(Supreme Court judges now need to declare assets) सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांनी आपली संपत्ती जाहीर करावी, असे निर्देश सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी दिले आहेत. संपत्तीचे तपशिल न्यायालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करावी, असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरातून जळालेल्या अवस्थेत रोकड सापडली होती. त्या प्रकरणाची चौकशीही सुरु आहे. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
Read More