनलो पार्क स्थित फेसबूक मुख्यालयाची किंमत ही २.४ दशलक्ष डॉलर इतकी आहे. फेसबूकच्या एका अंतर्गत सर्वेक्षणानुसार, कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारण्यात आला होता जर त्यांना अन्य ठिकाणी जाऊन काम करण्याची संधी मिळाली तर त्यांची तयारी आहे का यावर ६० टक्के लोकांनी होकार दर्शवला होता.'
आर्यांचं मूळस्थान मानलं गेलेल्या पश्चिम आशियाई नागरिकांचे जीन्स या दोघांपेक्षा भिन्न आहेत. तेव्हा आर्यांनी आक्रमण तर केलेलंच नाही; पण त्यांनी स्थलांतर केलं, असे म्हणणेसुद्धा अशास्त्रीय आहे, असे कॅलिफोर्निया अभ्यासक्रम समितीच्या प्रमुखांनी विट्झेल आणि थापर यांना सांगितलं. यावर त्या दोघांनाही काहीच बोलता आलं नाही.
अंधश्रद्धेमुळे जगभरात अनेक जणांचा बळी जातो. अज्ञान, भीती वगैरेही कारण असली तरी अंधश्रद्धेच्या पोटी बळी जाणारी नेहमी लहान मुलं, महिला नाहीतर वृद्धच असतात, हे मात्र जगभरातले वैशिष्ट्य आहे.
'एचपी रोबोकॉप'ला लॉस एंजेलिस शहरापासून १० किमी अंतरावरील ५० हजार लोकसंख्येच्या हंन्टिंग्टन उद्यानाजवळील रस्त्यावर तैनात करण्यात आले आहे. 'एचपी रोबोकॉप'च्या तैनातीचा हा प्रयोग यशस्वी ठरल्यास लॉस एंजेलिस आणि कॅलिफोर्नियासह संपूर्ण अमेरिकेत 'रोबोकॉप' तैनाती केले जातील.
कुणी म्हणालं, कोकणचा कॅलिफोर्निया करू, कोणी अजून काही करू म्हणालं. पण, तो कसा, हे कोणीही सांगू शकलं नाही. कोकणात उद्योग आणावेत, की कोकणाची बागायती विकसित करावी, की पर्यटन विकसित करावं, यावरून अनेक वाद झाले. प्रत्यक्षात काहीच धड विकसित झालं नाही. बरं, याचं कुणाला काही पडलंदेखील नव्हतं. विकासासाठी, मूलभूत प्रश्नांसाठी इथे कधी तीव्र आंदोलन वगैरे उभारलं गेलंय, असं झालं नाही..