( Mosque built in charkop Chawl yogesh sagar ) चारकोपच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये बैठ्या चाळीत तीन घरे एकत्र करून त्यांचे मशिदीत रूपांतर केल्याची धक्कादायक माहिती आ. योगेश सागर यांनी शुक्रवार, दि. २१ मार्च रोजी विधानसभेत दिली.
Read More
(Devendra Fadnavis) स्वयंपुनर्विकास नाही, हा तर आत्मनिर्भर विकास आहे. आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. आज आपण ‘श्वेतांबरा’चे उद्घाटन केले आहे. श्वेतांबरा चे उद्घाटन केल्यानंतर सावंत यांच्या फ्लॅटमध्ये जाऊन बघितले, तेव्हा खर्या अर्थाने स्वयंपूर्ण विकासाची जादू काय असते, हे माझ्या लक्षात आले. आज स्वयंपूर्ण विकासामुळे या मुंबईतल्या मराठी माणसाला आणि मध्यमवर्गीयांना एक आशेचा किरण तयार झाला की, त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकते. तसेच सगळ्यात महत्त्वाचे जर काही असेल, तर आत्मनिर्भरता आली,” असा विश्वास मु
सत्तापिपासू मविआचा पराभव निश्चीतपणे होईल असा विश्वास व्यक्त केला आहे चारकोप मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार योगेश सागर ( Yogesh Sagar ) यांनी.
चारकोप स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुंबईतील सर्वात मोठा 'योगा ऑन स्ट्रीट' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सुमारे ३ हजार योग साधक दरवर्षी या कार्यक्रमात सहभागी होतात. दरम्यान शुक्रवार दि. २१ जून २०२४ रोजी चारकोप मार्केट, कांदिवली (पश्चिम) मुंबई येथे सकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच या भव्य-दिव्य अशा 'योगा ऑन स्ट्रीट' कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चारकोप कल्चरल अॅण्ड स्पोर्टस् फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील अंकम यांनी केले आहे.
सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून शुद्ध केलेले पाणी पिण्याव्यतिरिक्तच्या कामासाठी वापरता येऊ शकते. ही बाब लक्षात घेत मुंबई महापालिकेकडून कुलाबा, बाणगंगा, चारकोप, माहूल, चेंबूर या मलजल प्रक्रिया केंद्रांतील पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याची विक्री करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच मुंबईकरांना पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी वापरण्यायोग्य पाणी उपलब्ध होणार आहे. हे पाणी विकत घेण्याची तयारी कांदिवलीचे अर्थव कॉलेज, बुलेट ट्रेन प्रकल्प राबवणारी ॲफकॉन इंटरनॅशनल कंपनी आणि चेंबूरमधील व्हिडिओकॉन कॉलनीने दर्शवली आहे. महा
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी ‘महाविजय-२०२४’ अंतर्गत चार दिवसांच्या मुंबई लोकसभा मतदारसंघ प्रवासाच्या अखेरच्या दिवशी शुक्रवार, दि. ०५ जानेवारी २०२४ रोजी ते उत्तर मुंबई लोकसभा, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा आणि दक्षिण मुंबई लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहेत. या प्रवासात ते लोकसभा क्षेत्रातील एकूण नऊ विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरिअर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.
मुंबईतील गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या पुनर्विकास प्रकल्पांना मागील काही दिवसांपासून वेग मिळाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून चारकोप येथील 'राकेश' गृहनिर्माण संस्थेचा स्वयंपुनर्विकास सोहळा शनिवार, दि. २७ मे रोजी पार पडला. या स्वयंपुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. ''चारकोप, गोराई हे स्वयंपुनर्विकासाचे हब म्हणून पुढे येत असून आपल्याला स्वयंपुनर्विकासाचा नवा आदर्श घालून द्यायचा आहे,'' असे दरेकर यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना म्ह
मुंबई महापालिकेकडून खेळाची मैदाने बांधण्यात आली होती. मात्र, आता त्याचा वापर गाड्या पार्किंगसाठी तसेच कचरा टाकण्यासाठी होत असून याकडे मुंबई महापालिका दुर्लक्ष करत असल्याची तक्रार कांदिवलीतील चारकोप येथील स्थानिकांनी दै. ’मुंबई तरुण भारत’शी बोलताना केली.
कांदिवली पश्चिममधील चारकोप विभागातील सह्याद्रीनगर येथील नागरिक विकास रखडल्याने येथील रहिवासी संतप्त झाले आहेत.
खा.गोपाळ शेट्टींसह अनेकांची उपस्थिती
प्रशांत म्हात्रे यांच्या उपक्रमाचे पोलीसांकडूनही कौतूक
उत्तर मुंबईतील चारकोप विधानसभा मतदारसंघ सध्या येथील महायुतीचे उमेदवार योगेश सागर यांच्यामुळे चर्चेत आहेत. योगेश सागर हॅटट्रिक करणार का, हाच येथे चर्चेचा मुद्दा आहे. साळसूद व्यक्तिमत्त्व आणि नागरिकांना तात्कळत न ठेवता त्यांच्या कामाबाबत 'होय' अथवा 'नाही' या दोन शब्दांत उत्तरे देणे या स्पष्टवक्तेपणाबाबत ते प्रसिद्ध आहेत. त्यामुळे नागरिकांना त्यांच्याबाबत आदर आहे.