कोन पनवेल गिरणी कामगार संकुल एकता समितीच्यावतीने गुरुवार, दि.१ मे महाराष्ट्र दिन अणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संकुलाअंतर्गत येणाऱ्या ११ इमारतींना ११ गिरण्यांची नावे देण्यात आली आहेत.गिरणी कामगार हा मुंबईचा कणा होता. गिरण्यांमुळेच त्याचा उदरनिर्वाह होत होता. याची आठवण म्हणून संकुलतील ११ इमारतीना ११ गिरण्यांची नावे देण्यात आली. तसेच संकुलच्या भिंतीवर गिरणी कामगारांच्या लढ्याचा इतिहास सांगणारे कायमस्वरूपी भित्तीचित्र लावण्यात आले आहे, अशी माहिती कोनगाव, पनवेल गिरणी कामगार संकुल एकता
Read More
“पनवेलमधील कोन येथील गिरणी कामगारांच्या घरांसाठी 42 हजार, 135 रुपये इतके वार्षिक सेवाशुल्क आकारले आहे. हे सेवा शुल्क परवडणारे नसल्यामुळे ते कमी करावी,” अशी मागणी विजेत्या गिरणी कामगारांकडून वारंवार ‘म्हाडा’कडे करण्यात येत होती. याबाबत गृहनिर्माण विभागाने निर्णय घेतला असून एप्रिल 2024 ते मार्च 2025 या एका वर्षाचे शुल्क माफ करण्याबाबत मंजुरी दिल्याचे पत्र ‘म्हाडा’ला पाठविले आहे.
गिरणी कामगार संघर्ष समितीच्यावतीने महाराष्ट्रदिनी भव्य गिरणी कामगार मेळाव्याची हाक देण्यात अली आहे. यावेळी संघटना गिरणी कामगारांविषयक विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे सन २०२० मध्ये बॉम्बे डाईंग मिल व श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांसाठी जाहीर केलेल्या सोडतीतील यशस्वी पात्र १६० गिरणी कामगार / वारस यांना आठव्या टप्प्यांतर्गत नुकतेच सदनिकांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले.
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत बृहन्मुंबईतील ५८ बंद गिरण्यांमधील यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या ०१,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्याकरिता आयोजित विशेष अभियानास अर्जदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून अद्यापपर्यंत १६९८० गिरणी कामगार व त्यांच्या वारसांकडून कागदपत्र प्राप्त झाली आहेत.
‘म्हाडा’च्या मुंबई मंडळातर्फे २०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी जाहीर सोडतीतील १२५ यशस्वी गिरणी कामगारांना मंगळवार, दि. २९ ऑगस्ट रोजी सदनिकांच्या चाव्यांचे वाटप राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.