वर्ग 'क'ची सगळी पदं एमपीएससीच्या माध्यमातून भरण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच स्पर्धा परीक्षांसाठी नवा कायदा आणणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
Read More
तलाठी भरती प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकारांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी ठोस कायदा केला जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवार, दि. १४ डिसेंबर रोजी लेखी उत्तरात दिली.
लग्नानंतर अभ्यासात अजिबात खंड न पडू देता, नोकरीसोबतच अभ्यासाचे नियोजन आखत, तब्बल सहा वर्षं मेहनत करून यश खेचून आणणार्या वंदना गायकवाड यांच्याविषयी...
कोकण पदवीधर मतदारसंघाचे भाजप आमदार निरंजन डावखरे यांच्या संकल्पनेतून कुडाळ येथील शासकीय सार्वजनिक ग्रंथालयात तयार केलेला स्पर्धा परीक्षा विभाग व स्वर्गीय वसंतराव डावखरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे (ई-लायब्ररी) लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आले. या केंद्रामुळे कुडाळ शहराबरोबरच अन्य तालुक्यांतून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना सहजगत्या दर्जेदार पुस्तके उपलब्ध होणार आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग(एमपीएससी) यांच्यामार्फत राज्यातील विविध रिक्त पदे भरली जातात. राज्य शासनाच्या वतीने विविध रिक्त पदे भरण्यासाठी बंपर भरती केली जाईल. त्यामुळे स्पर्धा परीक्षांसाठी मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवी संधी शासनाकडून उपलब्ध होणार आहे. तसेच, एमपीएससीतर्फे भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांच्या संख्येत यंदा वाढ करण्यात आली आहे
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. त्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारकडून ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंधही लादण्यात आले. राज्यात पुढील काही दिवसांत ‘लॉकडाऊन’ची घोषणाही होऊ शकते. परंतु, या सर्व निर्णयांचा फटका जसा व्यापारीवर्गाला बसला, त्याप्रमाणेच विद्यार्थ्यांनाही बसलेला आहे. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लाखो विद्यार्थी आज अनिश्चिततेच्या उंबरठ्यावर उभे आहेत.