वक्फ कायद्यातील दुरुस्तीच्या निमित्ताने पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात हिंदूंचा भीषण नरसंहार करण्यात आला. हा नरसंहार करणाऱ्या जात्यंध समाजकंटकांना पश्चिम बंगाल सरकारने संरक्षण दिले आहे. पश्चिम बंगालमधील सर्वसामान्य नागरिकांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करणारे निवेदन भाजपच्या बंगाली प्रकोष्ठतर्फे महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना देण्यात आले.
Read More
पश्चिम बंगालमधील हिंसाचार हा संविधानाचा अपमान : अॅड. शेलार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादर चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी माजी मंत्री भाई गिरकर यांनी काही मागण्या केल्या. या मागण्या मान्य करत अनुयायांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
विधिमंडळातील संविधान गौरव चर्चेवरील मुख्यमंत्र्यांचे ऐतिहासिक भाषण १४ एप्रिलपर्यंत पुस्तक रुपात प्रकाशित करावे, अशी मागणीचे निवेदन माजी मंत्री भाई गिरकर यांनी शुक्रवार, ४ एप्रिल रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सादर केले.
राज्यात शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी करताना महिला बचत गटांना त्यांच्या कामाचे पैसे वेळेत मिळण्यात ज्या अडचणी आहेत, त्या दूर केल्या जातील. या प्रकरणी आलेल्या तक्रारीची दखल घेऊन त्याची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य डॉ. वजाहत मिर्झा यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता.
स्वावलंबी व्हा, स्वाभिमानी व्हा, डॉ. बाबासाहेबांच्या आयुष्यातला प्रत्येक विचार हाच संदेश देत असतो. लोअर परेलच्या चाळीत राहणारे मयुर देवळेकर यांनी बाबासाहेबांच्या विचारांची कार्यप्रेरणा घेऊनच आयुष्याचे गणित सोडवले असेच म्हणावे लागेल. ‘साईन बोर्ड मेकिंग’च्या दुनियेत बाबासाहेबांच्या प्रेरणेने आणि आपल्या कष्टाने आणि ठसा उमटवणारे मयुर देवळेकर यांच्या उद्योजकतेचा घेतलेला आढावा...
भाजपचे आमदार भाई गिरकर यांचा आरोप
भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र अनुसूचित जाती मोर्चातर्फे २६ नोव्हेंबर, संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मंगळवारी मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात भाजप अनुसूचित जाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.