सुप्रसिद्ध कलाकार डॉ. सुबोध केरकर (यांनी चित्रकार बनण्यासाठी आपली मेडिकल प्रॅक्टिस बंद केली) म्हणतात की, “तुम्हाला व्याकरण येते किंवा तुमच्याकडे लेखनकला आहे, म्हणून तुम्ही लेखक बनत नाही, तर उत्तम लेखक बनण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला काहीतरी लोकांना सांगावेसे वाटले पाहिजे आणि ते वेगळे असले पाहिजे.” Book
Read More
माहीम सार्वजनिक वाचनालयातर्फे पुस्तक परीक्षण स्पर्धा!
सह्याद्री’ या दूरचित्रवाणी वाहिनीवरील निर्माते आणि माध्यमतज्ज्ञ रविराज गंधे यांचे ’भिरभिरं’ हे पुस्तक त्यांनी वेळोवेळी केलेल्या विविधांगी लेखनाचा संग्रह आहे. त्यांनी कथांपासून ललितलेखांपर्यंत निरनिराळे लेखनप्रकार हाताळले आहेत. या संग्रहात त्यांच्या आठ कथा आहेत. त्यातील ‘पेशंट’ आणि ‘भिरभिरं’ या कथा १९८०च्या दशकात ‘सत्यकथा’ मासिकात प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, आजही त्या ताज्या वाटतात. ‘भिरभिरं’ ही अगदी अनोखी कथा. अनंत विचार-संवाद यांच्या कोलाहलातून वाट काढत जाणारी ही कथा कथानायकाला महसूल लिपिकाची नोकरी मिळाल्
शरद जोशी... हे नाव ऐकल्यावर तुम्हाला आठवत असेल, तो शेतकरी नेता. पण, हे पुस्तक मात्र त्या नेत्याचं नाही. हे आहे त्याच्या नेतेपणाच्या चेहर्याआड असलेल्या माणसाचं.
शिरीष कणेकर यांची लेखनाची एक आगळी शैली होती. त्यात खट्याळपणा होता; परखडपणा होता; इरसालपणा होता आणि तितकीच हृदयता देखील होती. ‘साखरफुटाणे’ हे त्यांचे पुस्तक त्यांच्या या शैलीचे प्रत्यंतर देईल. या पुस्तकाला ’खेंगट’ असे नाव देण्याचा विचार होता; पण अनेकांना ते समजणार नाही.
समाधानी, समृद्ध आणि समंजस-समन्वित समाजजीवनाच्या शोधात आज सारे जग चाचपडत आहे, असे म्हटले तरीही अतिशयोक्ती होणार नाही. दुसर्या शब्दात सांगायचे, तर समाजवादी, साम्यवादी वा भांडवलशाही या सर्व आकृतीबंधांचे अपुरेपण स्पष्टपणे प्रत्ययाला आले आहे.
विश्वाची ओळख हा खरं तर अत्यंत अवघड विषय. याचा अनेक स्तरांवर परिचय करून देता येतो. मात्र, हौशी खगोल अभ्यासकाला लागते, त्याची प्राथमिक ओळख! खगोलशास्त्राविषयी बहुतेक सर्वांनाच कुतूहल असते. अभ्यास करायची इच्छा असते. त्यांच्यासाठी समजायला सोपी, वाचनीय आणि विशेषतः मराठी पुस्तकांची गरज आहे. याच विषयावर ‘राजहंस प्रकाशन’तर्फे डॉ. गिरीश पिंपळे यांनी लिहिलेले ‘ओळख आपल्या विश्वाची’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.
पुस्तकात साई संस्थानची, संस्थानने केलेल्या कामांची सविस्तर-सचित्र माहिती दिली आहे. त्यामुळे हे पुस्तक आकर्षक ठरते. पुस्तकाची बांधणी, छपाई, मुखपृष्ठ, दर्जा अत्युत्तम असून आपल्या परिचितांना भेट देण्यासाठीही उत्तम ठरणारे आहे. खरे म्हणजे डॉ. हावरे यांनी हे पुस्तक लिहून सर्वच साईभक्तांना आनंदाची अनुभूती दिली आहे, असे हे पुस्तक संग्रही ठेवावे असेच.
‘संघटन स्थापनेमागील विचार प्रभाव,’ ‘संघटनेचे ध्येय आणि वाटचाल,’ ‘संघटनेची निर्मिती,’ ‘संघस्वयंसेवक,’ ‘संघप्रचारक,’ ‘व्यवस्थापन कार्यपद्धती आणि विस्तार,’ ‘संघाच्या उपलब्धी’ आणि ‘हिंदू स्वयंसेवक संघ’ या प्रकरणांमध्ये हे पुस्तक विभागलेले असून प्रत्येक प्रकरणात त्या त्या अनुषंगाने सविस्तर विवेचन केले गेले आहे.
प्रस्तुत पुस्तकात भारतामध्ये गेल्या शेकडो वर्षांमध्ये तलाव बांधण्याचं शास्त्र कसं कसं रुजत गेलं, बहरत गेलं यावर प्रकाश टाकला आहे. राजस्थानसारख्या अल्प-स्वल्प पाऊस पडणाऱ्या प्रदेशातही पाणी साठवण्याच्या क्लृप्त्या शतकानुशतकं टिकून आहेत, हे लेखकं अनुपम मिश्र यांच्या लक्षात आलं
शुक्रवार दि. २५ जानेवारी रोजी डॉ. सच्चिदानंद शेवडे व डॉ. परीक्षित शेवडे यांनी संयुक्तपणे लिहिलेल्या 'राम मंदिरच का?' या पुस्तकाचे प्रकाशन डोंबिवली येथे होणार आहे.
सत्तेचा मोह, नेतेपदाचा गर्व आणि नोकरशाहीला हवं तसे झुकवण्याची काही काँग्रेसी नेत्यांची हुकूमशाही वृत्ती यांचे या पुस्तकात लेखकाने केलेले वर्णन मनस्वी चीड आणणारे आहे. त्यामुळे ‘हिंदू दहशतवादा’चा पर्दाफाश करणारे हे पुस्तक प्रत्येक हिंदू बांधवाने तर वाचलेच पाहिजे, शिवाय हिंदू धर्मावर टीका करणाऱ्यांची पुराव्यांसहित बोलती बंद करण्यासाठी या पुस्तकातील संदर्भ कामी येऊ शकतात.
गजानन महाराज... केवळ महाराष्ट्रभूमी नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातूनही महाराजांच्या दर्शनाला शेगावला आवर्जून भेट देणारे भक्त आजही दिसतात
आरव्हीएस मणी यांचे ‘दी मिथ ऑफ हिंदू टेरर’ हे इंग्रजी पुस्तक प्रकाशित झाले आहे. या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद लवकरच प्रकाशित होत आहे.
अमिलिया एयरहार्ट हे एक उदाहरण आहे की जिने पुरुषप्रधान असणाऱ्या वैमानिक क्षेत्रात एवढी विलक्षण चमक दाखवली की ते पाहून कित्येक महिलांनी आकाशात भरारी घ्यायची स्वप्नं पाहिली. प्रस्तुत पुस्तक अमिलियाच्या गगनभरारीचा प्रवास मांडतं.