Maharashtra Budget 2025 पायाभूत सुविधांमध्ये एक रुपयाची गुंतवणूक केली, तर स्थूल राज्य उत्पन्नात २.५ ते ३.५ रुपयांची वाढ होते, हे लक्षात घेऊन विमान चालन, रेल्वे, मेट्रो, महामार्ग, जल वाहतूक, बंदर विकास, सिंचन, ऊर्जा, परिवहन व दळणवळण क्षेत्रात येत्या पाच वर्षात विक्रमी गुंतवणूक करण्याचा शासनाचा निर्धार आहे. जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळ हे संयुक्तरित्या पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विकसित करित आहेत. या प्रकल्पाचा एकूण खर्च 76 हजार २२० कोटी रुपये असून त्यात राज्य शासनाचा सहभाग २९ टक्के
Read More
मुंबई-अहमदाबाद शहरांतील दळणवळणाचा वेग वाढवण्यासाठी नॅशनल हाय स्पीड रेल काॅर्पोरेशन लिमिटेडकडून (एनएचएसआरसीएल) देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगात सुरु आहे. या मार्गातील पुलाचे काम झपाट्याने सुरू असून नुकताच गुजरात मध्ये पाचव्या प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट (पीएससी) पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
जपानी भाषेत बुलेट ट्रेन म्हणून ओळखल्या जाणार्या जपानी शिंकानसेनने, आपल्या अनोख्या हायस्पीड तंत्रज्ञानाने जगभरातील २४हून अधिक देशांतील वाहतूक व्यवस्था कायमची बदलून टाकली. जपानचा हाय-स्पीड रेल्वे प्रवास १९६४ साली, टोकियो ऑलिम्पिकच्या अगदी आधी, टोकाइदो शिंकानसेनच्या उद्घाटनाने सुरू झाला. या मार्गाने जपानची राजधानी टोकियो ओसाकाशी जोडली गेली. ३२० मैलांचा प्रवास अडीच तासांवर आला. यातूनच रेल्वे प्रवासात क्रांती घडली.
भारतातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात जपानच्या कौशल्याचा वापर करून भारत 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी स्वत:च्या तांत्रिक आणि भौतिक संसाधनांचा अधिकाधिक वापर करत आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी स्टील पूल हे या प्रयत्नाचे मोठे उदाहरण आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने चार रेल्वे रुळांवर 'मेड इन इंडिया' स्टील पुलांचे गर्डर यशस्वीरीत्या लॉन्च केले. मुंबई ते अहमदाबाद अशा ५०८ किलोमीटर हायस्पीड मार्गासाठी सध्या महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात काम सुरु आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली कामांची पाहणी
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरातमधील NH-४८ वर २१० मीटर लांबीचा चौथा पूल बांधण्यात आला आहे. गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील नडियादजवळील दाभान गावात राष्ट्रीय महामार्ग-४८ (दिल्ली-चेन्नई) ओलांडण्यासाठी डिझाइन केलेला २१० मीटर लांबीचा PSC (प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट) पूल दि.९ जानेवारी २०२५रोजी पूर्ण झाला.
भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी एनएचएसआरसीएलच्या माध्यमातून रेल्वे अहोरात्र काम करत आहे. नुकताच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरातमधील NH-48 वर २१० मीटर लांबीच्या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड गाठला आहे. १०३ किलोमीटर व्हायाडक्टच्या दोन्ही बाजूंना २,०६,००० नॉईज बॅरियर्स (आवाज प्रतिबंधक) बसविण्यात आले आहेत. प्रत्येकी १ किलोमीटर अंतरासाठी, व्हायाडक्टच्या प्रत्येक बाजूस २,००० नॉईज बॅरियर्स धोरणात्मकदृष्ट्या बसविण्यात आले आहेत.
मुंबई : अहमदाबाद बुलेट ट्रेन ( Bullet Train ) प्रकल्पाच्या बांधकामस्थळी कामगारांच्या (श्रमिक) सुरक्षिततेसाठी नुक्कड़ नाटकांची मालिका असलेल्या 'प्रयत्न' या जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. एमएएचएसआर कॉरिडॉरसह १०० हून अधिक बांधकाम साइट्सवरील १३,००० हून अधिक कामगारांपर्यंत ही मोहीम पोहोचली.
मुंबई बुलेट ट्रेन स्थानकाचा पहिला काँक्रीट बेस स्लॅब ३० नोव्हेंबर २०२४ रोजी जमिनीपासून अंदाजे ३२ मीटर खोलीवर टाकण्यात आला आहे. हा स्लॅब १० मजली इमारतीच्या समतुल्य इतक्या खोलीवर आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये केवळ बीकेसी हे एकमेव भूमिगत स्थानक आहे.
भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला पाठिंबा देण्यासाठी एक अत्याधुनिक ट्रॅक स्लॅब निर्मिती कारखाना स्थापन करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मेड इन इंडियाला पाठबळ देण्यासोबतच देशातील हाय-स्पीड रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये हा कारखाना मैलाचा दगड ठरणार आहे. प्रगत शिंकानसेन तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च क्षमतेचे गिट्टीविरहित ट्रॅक स्लॅब तयार करण्यासाठी कारखान्याची रचना करण्यात आली आहे. बुलेट ट्रेनच्या रुळांची स्थिरता आणि कामगिरी सुनिश्चित करण्यात ही महत्त्वाची भूमिका बजावेल.
राज्यातील जनतेने महायुती सरकारला दिलेल्या बहुमतामुळे आता राज्यातील विकासकामे आणि प्रकल्पांचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविकास आघाडीने प्रचारादरम्यान अनेक प्रकल्पांना आपण ब्रेक लावणार, अशा घोषणा केल्या होत्या. मात्र, राज्यातील नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग, सिंदखेड राजा ते शेगाव भक्तिपीठ महामार्ग, ‘वाढवण बंदर प्रकल्प’, ‘मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प’, ‘धारावी पुनर्विकास प्रकल्प’ यांसारख्या प्रकल्पांच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्प म्हणजेच बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या या दोन्ही राज्यात प्रगतीपथावर आहे. अशावेळी काही दिवसांपूर्वी गुजरातमधील आणंद जिल्ह्यात माही नदीच्या साईटवर कामादरम्यान काँक्रीट ब्लॉक पडण्याची दुर्घटना घडली. मात्र या दुर्घटनेनंतर काँग्रेस पक्षाने आपल्या सोशलमिडीया हॅण्डलवरून चुकीची माहिती पसरविली. अशी चुकीची माहिती पसरविणाऱ्या काँग्रेसला एनएचआरसीएलने तात्काळ प्रतिसाद देत खडे बोल सुनावले.
राजस्थानमध्ये देशातील पहिला ट्रेन ट्रायल ट्रॅक जवळपास तयार झाला आहे. भारतीय रेल्वे सातत्याने आपल्या कार्यप्रणाली आणि सुविधांना अद्यावत करत आहे. रेल्वे पायाभूत सुविधा वाढवत असताना सर्व सुविधांनी युक्त रोलिंग स्टॉक निर्मितीमध्येही भारत जागतिक स्पर्धेत उतरला आहे. अशावेळी अद्ययावत रोलिंग रोलिंग स्टॉकची चाचणी घेण्याची सुविधा विकसित करण्यासाठी राजस्थानमध्ये एक समर्पित रेल्वे चाचणी ट्रॅक बांधला जात आहे. हा ट्रॅक डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होईल.
भारतातील मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी नॅशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून आत्तापर्यंत ६६ हजार ३२६ कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाची एकूण किंमत १ लाख आठ हजार कोटी रुपये इतकी असल्याने प्रकल्पाने सप्टेंबर महिन्यापर्यंत ६१. ४० टक्के इतकी आर्थिक प्रगती साध्य केली आहे. प्रकल्पाच्या एकूण किंमतीमध्ये जमीन अधिग्रहण, बांधकाम आणि रुळांच्या कामांसह इतर खर्चाचा समावेश आहे.
भारतातील पहिली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. ही हायस्पीड ट्रेन मुंबई या देशाच्या आर्थिक केंद्राला गुजरात राज्यातील अहमदाबादशी जोडण्यात आली आहे. भविष्यात बुलेट ट्रेनचे जाळे अधिक विस्तारण्याची केंद्र सरकारची योजना आहे. याच पार्श्वभूमीवर आता या बुलेट ट्रेन स्थानकांच्या परिसरात उत्तम कनेक्टिव्हीटी आणि इतर सेवांशी जोडणी देत स्मार्ट करण्यात येतील. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने 'स्मार्ट प्रकल्पां'तर्गत ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट उभारण्यासाठीची योजना जाहीर केली.
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. या प्रकल्पासाठी गुजरातमध्ये पश्चिम रेल्वेच्या वडोदरा विभागात ६० मीटर लांबीच्या ‘मेक इन इंडिया’ स्टील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने २२ ऑक्टोबर २०२४ रोजी आणखी एक स्टील पूल यशस्वीरित्या लॉन्च केला. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पश्चिम रेल्वेच्या बाजवा - छायापुरी कॉर्ड लाइन, गुजरातमधील वडोदरा येथे ६० मीटर लांबीचा हा मेक इन इंडिया पूल उभारण्यात आला आहे.
एनएचएसआरसीएलने महाराष्ट्र राज्यात 'डबल लाइन हाय स्पीड रेल्वेसाठी चाचणी आणि कमिशनिंगसह ट्रॅक आणि ट्रॅकसंबंधित कामांचे डिझाइन, पुरवठा आणि बांधकाम' साठी पात्र भारतीय आणि जपानी कंपन्यांकडून निविदा मागविल्या आहेत. मुंबई बुलेट ट्रेन स्थानक ते महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील झारोली गाव या दरम्यान सुमारे १५७ किमी म्हणजेच ३१४ किमी लांबीच्या ट्रॅकची संपूर्ण आखणी करण्यात आली आहे. यात ठाण्यातील 4 स्थानके आणि रोलिंग स्टॉक डेपोच्या ट्रॅकच्या कामांचाही समावेश आहे.
( Bullet Train Project ) भारतातील पहिला समुद्राखालील ७ किमी लांबीचा बोगदा ठाणे खाडीतून जाणार आहे. पाहूया आजच्या व्हिडिओतून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील बोगद्यांच्या महाराष्ट्रातील सद्यस्थिती आणि अदित पोर्टल नेमका काय आहे?
भारतातील उत्तर, दक्षिण आणि पूर्व भागात बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठी व्यवहार्यता अभ्यास करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दि. २७ जून रोजी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना सांगितले. सद्यस्थतीमध्ये मुंबई-अहमदाबाद या मार्गावर ५०० किमी अंतराच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. याच पार्श्वभूमीवर आता देशातील इतर मार्गांवर या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेचा अभ्यास केला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात भारतात मेट्रो बरोबरच आता बुलेट ट्रेनचे जाळेही विस्तारण्याची चिन्ह
आज जागतिक तापमान वाढीमुळे जगभरात पर्यावरणपूरक प्रकल्प उभारणीकडे ओढा असतानाच, वाहतूककोंडी टाळून देशांतर्गत प्रवासासाठी हायस्पीड रेल्वे प्रकल्पांकडे अनेक देश वळलेले दिसतात. नुकताच कॅलिफोर्नियाचा संपूर्ण हायस्पीड रेल्वे मार्ग लॉस एंजेलिस ते सॅन फ्रान्सिस्को हा बांधकामासाठी पर्यावरणीयदृष्ट्या अधिकृतपणे मंजूर करण्यात आला आहे. जगातील पहिला हायस्पीड रेल्वे प्रकल्प 1964 मध्ये जपानमध्ये सुरू झाला, जो ‘शिंकानसेन’ किंवा ‘बुलेट ट्रेन’ म्हणून ओळखला जातो.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात नवीन नवीन विक्रम होत असतानाच आता १३० मीटर लांबीचा 'मेक इन इंडिया' स्टील पूल लॉन्च करून पुन्हा एकदा नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने प्रकल्पात नवी उपलब्धी प्राप्त केली आहे. एनएचएसआरसीएलने २३ जून २०२४ रोजी हा स्टील पूल यशस्वीपणे लॉन्च केला आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरातमधील वडोदराजवळ दिल्ली-मुंबई राष्ट्रीय द्रुतगती मार्गावर हा पूल उभारण्यात आला आहे.
बहुप्रतिक्षित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा ५०८ किमी लांबीचा आणि अंदाजे सुमारे २ लाख कोटी रुपयांचा हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प ऑगस्ट २०२६मध्ये पूर्ण होणार आहे. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, ज्याचा उद्देश प्रवासाचा वेळ कमी करणे आहे. ३२० किमी/तास वेगाने चालणाऱ्या या ट्रेनमध्ये प्रत्येक दिशेने दररोज १७,९०० प्रवासी घेऊन जाण्याची अपेक्षा आहे. ज्यामुळे सिमेंट आणि स्टीलसारख्या उद्योगांना लक्षणीय चालना मिळेल,अशी माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) दिली आहे.
महाराष्ट्रातील बीकेसी ते शिळफाटा दरम्यान २१ किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या बांधकामाला गती मिळणार आहे. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीच्या इंटरमीडिएट बोगद्याचे (एडीआयटी) खोदकाम पूर्ण करण्यात आले आहे.
भारताच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सुखकर प्रवासासाठी आता जपानी औद्योगिक दिग्गज कंपनी हिताची आणि कावासाकी यांनी अत्याधुनिक शिंकनसेन ट्रेन सेट पुरवण्यासाठी एका कॉन्सोर्टियमची स्थापना केली आहे. भारतीय रेल्वे अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली की, भारतातील हवामानाला मिळतेजुळते आणि संचलन गरजा पूर्ण करण्यासाठी ट्रेनचे डिझाइन तयार करण्यासाठी या कॉन्सोर्टियममध्ये चर्चा सुरू आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी वांद्रे कुर्ला संकुल ते शिळफाटा दरम्यान २१ किलोमीटरचा बोगदा बांधण्यात येत आहे. या बोगद्याच्या एकूण लांबीपैकी १६ किलोमीटरचे खोदकाम तीन टनेल बोरिंग मशिन (टीबीएम) द्वारे केले जाणार आहे, तर उर्वरित ५ किलोमीटरचे खोदकाम न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धती (एनएटीएम) वापरून केले जाणार आहे.
मुंबई अहमदाबाद अशा या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे मुंबईतील वांद्रे, पालघर आणि विरार या सर्वच साईटवर वेगाने काम सुरु आहे. या प्रकल्प स्थानांवर बांधकामदरम्यान अद्ययावत तंत्रज्ञान आणि विविध सुरक्षा उपाययोजनेचा अवलंब केला जात आहे.
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात शंभर ओपन फाउंडेशनचे काम पूर्ण झाले आहे. ठाणे, बोईसर आणि विरार बुलेट ट्रेन स्थानकांवर प्रगतीपथावर, नदीवरील पूल आणि डोंगरावरील बोगद्यांची तयारी सुरू असल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली आहे.
भारतातील पहिला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यातील शेकडो तरुण तांत्रिक प्रशिक्षण घेऊन रोजगारक्षम झाले असल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली आहे. महाराष्ट्रातील १३२ प्रकल्पबाधित तरुणांना प्रशिक्षित करण्यात आले असून हे तरुण आज प्रकल्प स्थळांवर कार्यरत आहेत.
भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद दरम्यान देशातील पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. हा प्रकल्प आधुनिक पायाभूत सुविधांचे प्रतीक असेल. भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीचा सर्वात मोठा रोलिंग स्टॉक डेपो हा सबारमतीत उभारण्यात येत आहे. साबरमती येथे रोलिंग स्टॉक डेपोच्या विकासासह भारत शाश्वतता आणि कार्यक्षमतेच्या नवीन युगाची सुरुवात करणार आहे. या डेपोसाठी मातीचे काम पूर्ण झाले आहे. प्रशासकीय इमारतीसाठी पायाभरणी आणि आरसीसीची कामे प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे रेल्वे कोर्पोरेशन लिमिटेड (एनएच
१७ व्या संयुक्त समितीच्या बैठकीत प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा
गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने राज्यातील विविध महामार्ग आणि रस्ते विकासाच्या कामावर अधिक भर दिला आहे. आता सरकारकडून येत्या लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर तीन नव्या महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. हे नवे महामार्ग महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणात बनवण्यात येतील. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल. मुंबई महानगरातील पहिली प्रवेश नियंत्रित अशी विरार अलिबाग बहुउद्देशिय मार्गिका, पुणे रिंग रोड आणि जालना नांदेड महामार्गाच्या उभारणीसाठी ८२ निविदा दाखल करण्यात आल्या आहे. तसेच राज्यातील विकासात आण
डी. बी.अभियांत्रिकी आणि सल्लागार, जीएमबीएच आणि सिस्त्रा एमव्हीए कन्सल्टिंग (इंडिया) प्रा. लिमिटेड या दोन कंपन्यांना ५०८ किमी लांबीच्या भारतातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या तिकीट प्रणालीच्या सल्लगार प्रक्रियेसाठी बोलीदार म्हणून सहभागी झाले आहेत.
मिल्क सिटी ऑफ इंडिया म्हणून परिचित असणारे गुजरात राज्यातील आणंद शहर आता आगामी काळात बुलेट ट्रेनमुळेही प्रसिद्धीस येणार आहे. मिल्क सिटी अशी ओळख असणारे आणंद शहर बुलेट ट्रेन स्थानकाचे अंतरंग आणि बाह्यरंग दुधाच्या थेंबांचे द्रवरूप स्वरूप, आकार आणि रंगाची प्रतिकृती असेल.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या ५०८.१७ किमीच्या पॅकेज P1(C) साठी त्यांच्या पहिल्या ओपन वेब गर्डर (OWG) ट्रस ब्रिजचे लॉन्चिंग पूर्ण करण्यात यश आले आहे. एम जी कॉन्ट्रॅक्टर्स प्रा. लि.ने मागील आठवड्यात या पुलाचे काम पूर्ण केले.
लांब अंतरावरील प्रवासासाठी वेळेची बचत करणाऱ्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी, अहमदाबाद-दिल्ली बुलेट ट्रेन लवकरच प्रत्यक्षात येणार आहे.
लांब अंतरावरील प्रवासासाठी वेळेची बचत करणाऱ्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी, अहमदाबाद-दिल्ली बुलेट ट्रेन लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. या हाय-स्पीड ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ १२ तासांवरून केवळ ३.५ तासांवर येण्याची शक्यता आहे. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पानंतर गुजरातमधील हा दुसरा हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प असेल.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ( bullet train project )महाराष्ट्राचं नव्हे तर देशाच्या आर्थिक विकासात आपले योगदान देईल. याअनुषंगाने जागतिक पातळीवर झालेला अभ्यास नेमकं काय सांगतो जाणून घेऊया व्हडिओच्या माध्यमातून
सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून शुद्ध केलेले पाणी पिण्याव्यतिरिक्तच्या कामासाठी वापरता येऊ शकते. ही बाब लक्षात घेत मुंबई महापालिकेकडून कुलाबा, बाणगंगा, चारकोप, माहूल, चेंबूर या मलजल प्रक्रिया केंद्रांतील पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याची विक्री करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच मुंबईकरांना पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी वापरण्यायोग्य पाणी उपलब्ध होणार आहे. हे पाणी विकत घेण्याची तयारी कांदिवलीचे अर्थव कॉलेज, बुलेट ट्रेन प्रकल्प राबवणारी ॲफकॉन इंटरनॅशनल कंपनी आणि चेंबूरमधील व्हिडिओकॉन कॉलनीने दर्शवली आहे. महा
आयआरएसई १९८८च्या बॅचचे अधिकारी विवेक कुमार गुप्ता यांनी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प राबविणाऱ्या संस्थाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. मेट्रो, कारशेट, बुलेट ट्रेन तसेच मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाबाबत नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. कोकणातील समुद्रात जाणारे पाणी दुष्काळग्रस्त भागांकडे वळवता येईल. यावर शासन गांभीर्याने काम करत आहे, ही बाब मोदींच्या कानावर घातल्याचे शिंदेंनी सांगितले.
मुंबई : वेगवान प्रवासासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि देशाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प अशी ओळख निर्माण झालेल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामांना गती मिळाली आहे. गुजरातपाठोपाठ महाराष्ट्रातही या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे.
देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी निर्गुंतवणूक योजना जेवढ्या धडाक्यात राबवावयास हव्यात, तेवढ्या ताकदीने केंद्र सरकार त्या राबवित नसल्याचे चित्र आहे. या प्रस्तावांना कामगार संघटना विरोध करतात, पण अर्थव्यवस्था मोकळी झाल्यानंतर देशात कामगार संघटना नावाला उरल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारला निर्गुंतवणूक योजना राबविण्यासाठी परिस्थिती पूर्णतः अनुकूल असताना, केंद्र सरकारची याबाबत उदासीनता का, हा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो.
मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी बुलेट ट्रेन प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यामुळे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी मार्ग मोकळा झाला आहे. हा प्रकल्प 'राष्ट्र आणि सार्वजनिक हिताचा' असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आज सांगितले. गोदरेज अँड बॉइस कंपनीने महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या अधिग्रहण प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आहे.
मुळात नेतृत्वच ‘व्हीजनरी’ असले, तर त्याची प्रचिती प्रभावी निर्णय आणि ध्येयधोरणांमध्ये आपसूकच दिसते. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांना मिळालेला ‘बूस्टर’ पूर्वीच्या आणि आत्ताच्या सरकारांच्या कारभारातील फरकाची ठळक रेषा स्पष्ट करून दाखवतो.
मुंबई : तिसऱ्या आणि नव्या वंदे भारत एक्स्प्रेसने ट्रायल रनदरम्यान केवळ ५२ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग गाठून बुलेट ट्रेनचा विक्रम मोडला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ९ सप्टेंबर २०२२ रोजी ही माहिती दिली. याशिवाय, फोटोकॅटॅलिटिक एअर प्युरिफायर सिस्टीम नवीन वंदे भारत ट्रेनला कोरोनासह सर्व वायुजन्य आजारांपासून मुक्त ठेवेल, असेही ते म्हणाले. भारताची ही सेमी-हाय स्पीड ट्रेन येत्या काही आठवड्यांत अहमदाबाद-मुंबई मार्गावर धावण्यासाठी तयार आहे.
भारत आण्विक सत्ता (अणुबॉम्ब) असल्यामुळे, भारतासोबत आण्विक सहकार्य करण्याचा जपानचा पूर्णपणे विरोध होता, हा विरोध जपानमध्ये स्थानिक पातळीवरदेखील झाला. परंतु, पुढे चर्चांमध्ये प्रगती होत गेली व भारत-जपान अणुसहकार्य करार झाला. हा करार पंतप्रधान शिंजो आबे यांच्याच कार्यकाळात झाला. त्याचप्रमाणे, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प व महाराष्ट्रातील इतर विकास प्रकल्पांना शिंजो आबे यांच्या कार्यकाळात तेजी आली.
केंद्र सरकारने दिल्लीपासून श्रीरामचरणांपर्यंत ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्प प्रस्तावित केला असून ‘गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लान’अंतर्गत हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. यामुळे देशाची राजधानी ते अयोध्या हे अंतर अवघ्या तीन तासांमध्ये पार करता येणार आहे.
बुलेट ट्रेनविषयी शिवसेनेची दुटप्पी भूमिका समोर आली आहे
ठाणे महापालिकेला सुचली दुर्बुद्धी - शेतकरी संतप्त