अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठामध्ये पॅलेस्टाईन समर्थक घुसले. अमेरिकेच्या त्या प्रतिष्ठित विद्यापीठावर त्यांनी पॅलेस्टाईनचा झेंडा फडकावला. तसेच विद्यापीठाच्या ‘हॅमिल्टन’ या सुप्रिसद्ध हॉलला ‘हिंद हॉल’ हे नावही घोषित केले. अमेरिकेने इस्रायलऐवजी पॅलेस्टाईनला समर्थन द्यावे, असे पॅलेस्टाईन समर्थकांचे म्हणणे. या समर्थकांना गाझाबद्दल इतके प्रेम आहे तर थेट इस्रायलला विरोध करण्यासाठी ते पॅलेस्टाईनला का जात नाहीत? तर पॅलेस्टाईनला गेले की, इस्रायलच्या कारवाईत मृत्यूच होईल, ही त्यांना खात्री आहे.
Read More