भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आणि पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. पुढील दशकात भारत जगाच्या एकूण विकासात २० टक्के योगदान देईल, असे जी-२० शेरपा अमिताभ कांत यांनी AIMA परिषदेत बोलताना सांगितले.
Read More
नुकत्याच पार पडलेल्या ‘जी २०’ शिखर परिषदेच्या नवी दिल्ली घोषणापत्रामध्ये प्रारंभीच ‘हे युद्धाचे युग नाही’ या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार करून संपूर्ण घोषणापत्रास एकमताने मान्यता देण्यात आली. त्यामुळे खरे तर अनेकांना धक्का बसला; मात्र ‘विश्वमित्र’ भारताची तपश्चर्या जगासाठीही महत्त्वाची ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी जी-२० शिखर परिषदेत जारी केलेल्या 'दिल्ली घोषणापत्रावर एकमत निर्माण केल्याबद्दल भारताचे जी-२० शेर्पा अमिताभ कांत यांचे कौतुक केले. थरूर म्हणाले की जी-२० मध्ये भारतासाठी ही एक विशेष कामगिरी आणि अभिमानास्पद क्षण आहे.
भारताच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे जी-20 परिषद पार पडत आहे. ९ सप्टेंबर रोजी या बैठकीला सुरुवात झाली असून दोन दिवस चालणार आहे. मात्र, जी-20 बैठक सुरु होण्याच्या आधीपासूनच एका गोष्टीची चर्चा सुरु होती ती म्हणजे शेरपा. हे शेरपा काय आहे? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
२०३० पर्यंत भारत १ ट्रिलियन डॉलरची ‘इंटरनेट इकोनॉमी’ होणार, असा कयास ‘टमासेक’, ‘गुगल’ आणि ‘बेन’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थांनी नुकताच काढला आहे. यापुढे जाऊन त्यांचा अहवाल असेही सांगतो की, त्यावेळच्या भारताच्या ‘जीडीपी’ (सकल घरेलू उत्पन्नात) ‘इंटरनेट इकोनॉमी’चा वाटा तब्बल १२-१३ टक्के इतका असणार आहे, जो २०२२ मध्ये चार ते पाच टक्के होता. सध्या आपली अर्थव्यवस्था ३.३ ट्रिलियन डॉलरची आहे, म्हणजे २०३० मधील भारताची केवळ ‘इंटरनेट प्रेरित अर्थव्यवस्था’ २०२३च्या सकल अर्थव्यवस्थेच्या एकूण आकारमानाच्या एक तृतीयांश
१३ ते १६ डिसेंबर २०२२ या कालावधीत भारताच्या जी२० अध्यक्षांच्या शेर्पा ट्रॅक अंतर्गत १ली डेव्हलपमेंट वर्किंग ग्रुप बैठक आयोजित करण्यासाठी सज्ज आहे, भारताच्या जी२० अध्यक्षतेखालील डेव्हलपमेंट वर्किंग ग्रुप (डीब्ल्यूजी) ची पहिली बैठक १३-१६ डिसेंबर २०२२ दरम्यान मुंबईत होत आहे. जी२० सदस्य, अतिथी देश आणि आमंत्रित आंतरराष्ट्रीय संस्था या बैठकीला उपस्थित राहतील. भारतीय अध्यक्षपद कार्यगटाच्या अधिकृत बैठकीपूर्वी - "डेटा फॉर डेव्हलपमेंट: २०३० अजेंडा पुढे नेण्यासाठी जी२० ची भूमिका" आणि "हरित विकासात नवीन जीवनाचा अंतर्भ
अन्न प्रक्रीया उद्योग हा भारतात सर्वात जलदगतीने विस्तार करणारा उद्योग आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात या क्षेत्रामुळे ७३ लाख नवे रोजगार उपलब्ध करून दिला आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकूण ९० लाख रोजगार उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य या क्षेत्राने ठेवले असल्याची माहीती निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी दिली आहे. नुकताच नॅशनल रेस्ट्रॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाचा अन्न प्रक्रीया अहवाल २०१९ सादर करण्यात आला त्यावेळी ही घोषणा देण्यात आली आहे.