Narendra Modi and M. K. Stalin कोणत्याही मुख्यमंत्र्याचा केंद्र सरकारच्या ध्येय-धोरणांना विरोध असला, मतभेद असले तरी संघराज्य व्यवस्थेत काही राजकीय संकेतांचे पालन हे क्रमप्राप्तच. पण, द्रमुकचे सर्वसर्वा आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवत, राजकीय संकेतांची प्रथा सत्तालालसेच्या द्रविडी राजकारणापोटी पायदळी तुडवली. याउलट मोदींनी तामिळनाडू दौर्यातून तामिळी जनतेला योग्य तो संदेश देत तामिळींची मनेही जिंकून घेतली. संस्कार, संवाद आणि सौहार्दाच्या त्र
Read More
(Tamil Nadu drops official Rupee Symbol from State Budget) तामिळनाडूमधील एमके स्टॅलिन यांचे सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भाषेच्या मुद्द्यावर तणावाचे वातावरण आहे. यात आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (M K Stalin) यांच्या निर्णयामुळे हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. तामिळनाडू सरकारने राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये रुपयाच्या चिन्हाऐवजी (₹) तमिळ भाषेतील रुबई मधील पहिले अक्षर ‘रु’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
सांगण्यासारखे काही नसेल, तेव्हा माणूस आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्त्वाच्या कथा सांगतो. राजकारणातही मतदारांच्या रोषापासून सुरक्षित राखण्यासाठी सत्ताधारी नेते प्रादेशिक अस्मिता आणि भाषेचा सोपा मुद्दा उपस्थित करतात. तामिळनाडूच नव्हे, तर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भाषेचा मुद्दा राजकारणात आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. पण, ‘दक्षिण विरुद्ध उत्तर’ वगैरे तणाव हे भारतविरोधी ‘सोरोस टूलकिट’चा भाग आहेत, हे आता जनतेला कळून चुकले आहे.
Amit Shah तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी हिंदी भाषेविरोधात फतवा काढला असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. हिंदी भाषेमुळे तमिळ भाषेकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्टॅलिन यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: एमके स्टॅलिन यांना सांगितले की, राज्यात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण हे तमिळ भाषेत सुरू करावे. ७ मार्च २०२५ रोजी रानीपेट जिल्ह्यातील थाकोलममधील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ५६ व्या स्थापन दिनाच्या समारंभात अमित शाह यांनी संबोधित केलं.
MK Stalin भारतात पुढील वर्षी म्हणजेच २०२६ मध्ये मतदारसंघात परिसमीन होणार आहे. या अंतर्गत लोकसंख्येच्या आधारे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जागांची संख्या आणि मतदारसंघांच्या सीमा पुन्हा निश्चित करण्यात आल्या आहेत. तामिळनाडू मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी यावर राजकारण सुरू असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे तामिळनाडू लोकसभेत कमी जागा होतील, असा दावा स्टॅलिन यांनी केला. सध्या तामिळनाडूत लोकसभेत ३९ जागा आहेत.
आपलीही मुलं महागड्या शाळांमध्ये शिक्षण घेतात. तिथेही हिंदी, इंग्रजी आणि तमिळ भाषेचे ज्ञान दिले जाते. याला आता अन्नामलाईंनी द्रमुकचे ढोंग आहे का? प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सुनावले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० वरून तामिळनाडूत मोठा वादंग निर्माण झाला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे नेते एमके स्टॅलिन यांनी या धोरणाविरूद्ध आवाज उठवला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे धोरण तामिळनाडूवर हिंदी भाषा लादण्याचे षडयंत्र असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
देश प्रगतीच्या दिशेने पुढे जात असताना, काही जण मात्र जनतेला जुन्या चौकटीतच अडकवण्याचा कट रचत आहेत. ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ हे भारतीय शिक्षण प्रणालीला आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणारे धोरण आहे. मात्र, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी या धोरणाला विरोध करत विद्यार्थ्यांचे भविष्यच अंधारात ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
MK Stalin मधमाश्यांच्या पोळावर दगड मारू नये. हे प्रकरण भडकवू नये असा दावा आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी केले आहे. मोदी सरकारने आणलेल्या राष्ट्रीय धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे. भाषिक आधारावर द्वेष पसरवण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असल्याचा बेताल दावा स्टॅलिन यांनी केला आहे. त्यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही तमिळनाडू सरकारवर सुधारणांप्रति रुपांतरीत करण्याचा आरोप करण्यात आला आहे.
साम्यवाद हा वरवर दिसायला छान वाटला, तरी त्याच्या मायावी चेहर्यामागे एक क्रूर चेहरा लपलेला आहे. त्याचीच जाणीव जगाला झाल्याने, जगभरामध्ये साम्यवादाचा पराभव झाला. त्याने, साम्यवाद संपला नाही, उलटपक्षी नवीन अत्यंत सौम्य पण, तितकेच घातक रूप घेऊन पुन्हा आला आहे. साम्यवादाच्या क्रूर चेहर्याबाबतचे सत्य उलगडणारा हा लेख...
भारताचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव जगासमोर मांडणार्या स्वामी विवेकानंद यांच्या समाधीस्थानाचे दर्शन संधी असून देखील राजकारण म्हणून स्टॅलिन ( CM Stalin ) यांनी चुकवले. त्यामुळे देशभरातील हिंदूंच्या श्रद्धेला ठेच पोहोचली आहे. तसेच द्रमुक नेत्यांच्या हिंदूविरोधी मानसिकतेचे दर्शनदेखील झाले आहे.
तामिळनाडू विधानसभा आणि वाद आता नित्याचेच समीकरण झाले आहे. हुकूमशाहीला आपलसे करणार्या स्टॅलिन ( Stalin Government ) पिता-पुत्रांमुळे, तामिळनाडू अंधकारात जात आहे. संविधानिक पदांचा सन्मान करण्याचा विसर तर या पिता-पुत्रांना कधीच पडला आहे. राज्यपालांचा अपमान करण्याची सवयदेखील आता त्यांच्या अंगवळणी पडली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तामिळनाडू विधानसभेचे अधिवेशन, राज्यपाल आर.एन. रवी यांच्या अभिभाषणाने सुरू होणार होते. मात्र, राष्ट्रगीताचा अपमान झाल्याने राज्यपालांनी अभिभाषण करणे टाळले आणि सभागृह सोडले. सर्
चेन्नई : तामिळनाडूतील कोयंबटूर येथे इस्लामी आतंकवादी एस ए बाशा याच्या अंत्ययात्रेला २००० पोलिस आणि २०० आरएएफ जवानांची तैनाती करण्यात आली. एसए बाशाला कोयंबटूरमध्ये १९९८ साली झालेल्या धमाक्याचा मास्टरमाइंड म्हणून ओळखले जाते. ज्याने ५८ भारतीयांना जीवे मारले त्या दहशतवाद्याच्या अंत्यविधीला स्टॅलिन सरकारच्या ( Stalin Govt. ) अनेक आमदार-नेते-अभिनेते आणि अल्पसंख्याक जमावाने हजेरी लावली. तिथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळाला.
मुंबई : तमिळनाडू सरकारने केंद्र सरकारची ‘पंतप्रधान विश्वकर्मा योजना’ तमिळनाडूमध्ये लागू करण्यास लाल कंदील दाखवला आहे. केंद्र सरकारची ‘पंतप्रधान विश्वकर्मा योजना’ जातीच्या आधारावर भेदभाव करणारी असल्याचा ठपका तामिळनाडूतील स्टॅलिन ( Stalin ) सरकारने ठेवला आहे.
तामिळ अस्मितेच्या भांडवलावर राजकीय पोळ्या शेकणार्या मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी आता आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तामिळींनी 16 मुले जन्माला घालावीत, असे आवाहन त्यांनी नुकतेच केले. राज्याची लोकसंख्या वाढली की, तामिळनाडूत लोकसभेच्या जागाही वाढतील, हा त्यामागचा पराकोटीचा स्वार्थी विचार. या नेत्यांना महिला या मुले जन्माला घालणारे कारखाने आहेत, असे वाटते काय? राजकीय स्वार्थासाठी हक्काची मत‘पेढी’ निर्माण करण्यासाठी नवी ‘पिढी’ जन्माला घालण्याचा स्टॅलिन यांचा अनाहुत सल्ला हा केवळ अमानुषच म्हणता येईल.
तामिळनाडू बहुजन समाजवादी पक्ष(बसप) प्रमुख के आर्मस्ट्राँग यांच्या हत्येच्या तपास प्रकरणी तामिळनाडू सरकार गंभीर नसल्याचा आरोप बसप अध्यक्षा मायावती यांनी केला आहे. दरम्यान, तामिळनाडूमध्ये कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिली नसून हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची मागणी मायावती यांनी केली आहे.
तामिळनाडूच्या कल्लाकुरीची जिल्ह्यात बुधवार, दि.19 जून रोजी एका रात्रीत 37 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विषारी दारू प्यायल्याने या 37 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज कल्लाकुरीची जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. एस. प्रशांत यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय, जिल्ह्यातील जवळपास 100 पेक्षा अधिक जणांना उपचारांसाठी रुग्णालयांत दाखल केले आहे. याव्यतिरिक्त पुदुच्चेरीमध्येही 15 जणांना विषारी दारू प्यायल्याने अस्वस्थ वाटू लागल्यानंतर रुग्णालयांत दाखल केले आहे. उपचार घेत असलेल्यांपैकी काहींची प्रकृती चिंता
पराभव समोर दिसू लागला की, भल्याभल्यांचे संतुलन बिघडते आणि ते असंबद्ध बडबड करू लागतात. काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते त्याचे सर्वोत्तम उदाहरण. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम यांना देशद्रोही ठरवत कसाबचा केलेला उदोउदो काँग्रेसच्या अंगाशी आला असताना, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही योगी आदित्यनाथ यांच्याविषयी बेताल वक्तव्य करून देशवासीयांचा रोष ओढवून घेतला.
‘परक्यांचा होता हल्ला, प्रत्येक घर बने किल्ला, हे कोटि कोटि भुजदंड, बनतील इथे ध्वजदंड, छातीची करूनि ढाल, लाल या संगिनीस भिडवू’ या कवितेतला क्षात्रतेजाचा स्फुल्लिंग फक्त कवितेपुरता न राहता, तो समाजात प्रत्यक्ष प्रकटलेला दिसू लागला. भारताच्या हितशत्रूंना चिंता वाटावी, असे ते दृश्य होते. अरे, या हिंदूंंना अहिंसा, शांती, विश्वप्रेम, अलिप्तता वगैरे नामर्द बनवणार्या गेल्या १९२१ सालापासून चारतोय. पण, एक लढाई काय झाली अन् हे त्यांच्या मूळ सिंह स्वभावाप्रमाणे गर्जना करीत उठले की!
मोदी सरकार देशातील भ्रष्टाचाराविरोधात लढा देत आहे, तर द्रमुक आणि काँग्रेस भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्यासाठी एकत्र येत आहेत; असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूमध्ये केला. लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूमधील वेल्लोर आणि मेट्टुपालयम येथे जाहिर सभांना संबोधित केले.
नुकताच द्रमुकने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, त्यातील आश्वासने पाहिल्यावर हा कालचक्र उलटे फिरविण्याचा आणि राजकीय सूड उगविण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येते. या जाहीरनाम्यात मोदी सरकारने घेतलेले अनेक निर्णय उलटे फिरविण्याचा निर्धार द्रमुकने केलेला दिसतो. गंभीर बाब म्हणजे, हा जाहीरनामा केवळ द्रमुकचा नसून, तो ‘इंडी’ आघाडीचाही आहे, असे स्टॅलिन यांचे म्हणणे. खरंच जर तसे असेल तर या आघाडीतील काँग्रेस व अन्य पक्षांनाही हा जाहीरनामा मान्य आहे का, हाच खरा प्रश्न.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) मंत्री उदयनिधी स्टॅलिनला बिहारमधील अराह जिल्ह्यातील मुख्य न्यायदंडाधिकारी (सीजेएम) न्यायालयाने सनातनवर केलेल्या टिप्पणीबद्दल समन्स बजावले आहे. उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे कोर्टाने म्हटले आहे. स्टॅलिनला दि. १ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. न्यायालयाने याप्रकरणी भादंवि कलम २९८ अन्वये दखल घेऊन कार्यवाही सुरू केली आहे.
तामिळनाडूच्या राजकारणात पहिल्यापासूनच एक सशक्त ब्राह्मणविरोधी प्रवाह आहे. अलीकडच्या काळात ब्राह्मणविरोधाने हिंदू म्हणजे सनातन धर्मविरोधी रूप घेतले. भाजप केंद्रात सत्तेत आल्यापासून, देशात हिंदू परंपरांना नव्याने आदर मिळायला लागला असताना, तामिळनाडूत हिंदूविरोधी राजकारणानेही उसळी मारली. तामिळनाडूत भाजपच्या वाढत्या जनपाठिंब्याचा हा परिणाम. पण, सनातन धर्माचा आंधळा विरोध हा घटनाद्रोह आहे, याची जाणीव आता तेथील नेत्यांना न्यायालयानेच करून दिली, हे स्वागतार्ह.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या समर्थकांनी लावलेला पोस्टर्समुळे त्यांचीच फजिती झाली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी एमके स्टॅलिन यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोस्टर्स लावले होते. पण त्यांनी या पोस्टरमध्ये मोठी चूक केली. त्यामुळे सोशल मिडियावर त्यांच्या पक्षाला ट्रोल केले जात आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दि. ३ मार्च २०२४ रविवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ए राजा यांनी हिंदुविरोधी आणि अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. 'जय श्री राम'चा नारा दिल्याबद्दल ए राजाने हिंदूंना 'मूर्ख' म्हटले. एवढेच नाही तर भारत हा देश नसल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
अयोध्येत राम मंदिराची उभारणी करून, कोट्यवधी भारतीयांची इच्छापूर्ती केल्यामुळे, मोदी सरकारवर मतांचा पाऊस पडण्याची सारी चिन्हे स्पष्ट दिसू लागल्याने विरोधक बिथरले आहेत. पण, ज्या विरोधकांनी राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण अव्हेरले, नंतरही दर्शनाला जाण्यास नकार दिला, त्यांना जनमानस समजलेच नाही. पण, ही चूक आपल्याला चांगलीच भोवणार आहे, हे लक्षात आल्याने, आता ते रामालाच दूषणे देत आहेत. अशाने जनता जनार्दनाचे आशीर्वाद त्यांना कसे मिळतील?
एमके स्टॅलिन पुत्र आणि तामिळनाडू सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या टिप्पणीवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी, दि. ४ मार्च २०२४ चांगलेच खडेबोल सुनावले. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने तामिळनाडू, महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीर, बिहार, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये केलेल्या वादग्रस्त टिप्पणीबद्दल दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) एकत्र करण्यासाठी उदयनिधी स्टॅलिन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना उदयनिधी यांच्या विधानावर तीव्र ना
तामिळनाडू सरकारने इस्त्रोच्या जाहिरातीत चिनी रॉकेटचा वापर करण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूचा दौरा करत यासर्वप्रकारावर टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधान म्हणाले, हा सर्वप्रकार म्हणजे भारतीय शास्त्रज्ञांचा अपमान असून द्रमुकने माफी मागावी, असे ते म्हणाले. तसेच, हा तामिळनाडूच्या करदात्यांचा अपमान असल्याचेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
"हिंदू मंदिरे फक्त हिंदूंची आहेत. हिंदूंच्या मंदिरात गैर-हिंदूंचा काय काम?" अशी ठिपणी करत मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडू सरकारला पलानी मंदिराच्या प्रवेशद्वारावर गैर-हिंदूंना प्रवेश नाही, अशा आशयाचे फलक लावण्याचा सूचना केल्या आहेत. जर गैर- हिंदूंना मंदिरात प्रवेश घ्यायचा असेल तर त्याला मंदिराचा विहित ड्रेस कोडचे पालन करावे लागेल. त्यासोबतच त्याला आपली देवावर श्रद्धा आहे, असे प्रतिज्ञापत्र सुद्धा द्यावे लागणार आहे.
“राम राजवाड्यात हजारो महिलांसोबत राहत होता आणि दारूही प्याला होता. तुम्ही ते तुमच्या मुलांसाठी उदाहरण म्हणून वापराल का? जगण्याची हिंमत नसल्याने त्याने सरयूमध्ये उडी मारून आत्महत्या केली. तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या उदाहरणाने वाढवाल का? हा कसला मूर्खपणा? रामाने स्वतःच्या पत्नीवर संशय घेतला आणि तिला जंगलात पाठवले, तुम्ही लोक हे उदाहरण म्हणून दाखवाल का?" प्रभू श्रीरामाबद्दल असे वादग्रस्त वक्तव्य तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या निकटवर्तीय आणि द्रविड कळघम तमिझार पेरीवाईच्या सरचिटणीस उमा इलैक्कि
सनातन हिंदू धर्माला संपवण्याची उद्दाम भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांच्यासोबत इंडी आघाडीमध्ये रहाणे उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का असा परखड सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. सनातन हिंदू धर्माबद्दलची त्यांचे मत तुम्हाला मान्य आहेत का? हे उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावे.
"आमच्या नेत्याने म्हटल्याप्रमाणे धर्म आणि राजकारण यांची सांगड घालू नका. आम्ही कोणत्याही मंदिर बांधण्याच्या विरोधात नाही, पण त्या ठिकाणी मंदिर बांधण्यास आमचा पाठिंबा नाही. जिथे एक मशीद पाडण्यात आली." असे वादग्रस्त विधान स्टॅलिनपुत्र आणि द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी केले आहे.
इंडी आघाडीची चौथी बैठक 19 डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता नवी दिल्लीत पार पडेल. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी रविवारी (10 डिसेंबर) ट्विट करत ही माहिती दिली. मात्र, 17 डिसेंबरपासून बैठक का पुढे ढकलण्यात आली, याचे कोणतेही कारण त्यांनी दिले नाही. या आठवड्याच्या सुरुवातीला लालू यादव यांनी 17 डिसेंबर रोजी विरोधी गटाची बैठक होणार असल्याचे सांगितले होते.
तीन राज्यात भाजपच्या विजयानंतर इंडी आघाडीच्या बैठकीबाबत राजकीय वातावरण तापले आहे. भाजपकडून काँग्रेसचा दारुण पराभव झाला. यानंतर, 6 डिसेंबर रोजी दिल्लीत होणारी इंडी आघाडीची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सीएम एमके स्टॅलिन, नितीश कुमार आणि अखिलेश यादव यांनी बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी बैठकीला न येण्याचे कारण दिले आहे. या बैठकीसंदर्भात राहुल गांधींनी फोन केल्याचेही सांगितले. ममता बॅनर्जी यांनी यावेळी आपली नाराजी ही बोलून दाखवली आहे.
‘कोण भारतमाता? तिचा शोध घ्यावा लागेल’ यांसारखी बेजबाबदार आणि उद्दाम विधाने पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान करणार्या राहुल गांधींना मतदारांनी या निकालातून सणसणीत चपराक लगावली. मात्र, या निकालातून कोणताही धडा न घेता, द्रमुकच्या खासदाराने ‘गोमूत्रवाल्या राज्यांत भाजपचा विजय झाला,’ असे म्हणत हिंदू धर्म, सनातन संस्कृतीला अपमानित करण्याचा पुन्हा एकदा केविलवाणा प्रयत्न केला. तेव्हा विधानसभा निवडणूक निकालाप्रमाणेच आगामी लोकसभा निवडणुकीतही मतदारांनी अशा सनातनविरोधी नेत्यांना मतपेटीतून त्यांची जागा दाखवून दिल
तामिळनाडूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघास (रा. स्व. संघ) पथसंचनास राज्य सरकारला १६ नोव्हेंबरपर्यंत परवानगी द्यावीच लागेल, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला दिले आहेत. रा. स्व. संघाने तामिळनाडू राज्यातील विविध ठिकाणी पथसंचलन करण्यासाठी प्रशासनाकडे परवानगी मागितली होती.
सत्तेत असलेल्या नेत्यांनी फूट पाडणारी वक्तव्ये करू नयेत, असे म्हणत मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना फटकारले होते. मात्र, आता कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले तरीही मी सनातनला विरोध करत राहीन, असे वक्तव्य स्टॅलिन यांनी केले आहे.
सत्तेत असलेल्या नेत्यांनी फूट पाडणारी वक्तव्ये करू नयेत, असे म्हणत मद्रास उच्च न्यायालयाने द्रविड विचारधारेविरोधात रॅली आयोजित करण्यास परवानगी देण्यास नकार दिला आहे. तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातनला नष्ट करण्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे.
दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी यांनी दावा केला आहे की, दि. २ नोव्हेंबर २०२३ रोजी आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालय (ED) अटक करेल. पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला. वास्तविक, केजरीवाल यांना ईडीने २ नोव्हेंबर २०२३ रोजी मद्य घोटाळ्यासंबधी चौकशीसाठी बोलावले आहे.
"रामाचा जन्म ही पौराणिक कथा आहे. ही रामायणाची कथा आहे. हे साहित्य आहे. त्यांना इतिहासाची जागा पौराणिक कथांना द्यायची आहे." असे वादग्रस्त आणि भगवान रामाचा अपमान करणारे विधान डीएमके नेते टीकेएस एलांगोवन यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केले आहे.
द्रमुकचे नेते आणि तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबद्दल केलेल्या विधानावरील प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयात सांगितले की, वैचारिक मतभेदांमुळे सार्वजनिक पदावर राहून त्यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात हिंदू संघटनानी याचिका दाखल केली होती.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू-मलेरिया या आजारांशी केली होती. त्यांच्या या विधानावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान आता हिंदुस्तानी भाऊने ही उदयनिधींच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. हिंदूस्तानी भाऊ म्हणाले की, " सनातन धर्म डेंग्यू मलेरियासारखा असून त्याला नष्ट करायला हवे, असे विधान करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांनी लक्षात घ्यावे की, सनातन धर्म संपवण्यासाठी असे अनेक जण आले. पण सनातम धर्म संपला नाही, तर ते लोकचं संपले. तसे
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने काय काय करुन दाखवलं? असा सवालच भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी समाजवादी पक्षाशी युती केली. बाळासाहेबांनी कायम ज्या पक्षांना आपला विरोध दर्शवला त्यांच्यासोबतच उद्धव ठाकरेंनी हातमिळवणी केली. त्यामुळे आशिष शेलार यांनी ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला आहे.
उदयनिधी स्टॅलिनच्या सनातन धर्माविषयीच्या अश्लाघ्य टीकेनंतरही काही राजकारणी आणि विचारवंत सनातन धर्मावर आघात करीत आहेत. सनातन धर्म हा मानवी आदर्श, विज्ञान-तंत्रज्ञान आणि मानवतेचा पाया आहे, याची पुनश्च जाणीव करुन देण्याचा या लेखातून केलेला हा प्रयत्न...
तिसरं महायुद्ध पाण्यावरून होईल, असं म्हणतात. ज्याची प्रचिती सध्या कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये कावेरी नदीच्या पाण्यावरून सुरू असलेल्या वादावरून दिसून येते. ‘कावेरी जलव्यवस्थापन मंडळा’ने कर्नाटक सरकारला दि. १५ ऑक्टोबरपर्यंत दररोज तीन हजार क्यूसेक पाणी तामिळनाडूला सोडण्याचे निर्देश दिले होते.
तामिळनाडूच्या एमके स्टॅलिन सरकारला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आगमिक मंदिरांमध्ये पुजारी नियुक्तीमध्ये सरकारी बळजबरी करण्यास मनाई करणारा 'स्टे ऑर्डर' दिला आहे आणि म्हटले आहे की ,'सरकारने हिंदू धर्माच्या प्रत्येक परंपरेत जबरदस्ती घुसू नये', असे सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूच्या स्टॅलिन सरकारला सांगितले आहे. तसेच पुरोहितांच्या नियुक्तीतील मनमानी व बेकायदेशीर कारभारावर सुप्रीम कोर्टाकडून बंदी घातलेली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या रुपाने तामिळनाडूच्या जनतेला बिगर द्रविड राजकीय पक्षाचा पर्याय उपलब्ध होत आहे. तेथील जनता द्रमुक आणि अण्णाद्रमुक या पक्षांच्या तामिळी अस्मितेच्या राजकारणाला विटली आहे. त्या राज्यातही हिंदुत्वाचा विचार पसरत असून, स्टॅलिनपुत्र उदयनिधीच्या सनातनविरोधी वक्तव्यांनी या हिंदुत्वाच्या विचाराला नवे बळ प्राप्त झाले आहे. आता भाजपचा हिंदुत्त्वाचा विचार तेथे पाय रोवत असून, त्याचा अनुकूल परिणाम येत्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळेल.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत दिलेल्या वक्तव्यामुळे सुरू झालेला वाद थांबत नाही आहे. दरम्यान, आता या सनातन वादात प्रसिद्ध अभिनेते आणि राजकारणी कमल हसन यांनी उदयनिधी यांचा बचाव करत सनातनच्या वादात एका मुलाला लक्ष्य केले जात असल्याचे म्हटले आहे. पेरियार यांच्याकडून आम्हाला सनातनची माहिती मिळाली, असेही कमल हसन म्हणाले.
उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माविरोधी वक्तव्यास अभिनेते कमल हासन यांनी पाठिंबा दिला आहे. मक्कल नीधी मैयम (एमएनएम) प्रमुख कमल हसन यांनी शुक्रवारी (२२ सप्टेंबर) सांगितले की द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) नेते आणि तामिळनाडूचे युवा कल्याण मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्मावरील टिप्पण्यांबद्दल त्यांना कोंडीत पकडले जात आहे.
सनातन धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांना नोटीस बजावली आहे. त्यांच्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकार, ए राजा, सीबीआय आणि इतर पक्षांनाही नोटीस बजावली आहे.
सनातन धर्मावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी तामिळनाडू सरकारचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नोटीस बजावली आहे.