काँग्रेसने बंजारा समाजाचा कायम अपमान केला. त्यांना समान वागणूक दिली नाही, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. शनिवारी, पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी पोहरादेवीचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी यावेळी विविध विकासकामांचे लोकार्पणही केले.
Read More
मूळ पुसद तालुक्यातील व सध्या ठाणे शहरात वास्तव्य असलेल्या बंजारा समाजाच्या शेकडो कार्यकर्ते व नागरिकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या कार्यक्रमात भाजपाचा झेंडा हाती घेतला. महापालिकेतील माजी गटनेते मनोहर डुंबरे यांनी कार्यकर्त्यांच्या भाजपा प्रवेशासाठी पुढाकार घेतला होता.
बंजारा समाजाला भाजपाच न्याय देऊ शकतो. बंजारा समाजाच्या हक्कांमध्ये कोणालाही वाटेकरी होऊ देणार नाही आणि महाराष्ट्र सरकार या समाजाच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहील. अशी जाहीर भुमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडली. बंजारा समाजाच्या पदाधिकार्यांनी भाजपमध्ये केलेल्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस बोलत होते.
मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे;उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत येत्या दि. 9 एप्रिल रोजी रिपब्लिकन पक्षाचा मुंबई प्रदेश चा महामेळावा अयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास मुंबईतील बंजारा समाज हजारोंच्या संख्येने सामील राहणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाच्या बंजारा आघाडी चे राज्य अध्यक्ष सोमु उर्फ कामु पवार यांनी दिली.
'हिंदू धर्माशिवाय कोणत्याही धर्मात निसर्गाची पूजा केली जात नाही. तरीही टुकडे टुकडे गॅंगकडून निसर्गपूजेचा संदर्भ देत नेमक्या कुठल्या समाजाविषयी बोलत आहे असा सवाल उपस्थित झाला आहे. गोर बंजारा हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक असून धर्मांतरण आणि हिंदू धर्मविरोधी कारवाया करणाऱ्यांच्या निशाण्यावर आता बंजारा समाज आहे,' असा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.
महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे राठोड यांच्यावर नाराज आहेत. तसेच पवार यांनी राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनावरही आक्षेप घेतल्याची सुत्रांची माहिती आहे. पोहरादेवी येथे दर्शनासाठी गेलेल्या संजय राठोड यांनी बंजारा समाजातील हजारो समर्थकांना एकत्र करून नियमांचा आणि सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवला. यावर महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. आता यावर उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार आहेत.
७ फेब्रुवारी रोजी पुण्यातील वानवाडी भागातील इमारतीवरून उडी घेऊन बंजारा समाजाचा तरुण चेहरा, टीकटॉक स्टार हिने आपले जीवन संपवले. या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारचे मंत्री संजय राठोड यांचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट नाव घेत आरोप केले.आत्तापर्यंत पूजा चव्हाणच्या १२-१३ ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. मंत्री राठोड गेले १५ दिवस प्रसिद्धीमाध्यमांपासून दूर मौन बाळगून होते.
वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी गावात विविध विकासकामांचे भूमीपूजन व संत सेवालाल महाराज नंगारारुपी संग्रहालयाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी पार पडला. यावेळी बंजारा समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांशी बंजारा भाषेत संवाद साधला. बंजारा बोली भाषा म्हणून टिकून रहावी म्हणून विशेष प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.