राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दि. ८ एप्रिल रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्यही उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. तसेच राज्यातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ९ निर्णय घेण्यात आले आहेत.
Read More
(CM Fellowship Programme 2025-26) राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्यासोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी. तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील "मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम" २०२५-२६ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या कार्यक्रमात ६० फेलोंची निवड करण्यात येणार आहे.
सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथूर यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात भाजप-शिवसेना युती २०१४ साली कशी तुटली? याची आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा करून दिली. “२०१४ साली शिवसेनेला १४७ जागा देण्यास आम्ही तयार होतो आणि त्यांचा मुख्यमंत्री होईल व आमचा उपमुख्यमंत्री होईल, हेसुद्धा ठरले होते. पण, शिवसेना १५१ जागांवर ठाम राहिली आणि युती तुटली,” असे ते म्हणाले. मात्र, राऊतांनी यावर केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा उबाठा गटाची गोची झाली. ‘भाजपने युती तोडली’, ‘धोका दिला’, ‘दिलेला शब्द मोडला’, अश
(Maharashtra Budget Session 2025) विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, दि. ३ मार्चपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी ६ हजार ४८६ कोटींच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर केल्या.
(Maharashtra Budget Session 2025) राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, दि. ३ मार्चपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला.
(Suresh Dhas Massajog ) बीडमधील मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी देशमुख कुटुंबियांसह मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलनाला बसले होते. मात्र आता आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी आंदोलनस्थळी जाऊन भेट दिल्यानंतर मस्साजोग मधील ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
(Ladki Bahin Yojana update e- KYC) राज्यात अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत दर महिन्याला २१ ते ६५ वयोगटातील महिलांना १५०० रुपये दिले जातात. मात्र आता या योजनेच्या निकषांमध्ये काही महत्त्वाच्या बदलांची घोषणा करण्यात आली आहे. त्यापैकी मह्त्त्वाचा बदल म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना आता प्रत्येक वर्षी ई - केवायसी करावी लागणार आहे.
(Pravin Darekar) उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी राहायला का जात नाही, अशा प्रकारचे विधान केले होते. त्याला भाजप विधानपरिषद गटनेते प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांच्यासारख्या महान सल्लागाराच्या सल्ल्याची आवश्यकता नाही. ते स्वतः निर्णय घ्यायला सक्षम आहेत. संजय राऊत वास्तुशास्त्रज्ञ किंवा ज्योतिषी असतील त्यांनी तो धंदा करावा. मुख्यमंत्र्यांना सल्ला देण्याच्या फंदात पडू नये, असे दरेकर म्हणाले.
(Forts Encroachments) महाराष्ट्रातील गडप्रेमींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. ३१मे पर्यंत राज्यातील सर्व गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवली जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आक्रमक पवित्रा घेत याबाबतचे आदेश दिले आहेत.
(Santosh Deshmukh Murder Case) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी नवीन अपडेट समोर आली आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणीच्या तपासासाठी १ जानेवारीला स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, काही अधिकाऱ्यांना हटवण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ८ जानेवारी २०२५ रोजी नवी मुंबई पोलिसांच्या 'नशामुक्त नवी मुंबई' या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अंमली पदार्थविरोधी अभियानात अभिनेता जॉन अब्राहम देखील सहभागी झाला होता. यावेळी भाषण करताना मुख्यमंत्र्यांनी जॉन अब्राहमचं कौतुक केलं. ते म्हणाले की, "जॉन अब्राहम कूल दिसतो कारण तो ड्रग्जला नाही म्हणतो".
(CM Devendra Fadnavis) “राज्य शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून रुग्णसेवा देत असते. आरोग्य विभागाच्या विविध योजनांमधून आणि पुढील आराखड्यामध्ये रुग्णकेंद्रित आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात यावा,” असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. ८ जानेवारी रोजी दिले. आरोग्य विभागाच्या सर्व आरोग्य यंत्रणेतील घटकांचे पुढील दिवसांत मूल्यमापन चांगल्या संस्थांकडून करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
(CM Devendra Fadnavis) महाराष्ट्रातील छोट्या - मोठ्या सर्वच उद्योजकांच्या समस्या प्राधान्याने सोडवून, त्यांना त्यांच्या उद्योगांसाठी पूरक वातावरण निर्माण करण्यात यावे असे आवाहन, महाराष्ट्र औद्योगिक विकास असोसिएशन आणि एमएसएमई चेंबर ऑफ इंडियाचे संचालक चंद्रकांत साळुंखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले. चंद्रकांत साळुंखे यांनी या मागणी साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी मंत्रालय मुंबई येथे भेट घेतली व निवेदन दिले. उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी व कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न सोडवि
(Ladki Bahin Yojana) विधानसभा निवडणुकीच्या यशानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर निवडणुकांपूर्वी प्रचंड गाजलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना पुन्हा चर्चेत आली. विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर या योजनेच्या अर्जांची पडताळणी होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र आता महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः याची जाहीर घोषणा करत यावर शिक्कामोर्तब केले आहे. यानुसार राज्यभरात विविध ठिकाणी अर्जांची फेरपडताळणी सुरू करण्यात आली आहे. तेव्हाच या योजनेतील निकष डावलून लाभ घेतलेल्य
(Ladki Bahin Yojana) ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थीं महिलांच्या अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे. याविषयीची माहिती महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवार ३ जानेवारी रोजी माहिती दिली आहे. एकूण पाच निकषांच्या आधारे अर्ज अपात्र करण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी योजनेसंदर्भात चर्चा केल्यानंतर छाननीचा निर्णय घेण्यात आल्याचे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
(Mukhymantri Saur Krushi Vahini Yojana) शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी' प्रकल्पाच्या अटी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प राबवितांना विकासकांना आता ग्रामपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेण्याची आवश्यकता नाही, असे फडणवीस यांनी मंगळवार, दि. ३१ डिसेंबर रोजी स्पष्ट केले.
(Gharkul Yojana) येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील मूलभूत सोयी-सुविधा अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार गरिबांना घरकुल मिळण्यासाठी, या योजनेला अधिक बळकटी देण्यासाठी १०० दिवसांत २० लाख घरकुलांना मान्यता देण्याचा संकल्प असल्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी मंगळवार, दि. ३१ डिसेंबर रोजी सांगितले.
(Prajakta Mali) प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवार दि. २९ डिसेंबर रोजी सागर निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आमदार सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आक्षेपार्ह आणि चारित्र्यहनन करणारे वक्तव्य केल्याने त्यांना जाहीर माफी मागण्यासंदर्भात निवेदन दिले आहे. तसेच त्यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आश्र्वस्त केले.
(Walmik Karad) खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पोलिसांना शरण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याच्या दिवशी वाल्मिक कराड हा उज्जैनमध्ये होता, अशी माहिती आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर वाल्मिक कराडची बँक खाती गोठवण्यात आली आहे. त्याचबरोबर वाल्मिक कराडच्या नातेवाईकांची बँक खाती गोठवण्यात आल्याची माहिती आहे. वाल्मिक कराडच्या पत्नीची सीआयडीकडून कसून चौकशी करण्यात आली आहे.
(CM Devendra Fadnavis) भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर काँग्रेसने राजकारण सुरू केले आहे. त्यांच्या या कृतीचा सर्व स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसच्या या नीतीचा खरपूस समाचार घेतला. काँग्रेसकडून कायमच डॉ. मनमोहन सिंग यांचा अपमान करण्यात आला. ते गांधी घराण्यातून नसल्यामुळे त्यांच्या पदरी कायम अवहेलना आली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
(Adv. Ujjwal Nikam) कल्याण पूर्व परिसरात एका १२ वर्षीय मुलीची अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून, पीडितेची बाजू मांडण्याची जबाबदारी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर देण्यात आली आहे. तसेच ठाणे पोलीस आयुक्तांना ३० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पीडित मुलगी माझ्या मुलीसारखी आहे. त्यामुळे तिला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे. दोषींना ४ महिन्यांत कठोर शिक्षा दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगित
(Chhagan Bhujbal) मंत्रीमंडळातून डावलल्याने नाराज असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळांनी सोमवारी दि. २३ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच सागर बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीनंतर छगन भुजबळ दिल्लीला रवाना होणार आहेत.
(CM Devendra Fadnavis) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवार, दि. २३ डिसेंबर रोजी परभणीत येऊन सोमनाश सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. भेटीदरम्यान त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत टीका केली आहे. "सोमनाश सूर्यवंशी हा दलित होता म्हणून त्याची हत्या करण्यात आली, पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला असून कस्टोडिअल डेथ ही गृहमंत्र्यांची जबाबदारी", असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. यावर पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्
(CM Devendra Fadnavis) विधानसभा जिंकण्यासाठी विरोधकांनी ‘व्होट जिहाद’चा नारा दिला. मालेगाव येथील काही जणांच्या खात्यात ११४ कोटी रुपये जमा झाले. सीराज महंमद याने हे पैसे १४ खात्यांमध्ये वर्ग केले. विधानसभा निवडणुकीसाठी २१ राज्यातूंन २०१ खात्यांमध्ये पैसे आले. हे पैसे १ हजार खात्यांमध्ये वर्ग करण्यात आले. यांतील ६०० कोटी रुपये दुबईतून आले होते. त्यांमधील १०० कोटी रुपये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी वापरले गेले, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला.
(Eknath Shinde) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी १७ डिसेंबर रोजी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी ठाकरेंनी फडणवीसांना पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा भेट झाली असे सांगण्यात आले असले तरी राजकीय वर्तुळात याविषयी चर्चा सुरु आहे. या भेटीचे वेगळे अर्थ काढले जाऊ लागले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि भाजप यांचे राजकीय संबंध पूर्ववत होऊन ते पुन्हा एकत्र येतील, अशा चर्चां सुरु आहेत. याबाबत उ
(CM Devendra Fadnavis) महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवार, दि. १८ डिसेंबर रोजी करण्यात आले. www.home.maharashtra.gov.in या नावाचे अद्ययावत असे संकेतस्थळ आता माहितीजालकावर उपलब्ध झाले आहे.
(Maharashtra Goseva Ayog) राज्यातील गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या www.mahagosevaayog.org या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवार, दि. १७ डिसेंबर रोजी येथे अनावरण करण्यात आले.
(CM Devendra Fadnavis) बीड जिल्ह्यात झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता एसआयटी (Special Investigation Team) चौकशी करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना याबाबत माहिती दिली आहे. भाजप आमदार सुरेश धस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याबाबत मागणी केली होती.
(Narendra Bhondekar) राज्याच्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम दि. १५ डिसेंबर रोजी नागपूर येथील राजभवन येथे पार पडला. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भंडाऱ्याचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी शिवसेनेच्या उपनेते पदाचा तसेच पूर्व विदर्भाच्या समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाने मला मंत्रिपदाचं आश्वासन दिल्यानंतरही आता डावलल्याने शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप होत असून वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामाही देणार असल्याचे नरेंद्र भोंडेकर म्हणाले आहेत.
(Ustad Zakir Hussain) उस्ताद झाकीर हुसैन यांच्या निधनाने तबल्यापासून ताल वेगळा झाल्याची क्षती आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. सोमवार, १६ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवन परिसरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, राज्यात विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ‘कंट्री डेस्क’ची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा विशेष कक्ष राज्यात विदेशी गुंतवणुकीला चालना देण्याचे काम करेलच. त्यासोबत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासालाही गतिमान करण्यात ‘कंट्री डेस्क’ महत्त्वाची भूमिका बजावेल, यात शंका नाही.
(Ashwini Bhide) राज्याचा पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही दिवसांत प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचे बदल करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री प्रधान सचिव या पदी नियुक्ती केली आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून ब्रिजेश सिंह कार्यभार सांभाळला आहे.
(CM Devendra Fadnavis) देश - विदेशातील गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गुंतवणुकदारांच्या मदतीसाठी 'कंट्री डेस्क' या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नवीन गुंतवणुकीसाठी जागतिक आणि प्रादेशिक गुंतवणूक व्यापारासह सुसंगत धोरण तयार केले जाणार आहे.
(kurla) कुर्ला येथे सोमवारी ९ डिसेंबर रोजी झालेल्या भीषण बेस्ट बस अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखाची मदत जाहीर केल्याचे मलबार हिल मतदारसंघाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करत सांगितले आहे. तसेच त्यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण करत अपघाताविषयी शोक व्यक्त केला आहे.
(CM Devendra Fadnavis) "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमच्यासारख्या गरीब शेतकऱ्याच्या घरात मुक्कामी राहिले. आम्ही जी मीठ-भाकर खातो तीच त्यांनी खाली बसून खाल्ली आणि रात्री आमच्या घरीच झोपले. सकाळी नाश्ता करून परत गेले. आज त्याला इतकी वर्षे झाली पण ती आठवण हृदयात कोरली गेली आहे. आता परत मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांनी पुन्हा एकदा घरी यावे अन् मीठ भाकर खावी ",या शब्दांत पिंपरीबुटी येथील शेतकरी विष्णू ढुमणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
(Devendra Fadnavis) श्रीगणेश विघ्नहर्ता आहेत. त्यांनी सर्वांना सुख-समाधान द्यावे, अशी प्रार्थना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला दिलेल्या भेटीवेळी केली.
गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा व्हावा यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत. गणेश मंडळांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी तसेच कायदा सुरक्षेच्या दृष्टिने योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावर्ती भागात राहणाऱ्या मराठी माणसांचा लढा गेली कित्येक वर्षे सुरु असून तो संपत नाही तोपर्यंत महाराष्ट्र सरकार शंभर टक्के सीमा भागातील मराठी जनतेच्या पाठीशी आहे. हा भाग महाराष्ट्राचाच आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ६ ते १० एप्रिल या काळात आयोजित करण्यात आलेल्या 'राजा शिवछत्रपती' या महानाट्याचा आजचा प्रयोग राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. दिल्लीकरांनी सलग चौथ्या दिवशी या महानाट्याला भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती शरद बोबडे देखील उपस्थित होते.