ओडिशातील जाजपूर जिल्ह्यातील रत्नगिरी येथे सध्या पुरातत्व विभागाकडून उत्खनन सुरू आहे. यानिमित्ताने भारतीय संस्कृतीतील बौद्ध धर्माचा समृद्ध वारसा उजागर झाला आहे. प्राचीन काळापासून ओडिशा हे व्यापाराचे केंद्र राहिले. रत्नगिरीचा हा वारसा इतर नगरांपेक्षा नेमका कसा वेगळा होता, याचा घेतलेला हा आढावा...
Read More
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे दि. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी विजयादशमीच्या दिवशी आयोजित धर्मांतर सोहळ्यात लाखो जनसमुदायासोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यानंतर देशातील बौद्ध धर्मांतर सोहळा दिवस हा ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ म्हणून साजरा केला जातो.
"द.कोरिया आणि आमच्या देशामध्ये ऐतिहासिक-धार्मिक संबंध आहेत. कोरियामध्ये बौद्ध धर्म आमच्या देशातूनच पोहोचला आहे,” असे कोण म्हणाले असेल असे वाटते? तर हे महाशय म्हणजे पाकिस्तानी राजदूत नबील मुनीर. मुनीर यांना असे म्हणायचे आहे की, द. कोरियामध्ये अतिशय भक्कमरित्या अस्तित्वात असलेला, सियोल बौद्ध धर्म (भारतातून चीनमध्ये आणि पुढे कोरियामध्ये गेलेल्या बौद्ध धर्मामध्ये कोरियन लोकांनी कोरियन संस्कृतीनुसार बदल केला. तोच सियोल बौद्ध धर्म) हा मूळचा पाकिस्तानातून आलेला. कोणे एके काळी पाकिस्तान काय नि अफगाणिस्तान काय, तिथे
भारताने संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७८ व्या अधिवेशनात पाकिस्तानने आणलेल्या प्रस्तावावर मतदान करण्यास नकार दिला. संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिवेशनात 'इस्लामफोबियाशी लढण्यासाठी उपाययोजना' हा प्रस्ताव पाकिस्तानने आणला होता. या प्रस्तावावर बोलताना भारताच्या संयुक्त राष्ट्र संघातील स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी आपली भूमिका मांडली. UN
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत काळात 'महासंस्कृती महोत्सव २०२४' अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम राज्यभर आयोजित करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून, 'मुंबई उपनगर जिल्ह्यात बौद्ध महोत्सव आणि शबरी महोत्सवाचे'आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज मंत्रालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना या दोन्ही कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी डॉ. भदंत राहुल बोधी देखील उपस्थित होते.
जपानमधील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक असलेल्या, कोयासन विद्यापीठातर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकतीच मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. ही महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद घटना आहेच. परंतु, ज्या विद्यापीठाने ही डॉक्टरेट फडणवीस यांना प्रदान केली, त्या कोयासन विद्यापीठाविषयी अधिक माहिती जाणून घेणे क्रमप्राप्त ठरते.
सफदर हाश्मींची एक अनुवादित मराठी कविता आहे. ती काव्य रचना अशी आहे. पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या.माणसांच्या जगाच्या, वर्तमानाच्या -भूतकाळाच्या ,एकेका क्षणाच्या ! जिंकल्याच्या-हरल्याच्या,प्रेमाच्या-कटुतेच्या !
भारतीय भिक्खू संघ आणि ‘देव देश प्रतिष्ठान’च्या संयुक्त माध्यमातून रविवार, दि. २७ ऑगस्ट रोजी भारतीय भिक्खू निवास, रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर पूर्व येथे ‘मन की बात’ आणि बौद्ध धम्मगुरूंकरिता मोफत नेत्ररोग चिकित्सा शिबीर आयोजित करण्या आले होते. या सेवाभावी उपक्रमाचा अनुभव या लेखात व्यक्त केला आहे.
मग पश्चिमी देशांनी पवित्रा बदलला.एकीकडे या देशांशी गोडगोड बोलायचं. त्यांच्याशी मोठेमोठे करार करायचे, कंत्राटं करायची, यांचं तेल शक्य तितक्या किफायतशीर किमतीत स्वतःच्या पदरात पाडून घ्यायचं. हे करतानाच यांच्या शिया-सुन्नी, अरब-बिगर अरब अशी भांडणं पेटवून द्यायची, असे राजकारण सुरू झालं आणि आजही ते यशस्वीपणे चालूच आहे.
दि. २० व २१ एप्रिल रोजी दोन दिवसीय ‘जागतिक बौद्ध परिषद’ पार पडली. या परिषदेच्या आयोजनाचे कर्तेपण भारताकडे होते. भारतीय सांस्कृतिक मंत्रालय व ‘इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन’ यांनी एकत्रितरित्या या परिषदेचे आयोजन केले होते. जागतिक राजकारणात भारताच्या या आयोजनावर बरीच चर्चा झाली. आजच्या आधुनिक जगात अशा प्रकारच्या जागतिक बौद्ध परिषदेचे हे पहिलेच आयोजन ठरले. जगभरातील अनेक बौद्ध भिक्खू, तत्वज्ञ, अभ्यासक यांनी या परिषदेस हजेरी लावली. त्यामुळे एकप्रकारे भारताने चीनला दिलेला हा शह मानला जात आहे.
आज दि. ५ मे... बुद्ध पौर्णिमा. तथागत गौतम बुद्धांनी अखिल मानवाला शाश्वत मानवी मूल्यांचा मार्ग दिला. ज्येष्ठ लेखक, विचारवंत ‘पद्मश्री’ रमेश पतंगे यांनी ‘तथागतांचा धर्मकर्तव्यमार्ग’ हे पुस्तक लिहिले आहे. आज विश्वशांती बुद्धविहार, मुलुंड, मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकातील सारांश मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...
दि. २१ जून हा ‘जागतिक योग दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. ‘योग’ ही भारतीय संकल्पना जेव्हा जागतिक होते, तेव्हा ती केवळ कायिक, वाचिक आणि मानसिक या स्तरांवर सीमित नसते. ‘योग’ तत्त्वज्ञान हे एका धर्मापुरतेच किंवा एका संस्कृतीपुरतेच मर्यादित नसून त्याचा विस्तार अन्य धर्मांमध्येही झालेलाही दिसून येतो. विविध धर्मसंस्कृतीतील योग तत्त्वज्ञान आपण या लेखातून थोडक्यात जाणून घेऊया...
सध्या ‘क्वाड’ गटाच्या शिखर संमेलनासाठी भारताचे पंतप्रधान नरेेंद्र मोदी जपानच्या दौर्यावर असल्याने चीनला मिरच्या झोंबणे तसे साहजिकच. परंतु, गेल्या आठवड्यात बुद्धपौर्णिमेनिमित्त नरेंद्र मोदी यांनी केलेला छोटा नेपाळ दौराही चीनला एकप्रकारे मोठा संदेश देणारा ठरला, असे म्हणता येईल. तेव्हा, मोदींच्या नेपाळ दौर्यामागील विदेशनीतीची समीकरणे उलगडणारा हा लेख...
भगवंतांची शिकवण जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी आहे. गृहस्थी, उपासक, राजे, अनेक व्यापारी, सेनापती आणि अत्यंत सामान्य माणसे या सर्वांना त्यांनी उपदेश केला आहे.
चीनमध्ये तिबेटी बुद्धविहारांवर अत्याचार-अन्याय वाढतच आहेत. काही दिवसांपूर्वी चीनमध्ये शिशुआन प्रांतात तिबेटच्या बौद्ध भिक्खूंना चिनी प्रशासनाने अटक केली. कारण काय तर चीनमध्ये लुहुओ प्रांतामध्ये ९९ फूट उंच बौद्ध मूर्ती तोडण्यात आली. मूर्ती तोडतानाची प्रक्रिया पाहण्यासाठी तिथे या भिक्खूंवर सक्तीही करण्यात आली.
द्ध तत्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या परदेशी अभ्यासकांना अवॉर्ड फॉर प्रमोशन ऑफ बुद्धिस्ट स्टडीज हा पुरस्कार सुरु करण्यात येत असल्याची माहिती भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (आयसीसीआर) अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी मंगळवारी पत्रकारपरिषदेत दिली.
महाराष्ट्र शासनाने शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त २६ जून हा ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून घोषित केला आहे. या दिनाचे औचित्य साधून आपण सार्यांनी ‘सामाजिक न्याया’ची संकल्पना समजून घेणे क्रमप्राप्त आहे.
बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी करत असतानाच मिळालेला ठेवा
मायावतींना पाठिंबा देणारा बहुसंख्य समाज त्या बौद्ध झाल्या, तर त्यांच्या मागे येईल का? ती येण्याची जोपर्यंत त्यांना खात्री वाटत नाही, तोपर्यंत त्या म्हणणार, ‘योग्य वेळी मी बौद्ध धर्माचा स्वीकार करेन.’ बाबासाहेबांपुढे असा कोणताच प्रश्न नव्हता. राजकारणदेखील नव्हते. केवळ आणि केवळ आपल्या समाजाचे हित डोळ्यापुढे होते. मायावती आणि बाबासाहेब यांच्यातील हा फरक आहे.
स्वातंत्र्यापासून इथल्या सत्ताधाऱ्यांनी, विचारवंतांनी व कम्युनिस्टांनी स्वा. सावरकरांना सातत्याने डावण्याचे कामकेले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंगोलिया भेटीनंतर भारत आणि मंगोलिया यांच्यातील नव्या मैत्रीपर्वाला सुरुवात झाली आहे.
दलाई लामांना भारतात आश्रय दिल्यापासून चीन भारताकडे संशयाच्या नजरेने पाहतो. एवढेच नव्हे तर १९५९ साली चिनी अध्यक्ष माओ-त्से यांनी तर तिबेटमधील विद्रोहाला भारताचीच फूस असल्याचा आरोप केला होता.
चीनची जमिनीची भूक मोठी असून त्याचे साम्राज्यवादी धोरण व्हिएतनामला मंजूर नाही. भारताशी मैत्री केल्याने आपल्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची खात्री व्हिएतनामला वाटते.