ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक रमेश पतंगे यांनी लिहिलेले ‘डॉ. आंबेडकरांचा राष्ट्रविचार` हे पुस्तक आता संथाली भाषेतही अनुवादीत करण्यात आले आहे. हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील प्रा. भीमराव भोसले यांनी सर्वप्रथम या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद केला. त्या आधारावर विश्वभारती विद्यापीठातील सगेन मंडी या संशोधकाने या पुस्तकाचा संथाली भाषेत अनुवाद केला आहे. ‘आंबेडकर, भारत बनाओ राकाब रिनीच उदगया` असे या पुस्तकाचे नाव असून दि. १७ एप्रिल, २०१९ रोजी झारखंडच्या तत्कालीन राज्यपाल आणि सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस
Read More