महाराष्ट्रात हायड्राॅईड्स (Hydroid) या समुद्री जीवाच्या 'कॉरिमॉर्फा' कुळाचे ७१ वर्षांनी दर्शन झाले. वसई तालुक्यातील भुईगाव किनाऱ्यावर या जीवाचे दर्शन झाले असून राज्यातून १९५३ साली 'कॉरिमॉर्फा' कुळाची शेवटची नोंद करण्यात आली होती. हायड्राॅईड्स (Hydroid) या जीवावर राज्यात फार कमी अभ्यास झाला असून यानिमित्ताने या जीवाच्या प्रजातींवर अभ्यास करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. (Hydroid)
Read More