मुंबई (Job Vacancy Recruitment in mahamtb) : माध्यम क्षेत्रात काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी दै.मुंबई तरुण भारतर्फे सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, दै.'मुंबई तरुण भारत' आणि Maha MTB या संस्थेत विविध पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. दै. 'मुंबई तरुण भारत'च्या वडाळा, दादर येथील कार्यालयासाठी मुलाखत आणि लेखी परीक्षेअंती ही निवड केली जाणार आहे.
Read More
दूरदर्शनवरील पहिले मराठी वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. आज (9 डिसेंबर) सकाळी मुलूंड येथे निधन झाले. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून ते आजारी होते. मुलुंड पूर्व इथे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. आजच मुलुंड येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
राजकारणात राहून सुसंस्कृतपणा जपणं अत्यंत अवघड काम असतं. नागपूर महानगरपालिकेच्या नगरसेवक पदापासून ते मुख्यमंत्रिपदापर्यंत आणि विधानसभेच्या आमदारांपासून ते विरोधी पक्षनेतापर्यंत, देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पदं भूषविली. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात त्यांनी सत्तारूढ पक्षाला हलवून सोडले होते. त्यामुळे देवेंद्रजी कुठे अडचणीत येऊ शकतील, यासाठी अनेकांनी जंग जंग पछाडले. परंतु, एकही डाग त्यांच्यावर लागला नाही. मला वाटतं, हीच त्यांच्या प्रामाणिक आणि पारदर्शक कामाची पावती आहे.
फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकलेला, पुढे पत्रकारितेचा कोर्सही पुण्याच्याच ‘रानडे संस्थे’तून केलेला हा तरुण दूरदर्शनच्या सुवर्णकाळातील समस्त प्रेक्षकांचा लाडका वृत्त निवेदक बनला. ‘पुणे फेस्टिव्हल’चा तर तो अनेक वर्षे स्टार सूत्रसंचालक होता. ‘रयत शिक्षण संस्थे’च्या धामणीच्या (तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे) शाळेत माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेला, पुण्याच्या संस्कारात वाढलेला प्रदीप भिडे नुकताच आपल्यातून निघून गेला. त्यानिमित्त या माध्यमकर्मीच्या कारकिर्दीचा हा धावता प्रवास...
महाराष्ट्राचे सेवानिवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या महाराष्ट्र आणि गोव्यासाठीच्या विशेष संवाददातापदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रवीण राऊत यांच्या सहभागामुळे राज्यभरात गाजलेल्या गोरेगांवच्या सिद्धार्थ नगर येथील पत्राचाळीतील रहिवाशांच्या समस्या काही केल्या संपत नसल्याचे चित्र आहे.
प्रतिभा, अभिरुची व परिश्रम घेणार्यांनाच संगीत क्षेत्रात यशाची उंच भरारी सहज घेता येते. अशाच एका संगीतातील जादूगार आशुतोष मालती विद्याधर वाघमारे या कलाकाराविषयी जाणून घेऊया.