Granthmata Bhimabai खाद्यसंस्कृतीसोबत वाचनसंस्कृती रुजवणार्या, तसेच वाचन चळवळीच्या माध्यमातून लोकांच्या मनाची मशागत करणार्या भीमाबाई जोंधळे यांच्या कार्याची दखल घेत, त्यांना यंदाच्या ‘मराठी भाषा संवर्धक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. तेव्हा आज ‘जागतिक पुस्तक दिना’निमित्ताने त्यांच्या या अनोख्या वाचन चळवळीचा आढावा घेणारा लेख...
Read More
Dr. Babasaheb Ambedkar : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आपण संविधान निर्माते म्हणून ओळखतो मात्र डॉ. बाबासाहेब हे फक्त संविधानापुरते मर्यादित नसून त्यांची ओळख ही आणखीनही उल्लेखनीय आणि ऐतिहासिक कार्य रत्नांनी जडलेली आहे. त्यावर विशेष प्रकाश टाकण्याची आवश्यकता आहे. म्हणून डॉ .बाबासाहेबांकडे पाहताना बाबासाहेबांचे इतरही उल्लेखनीय कार्य जसे की "हिंदू कोड बिल", औद्योगिक क्षेत्रातील बदल, स्त्रियांसाठीचे कायदे, कामगार कल्याणासाठी केलेल्या तरतुदी अर्थतज्ञ बाबासाहेब, पाणी तज्ञ बाबासाहेब अशा एक ना अनेक आर्थिक, सामाजिक आणि
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती देशभरात साजरी होत असताना, मुंबईतील एल्फिन्स्टन विभागातील ‘समता क्रीडा मंडळ’ या सामाजिक संस्थेने यावर्षीही आपल्या परंपरेला साजेसे आयोजन करत, बाबासाहेबांच्या विचारांचा जागर केला. ‘बाबासाहेबांना डोक्यावर न घेता, त्यांच्या विचारांना डोक्यात घ्या,’ हा प्रभावी संदेश यावर्षीच्या कार्यक्रमांतून पुन्हा एकदा ठळकपणे समोर आला.
( incentive scheme for BHIM UPI ) केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी २००० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या युपीआय व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सुमारे १,५०० कोटी रुपयांच्या प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली. या योजनेअंतर्गत, एखाद्या व्यक्तीने व्यापाऱ्याला केलेल्या २००० रुपयांपेक्षा कमी रकमेच्या पेमेंटवर एमडीआर (व्यापारी सवलत दर) खर्च सरकार उचलेल.
परभणी : ( Parbhani ) “सोमानाथ सूर्यवंशी दलित असल्यामुळे त्याला मारहाण झाली, असे वक्तव्य करणार्या राहुल गांधी यांचा तीव्र निषेध करत आहे,” असे ‘जय भीम आर्मी’ने जाहीर केले आहे. ‘जय भीम आर्मी’च्यावतीने सांगण्यात आले आहे की, “देशात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे राज्य आहे. संविधानाच्या राज्यात जातिभेदाला मुठमाती देण्यासाठी सर्व भारतीय समाज एकत्रितरित्या काम करत आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या मृत्यूचे राजकारण करून परभणी आणि पर्यायाने महाराष्ट्रात जातीय द्वेष प
भारतीय संविधानाचे निर्माते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सर्वसामान्यांना हक्क, अधिकार मिळाले. या अधिकार, हक्कांनी कित्येकांचे आयुष्य बदलले. ही माणूस म्हणून घडण्याची गोष्ट भीमराया तुझ्यामुळे या व्हिडिओतून अनोख्या आणि भावस्पर्शी पद्धतीने मांडण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे, या म्युझिक व्हिडिओतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाला अभिवादन करण्यात आलं आहे.
मुंबई : “मी ‘जय भीम’ म्हणतो, त्यामुळे माझे मंत्रिपद गेले होते. यादीमध्ये नाव असताना ऐनवेळी आपल्याला डावलले,” असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते तथा माजी मंत्री डॉ. नितीन राऊत ( Dr. Nitin Raut ) यांनी केला आहे. “एका सभेदरम्यान केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे काँग्रेस कायम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा तिरस्कार करते,” असे उघड झाले आहे.
राज्यभरात सध्या पावसाळी वातावरण असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही या खराब हवामानाचा फटका बसला आहे. भीमाशंकर येथे जात असताना खराब हवामानामुळे मुख्यमंत्री शिंदेच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे, असं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भीमाशंकराला घातलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज शेवटच्या श्रावण सोमवाराच्या निमित्ताने सर्व कुटुंबासह भगवान भीमाशंकराचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सह्याद्रीच्या कुशीतल्या देवराया (sacred groves) म्हणजे जैवपरंपरेचा खजिना. या भूभागामधील उत्तरेकडील प्रदेशातील देवराया (sacred groves) तशा फारशा प्रकाशझोतात येत नाहीत. कळसुबाई ते भीमाशंकर डोंगररांगेतील देवरायांवर (sacred groves) प्रकाश टाकणारा हा लेख...
मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत पवई येथे करण्यात आलेली अतिक्रमण निर्मूलन कारवाई ही कायदेशीर प्रक्रियेचे पालन करूनच करण्यात येत होती. या हल्ल्यात जखमी महानगरपालिका कर्मचारी तसेच पोलीस कर्मचा-यांची बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्तांसह प्रत्यक्ष ठिकाणास भेट देवून आस्थेवाईकपणे विचारपूस केली. या कारवाईदरम्यान महानगरपालिका कर्मचा-यांवर झालेला हल्ला कदापि सहन केला जाणार नाही. महानगरपालिका प्रशासन कर्मचा-यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे, असा विश्वास त्यांनी कर्मचा-या
भायखळा उद्यानात वैचारिक मेजवाणी
जिल्यातील दोंडाईचा येथे भीमजयंती मिरवणुकीवर कट्टरपंथी जमावाकडुन हल्ला करण्यात आला. भीमजयंती मिरवणुक दोंडाईचा येथिल जामा मशीद येथुन जात असताना कट्टरपंथी जमावाने मिरवणुकीवर भीषण हल्ला केला. या हल्ल्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी विवेक विचार मंचच्या वतीने करण्यात आली आहे. धुळे येथे पिडीत नागरिक, मुख्य फिर्यादी गोविंदा नगराळे व विवेक विचार मंचाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले तसेच पत्रकार परिषद घेण्यात आली.
भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचा शास्त्रीय संगीताचा वारसा चालवणारे, नवीन पिढीतील शास्त्रीय गायक आशिष विजय रानडे यांच्या सुरेल जीवनप्रवासाविषयी...
हरियाणातील सोनीपत येथील अशोका विद्यापीठात निदर्शने करताना, काही विद्यार्थ्यांनी ‘ब्राह्मण-बनियावाद मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या. ब्राह्मण आणि बनिया समाजाला शिवीगाळ करण्याबरोबरच त्यांनी ‘जय भीम-जय मीम’ आणि ‘जय सावित्री-जय फातिमा’ अशा घोषणा दिल्या. विद्यापीठात जात जनगणना करण्यात यावी आणि आरक्षणाच्या मागणीसाठी ही निदर्शने करण्यात आली. दरम्यान, विद्यापीठात अशा घोषणाबाजीला नेमकी परवानगी कुणी दिली, याची चौकशी होणे आवश्यक आहे.
भीमाशंकर अभयारण्यातील (bhimashankar sanctuary) 'महादेव वन निसर्ग परिचय केंद्र' पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. शुक्रवार दि.८ मार्च रोजी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या निसर्ग परिचय केंद्राचे 'व्हिडीओ काॅन्फरन्स'व्दारे उद्घाटन केले (bhimashankar sanctuary). औषधी वनस्पतींसह बारा ज्योर्तिलिंगांच्या प्रतिकृतीने सजलेले हे 'निसर्ग परिचय केंद्र' भीमाशंकरला भेट देणारे भाविक आणि पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे. (bhimashankar sanctuary)
कुठल्याही गोम्याला मी उत्तर देत नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबद्दलचा प्रश्न उडवून लावला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ अभिवादन दिनानिमित्त अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी भीमा कोरेगाव दंगल आणि दिल्लीतील हिंदूविरोधी दंगलीतील संबंधित भूमिकांसाठी अटक करण्यात आलेल्या शोमा सेन आणि उमर खालिद यांचे समर्थन करणारी प्रतिक्रीया नोंदवली आहे. आपल्या 'एक्स' अकाउंटवर त्यांनी यासंदर्भात पोस्ट केली आहे.
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी साक्ष नोंदवली गेली आहे. कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर प्रकाश आंबेडकर यांची साक्ष नोंदवली गेली. कोरेगाव भीमा इथे १ जानेवारी २०१८ ला हिंसाचार झाला होता. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती जे. एन. पटेल आणि निवृत्त मुख्य सचिव सुमित मलिक असा दोन सदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला आहे.
कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी ज्योति जगताप हिच्या जामीन याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने २१ सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलली आहे. ज्या फॉर्म्युलाच्या आधारे प्रकरणातील सह-आरोप वर्नोन गोंसाल्वेस आणि अरुण फरेरा यांच्या जामीन याचिकेवर निर्णय घेण्यात आला,त्यात जगताप यांची याचिका बसते की नाही यासंबंधी विचार केला जाईल,असे तोंडी मत खंडपीठाने मंगळवारी नोंदवले आहे.
कोरेगाव भीमा येथील २०१८ सालेल्या हिंसाचारातील आरोपी आणि संशयित नक्षलवादी वर्नन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गाण्यातील 'भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा' या वाक्यातील भीमथडी याचा अर्थ भीमा नदीच्या किनारी वसलेले एक गाव ज्याचे १९४७ पर्यंत नाव भीमथडी होते आणि १९४७ नंतर हे नाव बदलून या गावाचे नाव बारामती असे करण्यात आल्याची काहीशी स्पष्टता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. 'जय जय महाराष्ट्र माझा' अर्थात 'महाराष्ट्र गीत' या गाण्याची पुनरावृत्ती 'महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाच्या निमित्ताने करण्यात आली असून याच्या लोकार्पण सोहळ्यावेळी श
वाडा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती आज वाडा तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कल्याण - कल्याण पूर्वेतील ड प्रभाग समिती कार्यालयाच्या परिसरात उभे राहात असलेले डॉ. बाबासाहेब आंबडेकर स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही महिन्यात स्मारकाचे काम पूर्ण होणार असून पुढील वर्षी येणारी डॉ. बाबासाहेब आंबडेकरांची जयंती स्मारकात अधिक भव्य स्वरूपात साजरी केली जाईल, असे प्रतिपादन कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.
अगदी शालेय जीवनताच गरिबीचे चटके सहन करीत, वनीता गिरी यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मूळ गाव भिगवण, पण नोकरीच्या निमित्ताने त्यांनी पुणे शहर गाठले. या ठिकाणी पहिल्यांदा मिळेल ते काम केले. कोरोनाच्या काळात समाजासाठी काहीतरी करण्याच्या इच्छेने त्या या क्षेत्राकडे ओढल्या गेल्या अन् गेल्या तीन वर्षांपासून रुग्णवाहिकेची निरंतर सेवा त्या रुग्णांना देत आहेत. तसेच गोरगरिबांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्या सांगतात.
मुंबईतील डी.एच.गोखले आणि शामला गोखले न्यासाच्या निधीतून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठित असा ‘अंत्योदय पुरस्कार’ यंदा ‘जीवन संवर्धन फाऊंडेशन’चे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सदाशिव चव्हाण यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून एका प्रकट समारंभात हा पुरस्कार सदाशिव चव्हाण यांना प्रदान करण्यात येईल.
‘नम्र जाला भूतां। तेणें कोंडिलें अनंता’ या तुकारामांच्या अभंगातील ओळीप्रमाणे मातीशी स्वत:ची नाळ घट्ट जोडून असणार्या विकास कोकाटे यांच्या वादनकलेचा प्रवास...
पुणे महापालिकेकडून मिळकत करातून देण्यात येणारी ४० टक्के सवलत रद्द करण्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने देण्यात येणारा वत्सलाबाई जोशी पुरस्कार यावर्षी भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य व किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं उपेंद्र भट यांना जाहीर झाला असल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी कळविली आहे.
ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक रमेश पतंगे यांनी लिहिलेले ‘डॉ. आंबेडकरांचा राष्ट्रविचार` हे पुस्तक आता संथाली भाषेतही अनुवादीत करण्यात आले आहे. हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील प्रा. भीमराव भोसले यांनी सर्वप्रथम या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद केला. त्या आधारावर विश्वभारती विद्यापीठातील सगेन मंडी या संशोधकाने या पुस्तकाचा संथाली भाषेत अनुवाद केला आहे. ‘आंबेडकर, भारत बनाओ राकाब रिनीच उदगया` असे या पुस्तकाचे नाव असून दि. १७ एप्रिल, २०१९ रोजी झारखंडच्या तत्कालीन राज्यपाल आणि सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी संशयित आरोपी असलेल्या सुरेंद्र गडलिंगची आता ईडी चौकशी होणार आहे. विशेष एनआयए न्यायालयाने बुधवारी दि. १० ऑगस्ट रोजी 'ईडी'ला नागपूर येथील वकील सुरेंद्र गडलिंग याची मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी करण्याची परवानगी दिली. ईडीचे प्रकरण हे एल्गार परिषद-भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणावर आधारित आहे. ज्यात एनअएने गडलिंगसह १६ लोकांना अटक केली आहे.
संशयित नक्षलवादी वरवरा राव यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजुर केला आहे. राव हा २०१८ सालच्या कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी
केंद्र सरकारने बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचा प्रमुख नेता असलेल्या श्रीधर श्रीनिवासन याच्या स्मरणार्थ घेतलेल्या सभेत सहभागी झाल्याची साक्ष कोरेगाव-भीमा प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या हर्षाली पोतदारने दिली आहे. ११ आणि १२ जुलै रोजी झालेल्या कोरेगाव-भीमा आयोगाच्या मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावरील चौकशीवेळी पोतदार हिने साक्ष दिली आहे.
श्री क्षेत्र भीमाशंकर येथे जाण्यासाठी बैलघाट मार्गे ट्रेकिंगसाठी बाहेर पडलेले सहा युवक मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे रस्ता भरकटल्याने या सहा जणांना घोडेगाव पोलिस व स्थानिक ग्रामस्थांनी शोध मोहिम राबवून रविवारी रात्री सुखरूप बाहेर काढले.
‘माझे माहेर पंढरी’चा गजर करत वैष्णवांचा मेळा चंद्रभागेच्या तिरी विठूमाऊलीच्या दर्शनासाठी मोठ्या भक्तिभावाने दाखल होतो. ज्या क्षणाची वारकर्यांना आतुरता, उत्कटता दाटून आलेली असते, त्या विठूरायाच्या दर्शनाने त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटते. वारीचा उरलासुरला थकवा, क्षीण सगळा क्षणार्धात वाहून जातो. तेव्हा, अशा या वारीचा हा नेत्रदीपक सोहळा, संत अभंगांतून साकारलेले विठ्ठल दैवत आणि वारकर्यांचे हे आध्यात्मिक प्रकटीकरण अशा विविधांगी पैलूंचे दर्शन घडविणारे हे विशेष लेख....
भीमशाहिर महाकवी दिवंगत प्रतापसिंग बोदडे यांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान समाजाला प्रेरणादायी आहे. त्यांचे मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथे स्मारक उभारण्यात येईल, तसेच आपल्या खासदार निधीतून सामाजिक सभागृह दिवंगत प्रतापसिंग बोदडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारणार असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
कोरेगाव-भीमा हिंसाचारासंदर्भात तळोजा तुरूंगात असलेल्या सागर गोरखेने तुरूंगात सोईसुविधा मिळाव्यात यासाठी उपोषण केले. फोन वापरायला मिळावा, आमची पत्रे स्कॅन केली जाऊ नयेत, पंखा आणि पाणी उपलब्ध व्हावे, तसेच इतर काही मागण्यांसाठी ते उपोषण होते. सात दिवस झाले तरी त्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. शेवटी शिक्षक मतदारसंघाचे आमदार आणि लोकभारतीचे अध्यक्ष कपिल पाटील हे तळोजा तुरूंगात गेले. सागर गोरखेची त्यांनी समजूत काढली. तसेच त्याच्या मागण्यांसाठी आपण कसा पाठपुरावा केला, हे देखील त्यांनी अभिमानाने जाहीर केले. या घटनेल
महर्षी वाल्मिकींच्या रामायणातील सीतामातेची वारसदार आणि त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा सांगणार्या भिमाची लेक डॉ. रेखा बहनवाल. त्यांच्या कार्यजीवनाचा घेतलेला हा मागोवा....
कोरेगाव-भीमा दंगलीबाबत खोटे बोलण्याची जी काही स्पर्धा सुरू झाली, ती मुळातच संभाजीराव भिडेंबाबत विधाने करण्यापासून. त्याचा कळस गाठला तो शरद पवारांनी! आता आयोगासमोरही त्यांनी पलटी मारली आहे.
पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा येथे दि. १ जानेवारी, २०१८ ला मोठा हिंसाचार, जाळपोळ झाली होती व त्यात राहुल फटांगडे नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला होता व त्यानंतर ‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान हिंसक घटना घडल्या होत्या.
“२०१८ साली पुण्यातील ‘एल्गार परिषदे’नंतर कोरेगाव-भीमाममध्ये उसळलेल्या हिंसाचाराबद्दल आपल्याकडे काहीही माहिती उपलब्ध नाही,” असे अतिरिक्त प्रतिज्ञापत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जे. एन. पटेल आयोगासमोर सादर केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांना कोरेगाव भीमा प्रकरणात साक्ष देण्यासाठी चौकशी आयोगाने साक्ष बजावली आहे. ५ आणि ६ मे रोजी पवारांना साक्ष देण्यासाठी हजर रहावे लागणार आहे. १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास करण्यासाठी न्यायालयीन चौकशी आयोग स्थापन करण्यात आला होता. कोरेगाव भीमा दंगल व एल्गार परिषद खटल्या संदर्भात पवार साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन अर्धवट आणि दिशाभूल करणारे मुद्दे मांडले होते. त्यांनी न्यायालयीन चौकशी आयोगासमोर शपथेवर व पुराव्यासह बोलावे म्हणून आयोगाला
मुंबई येथील विशेष न्यायालयाने २०१८ सालच्या कोरेगाव भीमा प्रकरणातील कबीर कला मंचशी संबंधित चार आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत.
भीमा कोरेगाव प्रकरण तपासाअंतर्गत चौकशी आयोगाचे कामकाज हे अद्याप सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आयोगाने चौकशीसाठी समन्स बजावले असून दि. २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी ते आपली साक्ष नोंदवण्यासाठी आयोगापुढे हजर राहणार आहेत. याच पार्श्वभूमीवर २१ ते २५ फेब्रुवारी दरम्यान निवृत्त न्यायमूर्ती जे.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली समितीचं कामकाज होणार असून यंदा मात्र ते पुण्याऐवजी मुंबईत होणार आहे.
हैदराबादमधील संत रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, या पुतळ्याला ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ असे नाव देण्यात आले आहे. ११व्या शतकातील महान तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक रामानुज यांचा हा पुतळा २१६ फूट आहे. हा पुतळा कर्नाटकातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील मुचिंतल येथील 'चिन्ना जेयर स्वामी आश्रमा'मध्ये बनवण्यात आला आहे. १०१७ मध्ये जन्मलेल्या संत रामानुजाचार्य यांच्या १००० व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
ऑस्करच्या यूट्यूब चॅनेलवर दाखवला जाणारा पहिला भारतीय चित्रपट
जितेंद्र आव्हाड म्हणतात, “हमाम मे सब नंगे हैं।” पण, काही लोक असे असतात की, ते ‘हमाम’मध्येच नाही, तर सगळीकडेच नंगे असतात. ते नंगेपण कपडे आणि शरीराचे नसते, तर अनीती, असत्य आणि क्रूर स्वार्थाचे नंगेपण असते. ओबीसी समाजाबद्दल गरळ ओकून जितेंद्र आव्हाडांनी आपले हे नंगेपण सिद्ध केले. आता जितेंद्र आव्हाड म्हणतील, “नंगे को खुदा भी डरता हैं।‘ पण, आव्हाडांच्या नंगेपणाला ओबीसी समाज घाबरत नाही. त्यामुळेच जितेंद्र आव्हाड मोर्चाला पाहून पळून गेले ना? बाकी काय? जितेंद्र आव्हाड आणि ‘हमाम.’
भारतीय आणि हिंदू संस्कृतीचे ठळक वैशिष्ट्य आणि अभिमानस्वरूप असलेल्या वेदांची अनेक भाषांतरे किंवा अनुवाद अनेक विद्वानांनी केले. परंतु, केवळ विज्ञानाधिष्ठित अर्थाच्या दृष्टिकोनातून वेदांचा अर्थ सामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत लिहिण्याचे अत्यंत कठीण कार्य डॉ. भीमराव कुलकर्णी यांनी केले आहे.
५ डिसेंबर रोजी शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’समोर ‘जय भीम आर्मी’चा उपोषणाचा इशारा
पश्चिम महाराष्ट्र हा उसाच्या लागवडीसाठी सर्वात अनुकल प्रदेश. उसाच्या प्रश्नावरून अनेक प्रकारे राजकारण होताना दिसत. पण बारामती तालुक्यातील ''शहाजीनगर येथील नीरा-भीमा सहकारी साखर'' कारखान्याकडून २०२१-२०२२ या चालू गळीत हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रति टन २ हजार ५०० पेक्षा अधीक दर देण्यात येईल, अशी घोषणा कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व भाजप नेते श्री हर्षवर्धन पाटील यांनी एका बैठकीत केली.