आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक दबाव कायम असताना भारतातील विना बँकिंग वित्तीय सेवेत वाढच होत आहे. एसबीआयने आपल्या नव्या अहवालात स्पष्ट केल्याप्रमाणे, विना बँकिग वित्तीय सेवा १० टक्क्यांनी वाढणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या सेवेत मात्र ३ टक्क्यांनी घसरण होणार आहे. प्रामुख्याने ही होणारी वाढ आरबीआयच्या विशेष प्रयोजनमूलक कामगिरीमुळे तसेच असेट क्वालिटीत वाढ झाल्यामुळे, बँकिंग पायभूत सुविधेत वाढ झाल्याने, सरकारच्या चांगल्या धोरणामुळे व मायक्रो इकॉनॉमी फंडामेंटलमुळे झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.
Read More
भारतातील सर्वात जुन्या बँकापैकी एक The Catholic Syrian Bank Limited ( CSB Bank) ने ज्येष्ठ नागरिक आणि महिला खातेधारकांसाठी स्पेशल ऑफर बाजारात आणली आहे. ज्येष्ठ नागरिक स्वतंत्र सेव्हिंग खाते आणि वूमन पॉवर सेव्हिंग खाते या दोन प्रकारची खाते योजना सुरू केली आहे. बँकेच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आलेल्या माहितीनुसार, या खात्यावर अनेक प्रकारच्या सुविधा, लाभ असणार आहेत. लॉकर रेंटल, एअरपोर्ट विश्रामगृहाचा मोफत प्रवेश, व रुपे प्लाटिनम डेबिट कार्ड असे वेगवेगळे लाभ या खात्यावर मिळणार आहेत.
भारतीय बँकांची सरशी उचित राजकीय धोरणांची व त्याच्या शिस्तबद्ध अंमलबजावणीची फलश्रुती आहे. यातले महत्त्वाचे चार-पाच घटक समजून घेतले, तरी ही प्रक्रिया समजू शकते.
सर्वांसाठी डिजिटल समावेश आणि कनेक्टिव्हिटी हा सरकारच्या ‘अंत्योदय’ दृष्टीकोनाचा अविभाज्य भाग आहे.