Vinay Singh Murder झारखंडमधील करणी सेनाचे अध्यक्ष विनय सिंह यांची जमशेदपूरमध्ये हत्या करण्यात आली आहे. त्याचा मृतदेह हा एनएच ३३ महामार्गावरील दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलपासून ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या एका शेतात होता. त्यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याने त्यांचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला असल्याचे सांगण्यात येत आहे.
Read More
Muskan Murder उत्तर प्रदेशातील बदायूमध्ये १८ फेब्रुवारी २०२५ रोजी एका डान्सर पत्नीची तिच्या पतीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पतीने दोघांच्या मदतीने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. पत्नीचे नाव मुस्कान असून वय वर्षे २८ होते. पती रिझवानकडे मुस्कानने प्रतिमहा ४० हजार रूपयांची मागणी केल्याने पती संतापू लागला होता याच गोष्टीला घेऊन त्याने आपल्या पत्नीची हत्या केली.
( Celebrity drug racket behind Disha Salian murder sanjay nirupam ) दिशा सालियन हत्येमागे मुंबईतील सेलिब्रेटिंचे ड्रग्ज रॅकेट आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी नव्याने केलेले आरोप गंभीर असून त्यांच्या तक्रारीवर लवकरच मालवणी पोलीस ठाण्यात ‘एफआयआर’ नोंदवला जाईल. दिशा सालियन हत्याकांडात उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांची मोठी भूमिका असल्याचे पुरावे आहेत. लवकरच आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल होईल, असा गौप्यस्फोट शिवसेना उपनेते तथा प्रवक्ते संजय निरुपम यांनी गुरुवार, दि. २७ मार्च रोजी केला.
Adarsh Murder रेल्वे गाड्यांमध्ये अनेकदा तृतीयपंथीयांकडून पैसे मागताना आरेरावी केली जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये घोळक्याने असणाऱ्या तृतीयपंथींनी पैसे न देणाऱ्या व्यक्तीला धमकावत मारहाण केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मध्य प्रदेशातील भोपाळ-विदिश बासोदादरम्यान, काही तृतीयपंथीयांनी एका प्रवाशाची हत्या करत रेल्वेतून फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेत तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला असून कुटुंबियांकडून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
( Disha Salian was murdered after being gang-raped Reinvestigate again Father Satish Salian files petition in High Court ) दिशा सालियानवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप करत या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याच्या मागणीसाठी तिचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
Saurav Murder उत्तर प्रदेशातील मेरठमधील ब्रह्मपुरी पोलीस ठाणे परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. ज्यात एका पत्नीने तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह घरातील एका मोठ्या ड्रममध्ये ठेवण्यात आला आणि त्यावरील असणारे लोखंडी झाकण सिमेंटचा लेप देऊन बंद करण्यात आले. कोणालाही कसलाही संशय येऊ नये म्हणून, पत्नी तिच्या पतीच्या मोबाईलवरून त्याच्या जवळच्या लोकांना सतत मेसेज आणि कॉल करत. या संबंधीत घटनेची माहिती पोलिसांनी घटनास्थळी जाखल झाले होते. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनास
Khokya Bhosale बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच धनंजय देशमुख यांना मारहाण केल्याप्रकरणाचा व्हि़डिओ काही दिवसांआधी व्हायरल झाला. त्यानंतर फोटोच दिसणाऱ्या आरोपींची माहिती समोर आली. त्यामुळे या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा विश्वासू असलेल्या वाल्मिक कराडला मुख्य गुन्हेगार ठरवले आहे. यानंतर आता बीडमधील गुन्हेगारांचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. अशातच आता बीडमधील सतीश भोसले उर्फ खोक्याचे अनेक मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे खोक्या भोसलेच्या पोलिसांनी प्रयागराजमध्ये मुसक्या आवळल्या आहेत. तसेच त्याचे अनधिकृत बा
(Mahadev Munde Case) महादेव मुंडे हत्याप्रकरणाचा तपास तात्काळ एसआयटी आणि सीआयडीकडे द्यावा, हत्येच्या कटात ज्यांनी फोन केलेत त्या आरोपींचे सीडीआर काढावे तसेच महादेव मुंडेंच्या आरोपींना तात्काळ अटक करावी या ३ प्रमुख मागण्यांसाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि मुंडे कुटुंबीय बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला बसले आहेत.
Himani Narwal Murder राहुल गांधीसोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या ३० वर्षीय काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी नरवाल (Himani Narwal)यांची हत्या करण्यात आली. हरियाणा संस्कृतीशी मिळता जुळता पोषाख परिधान केल्यानंतर चर्चेत आलेल्या हिमानी रोहतक शहरातील विजय नगरच्या रहिवासी होत्या. त्यांनी वैश्य महाविद्यालयातून एमबीए आणि कायद्याच्या पदवीचे शिक्षण घेतले होते.
(Bajrang Sonwane Press Beed ) बीडमध्ये दिवंगत संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या कुटुंबियांसह मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस असून बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मस्साजोगमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाला भेट देत ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबियांशी संवाद साधला. त्यावेळी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बजरंग सोनवणे यांनी संतोष देशमुख यांची हत्या होत असताना लाईव्ह पाहिली जात होती, असा गंभीर आरोप केला आहे. तसेच आरोपींच्या मोबाईल फोन्सची सिडिआर चौकशी व्हावी अशी देखी
(Suresh Dhas Massajog ) बीडमधील मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी देशमुख कुटुंबियांसह मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलनाला बसले होते. मात्र आता आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी आंदोलनस्थळी जाऊन भेट दिल्यानंतर मस्साजोग मधील ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
(Suresh Dhas) आमदार सुरेश धस यांनी शनिवार दि. २२ फेब्रुवारी रोजी बीड येथील मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. याचदरम्यान सुरेश धस यांनी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. मस्साजोग ग्रामस्थांकडून करण्यात आलेल्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यानंतर त्यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
(Chetana Kalse Case) बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण लावून धरणारे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या तीन दशकापासून बीडमधील काही हत्या प्रकरणांचे दाखले देत त्यांनी बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला आहे. या हत्या प्रकरणांचे दाखले देत असताना त्यांनी चेतना कळसे नावाच्या मुलीच्या ह्त्येचा उल्लेख केला.
(Beed Case ) बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड प्रकरणात आता पुण्यातील माजी नगरसेवक दत्ता खाडेंची सीआयडी चौकशी करण्यात आली आहे.
(Santosh Deshmukh) संतोष देशमुख हत्याप्रकरणातील सहा संशयित आरोपींची पोलिस कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे आज त्यांना बीड जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. परंतु न्यायालयात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, त्यांना न्यायालयासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित करण्यात येण्याची शक्यता आहे.
(Beed Case) बीड प्रकरणात सहा आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सहाही आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. सरकारी वकिलांकडून आरोपींच्या एसआयटी कोठडीची मागणी करण्यात आली होती. या मागणीला आरोपींच्या वकीलांनी जोरदार विरोध केला. अखेर न्यायमूर्तींनी आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली.
: (Walmik Karad) बीडमधील संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणांमधील संशयित आरोपी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Saif Ali Khan बॉलिवूडचा अभिनेता नावब सैफ अली खानवर (Saif Ali Khan) चाकूने हल्ला केल्याची घटना दि : १६ जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्री २ वाजता घडली आहे. त्यानंतर सैफ अली खानला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्रावर झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याला लिलावती रुग्णालयामध्ये दाखल कऱण्यात आले. यावेळी मुलगा इब्राहिमने सैफला तीन चाकी गाडीमध्ये बसवले. वेळ न गमावण्याच्या भीतीने इब्राहिमने एका अॅटो रिक्षामध्ये बसवले. त्यानंतर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
(Santosh Deshmukh Murder Case) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी नवीन अपडेट समोर आली आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणीच्या तपासासाठी १ जानेवारीला स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, काही अधिकाऱ्यांना हटवण्यात आले आहे.
प. बंगालमधील नैहाटी, उत्तर २४ परगणामध्ये रविवारी १२ जानेवारी २०२५ रोजी रात्री एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर तीन गोळ्या झाडत तिची हत्या केली. चित्रपट पाहण्यावरून नराधम्याने केलेले हे कृत्य क्रूर असल्याचे दिसून आले आहे. आरोपीचे नाव हे महेंद्र प्रताप असे नाव आहे. त्याने आपल्या ३० वर्षीय पत्नीवर गोळीबार करत हत्या केली. पत्नीचे नाव चंद्ररेखा असे नाव असून तिच्या छाताडावर गोळीबार करण्यात आला असल्याची काळीज हेलावून टाकणाली घटना घडली आहे. त्यांना तत्काळ एका शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
(Saundana Sarpanch Accident) बीडच्या केज तालुक्यामधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहे. अशातच आता बीडमधीलच परळीमध्ये राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने एका सरपंचाला उडवल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्देवी घटनेत सौंदाणा गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच या भीषण अपघातात क्षीरसागर यांच्या दुचाकीचा चेंदामेंदा झाला. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
(Vishnu Chate) बीड सरपंच संतोष देशमुख ह्त्या आणि अवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणांमध्ये अटकेत असणाऱ्या संशयित आरोपी विष्णू चाटेला १८ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ११ जानेवारी रोजी त्याला केज न्यायालयाकडून २ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली होती. दोन दिवसांच्या कोठडीची मुदत आज संपल्याने आरोपी विष्णू चाटेला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.
(Walmik Karad) बीड मस्साजोगच्या सरपंच देशमुख हत्या प्रकरणामुळे वाल्मिक कराड हे नाव गेला महिनाभर राज्यात चर्चेत आहे. मात्र वाल्मिक कराडनंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड (Sushil Karad) देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडच्या मुलाविरोधात सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.
(Dharashiv) पैठण, जालन्यानंतर आज धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. बीड मस्साजोग सरपंच देशमुख हत्या प्रकरण आणि परभणी प्रकरणात न्यायाची मागणी करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील जनसमुदाय रस्त्यावर उतरणार आहे. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन न्यायाची मागणी केली जाणार आहे.
(Santosh Deshmukh Murder Case) बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संतोष देशमुख हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड हे संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी एकमेकांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. ६ डिसेंबर रोजी मस्साजोगला जातना सुदर्शन घुलेने वाल्मिक कराडला फोन केल्याची माहिती समोर येत आहे.
(Vishnu Chate) बीड हत्येप्रकरणी विष्णू चाटेला शुक्रवार दि. १० डिसेंबर रोजी खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली होती. मात्र विष्णू चाटेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणी ताबा मिळवण्यासाठी एसआयटीने रीतसर अर्ज केला होता. त्यासंदर्भातील सुनावणीकरिता आज त्याला पुन्हा केज न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकारी वकीलांकडून विष्णू चाटेच्या सीआयडी कोठडीची मागणी करण्यात आली होती. ही मागणी न्यायालयाकडून मंजूर करण्यात आली असून विष्णू चाटेला २ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
(Shubhada Kedare Case) पुणे शहरामध्ये भर दिवसा कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या शुभदा केदारे (वय २८ ) हिच्यावर कोयत्याने हल्ला करून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवार दि. ७ जानेवारी रोजी घडला. त्यानंतर गुरुवारी या घडल्या प्रकाराचा संपूर्ण व्हिडीओ व्हायरल झाला. त्या व्हिडीओमध्ये आसपास ४० ते ५० माणसांची वर्दळ असतानाही आरोपीने तरुणीवर हल्ला केला. गर्दीतले लोक या घटनेत बघ्याची भूमिका घेताना दिसतात. आरोपी शुभदावर वार करत असताना तिच्या मदतीला कोणीही पुढे सरसावले नसल्याचे या व्हिडीओतून समोर आले आहे.
(Vishnu Chate) विष्णू चाटेची ४ दिवसांची वाढीव कोठडी संपली असून आता त्याला खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. खंडणी प्रकरणात संशयित आरोपी विष्णू चाटे याला केज न्यायालयात दाखल करण्यात आले होते. केज न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये केलेली आहे.
(Krishna Andhale) बीड मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला आहे. मात्र अद्याप या प्रकरणातील एक संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यामध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. याचदरम्यान संतोष देशमुखांच्या भावाकडून लवकर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
(Santosh Deshmukh Murder Case) बीड मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी तसेच सरपंच देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, अश्या मागण्या या मोर्च्याद्वारे करण्यात येत आहेत. आज आज जालना येथे मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने महा जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच देशमुखांच्या हत्येविरोधात आक्रोश व्यक्त करण्यासाठी मोठा जनसमुदाय एकवटलेला दिसून आला.
Deepak Kumar Murder एका हिंदू तरुणाचा मृतदेह अस्ताव्यस्त स्वरूपात पडलेला होता. मृतदेह हा दीपक कुमार नावाच्या व्यक्तीचा असल्याचे सांगण्यात आले आहे. ही घटना बुधवारी ८ जानेवारी २०२५ रोजी फरिदाबाद येथे घडली होती. दीपक हा १६ डिसेंबरपासून फरार होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी दीपक फरार असल्याची तक्रार केली. दीपकचा मृतदेह एका झुडपात अस्ताव्यस्त पडला होता. दीपकची काही बोटेही गायब असल्याचे दिसून आले होते.
( Beed Case ) बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापले असताना आता बीड पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. हवेत गोळीबार करून त्याचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर बीड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोळीबार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करत ७४ जणांचे शस्त्र परवाने रद्द केले आहेत. यामध्ये कैलास फड, माणिक फड, बाळासाहेब सोनवणे यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी ही कारवाई केली आहे.
(Dhananjay Munde) अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंत्रालयात हजर झालेले आहेत. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यांची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. अशातच मंत्रिमंडळ बैठकीआधी त्यांनी प्रसारमाध्यमांना राजीनाम्यावरून प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, "मी काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही", असे त्यांनी स्पष्ट केले.
(Dhananjay Munde) बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी व सत्ताधारी आमदारांकडून केली जात आहे. आमदार सुरेश धस यांच्याकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार आरोप करण्यात येत आहेत. यासंदर्भात आमदार धसांकडून होणाऱ्या आरोपांवर मंत्री मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
छत्तीसगड राज्यातील पत्रकार मुकेश चंद्राकरची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव हे सुरेश चंद्राकर आहे. पोलिसांनी एक विशेष पथक तयार करत आरोपी सुरेशला हैदराबाद येथून अटक केली आहे. याप्रकरणाची माहिती स्वतः आयजी पी सुंदरराज यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
(Chandrasekhar Bawankule) भाजप-महायुती सरकारमध्ये पालकमंत्रीपदाबाबत कोणताही तिढा नसून, उपमुख्यमंत्री अजित पवार हे परदेशात गेले होते, त्यामुळे चर्चा झाली नाही. पालकमंत्रीपदासंदर्भात फारतर दोन दिवसांत निर्णय होईल, असा विश्वास महसूल मंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. त्यांनी दि. ६ जानेवारीला सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर सद्यस्थिती माध्यमांसमोर सांगितली.
(Santosh Deshmukh Murder Case Update) बीड जिल्ह्यात मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात प्रमुख आरोपींसह देशमुखांचे लोकेशन देणाऱ्यालाही स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. देशमुख यांची ज्याने टीप दिली तो सिद्धार्थ सोनवणे त्यांच्या अंत्यविधीलाही हजर असल्याची माहिती समोर आली आहे.
Rail Jihad हैदराबाद-दिल्ली दक्षिण रेल्वे मार्गात प्रवास करत असताना एका हिंदू युवकाने चोरी करणाऱ्या युवकावर चोरीचा आक्षेप घेतल्याने त्याची हत्या करण्यात आली आहे. ही घटना गुरूवारी २ जानेवारी २०२५ या नुतनवर्षात घडली आहे. पीडित युवकाचे नाव हे शशांक रामसिंह राज असे असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील आहे.
(Santosh Deshmukh Murder Case) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून ताब्यात घेतल्यानंतर शनिवार, दि. ४ जानेवारी रोजी सिद्धार्थ सोनवणे याला मुंबई येथून अटक करण्यात आली. या तीनही आरोपींना केज येथील न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि. १८ जानेवारीपर्यंत 'सीआयडी' कोठडी सुनावली आहे.
(Walmik Karad) बीड मस्साजोगच्या सरपंच देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड मंगळवारी ३१ डिसेंबरला पुणे सीआयडी मुख्यालयात शरण आला. शरणागतीनंतर सायंकाळी त्याला पुणे पोलिसांनी केज पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर रात्री उशिरा कराडला केज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयातील युक्तिवादानंतर त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मध्यरात्री दीडच्या सुमारास त्याला केज न्यायालयातून बीड शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे.
(Sudarshan Ghule) सीआयडीच्या कारवाईनंतर खंडणी प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड पोलिसांना मंगळवारी ३१डिसेंबरला सीआयडीच्या पुणे मुख्यालयात शरण आला. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर त्याची सीआयडी चौकशी सुरू आहे. मात्र मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सुदर्शन घुले हा शरण येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
(Walmik Karad) खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पोलिसांना शरण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याच्या दिवशी वाल्मिक कराड हा उज्जैनमध्ये होता, अशी माहिती आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर वाल्मिक कराडची बँक खाती गोठवण्यात आली आहे. त्याचबरोबर वाल्मिक कराडच्या नातेवाईकांची बँक खाती गोठवण्यात आल्याची माहिती आहे. वाल्मिक कराडच्या पत्नीची सीआयडीकडून कसून चौकशी करण्यात आली आहे.
(MLA Suresh Dhas) अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबाबत आमदार सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. "प्राजक्ता माळींबाबत माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला. कुणाचेही मन दुखावले असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो", असे सुरेश धस म्हणाले.
: (CM Devendra Fadnavis) बीडच्या मस्साजोग येथील सरपंचांच्या हत्येचा मास्टरमाईंड कुणीही असला तरी त्याच्यावर कारवाई होणार असून या घटनेची दोन प्रकारे चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. शुक्रवार, २० डिसेंबर रोजी विधानसभेत बीड प्रकरणावर त्यांनी सविस्तर निवेदन दिले.
(CM Devendra Fadnavis) बीड जिल्ह्यात झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता एसआयटी (Special Investigation Team) चौकशी करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना याबाबत माहिती दिली आहे. भाजप आमदार सुरेश धस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याबाबत मागणी केली होती.
(Beed) माजी सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी सलग दुसऱ्या दिवशीही मस्साजोगमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. मस्साजोग मध्ये सर्वत्र तणावपूर्ण शांतता पसरली आहे. ४८ तासामध्ये सर्व आरोपींना जेरबंद करण्याचे पोलीसांनी आश्वासन दिले आहे. १० डिसेंबरच्या मध्यरात्री संतोष देशमुखांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध म्हणून सलग दुसऱ्या दिवशीही मस्साजोगमधील ग्रामस्थांसोबत व्यापाऱ्यांनीही बंद पुकारला आहे.
(Yogesh Tilekar) पुण्यामधील भाजपचे विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पहाटे फुरसुंगी फाट्यावरून सतीश वाघ यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांना पुढे तपासादरम्यान घटनास्थळापासून ४०-४५ किमी अंतरावर शिंदवणे घाटामध्ये सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला. मामांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या योगेश टिळेकरांनी पक्ष आणि मतदारसंघ त्यांच्या परिवाराच्या पाठीमागे भक्कमपणे उभे असल्याचे सांगितले.
Murder मित्राने चेष्टा केल्याने आपल्या मित्रावर कात्रीने हल्ला करत त्याची हत्या केली आहे. मैत्रीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना आहिल्यानगर येथील मुकुंदनगर येथे घडली आहे. हल्ला करणाऱ्या युवकाचे नाव हे शमसुद्दीन खान असून मृतकाचे नावे हे जिशान खान असे आहे.
Hindu बांगलादेशात एका हिंदू (Hindu) तरुणाला मौलाना आणि लष्कराने बेदम मारहाण केली. मुस्लीम तरुणावर प्रेम असल्याने तरुणाची हत्या करण्यात आली. ही घटना घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी सांगितले की, अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांचे वृत्त खोटे असून अतिशयोक्ति असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
Hindu पाकिस्तानात अल्पसंख्यांकांविरोधात गुन्ह्याची आणखी एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. गरू नानक जयंतीनिमित्त जात असताना सिंध प्रांतातील लारकान येथे राजेश कुमार यांना वाचेत दरोडेखोरांनी गोळ्या घातल्या आहेत. लाहोरपासून ६० किमी अंतरावर असलेल्या पंजाब येथील प्रांतातील मननवाला ननकाना साहिब येथील रोडवर ही घटना घडली आहे.