भाजपने आयत्यावेळी उज्ज्वल निकम यांच्यासारखा आश्वासक चेहरा रिंगणात उतरवल्यामुळे काँग्रेस आधीच टेन्शनमध्ये असताना, उत्तर मध्य मुंबईत 'एमआयएम'च्या एन्ट्रीमुळे त्यांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. दिग्गजांनी साथ सोडल्यानंतर केवळ मुस्लिम मतांचा आधार होता. आता त्यांचेही विभाजन होणार असल्याने काँग्रेसच्या चाकातील हवाच निघून गेली आहे.
Read More
उत्तर मध्य मुंबई लोकसभेत आता एमआयएम पक्षानेही आपला उमेदवारी दिला आहे. त्यामुळे याठिकाणी भाजप, काँग्रेस आणि एमआयएम अशी तिरंगी लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. एमआयएमने शुक्रवारी रमजान चौधरी यांना उत्तर मध्य मुंबईची उमेदवारी जाहीर केली.
नाकापेक्षा मोती जड’ व्हायला लागला, की तो अलगद बाजूला काढावा लागतो, अन्यथा इजा होण्याची भीती असते. प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी हीच नीती अवलंबत एका महिला सहकार्याला अलगद बाजूला केले, तेही तिला थांगपत्ता लागू न देता. होय, वर्षा गायकवाड. महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यापासून मुंबईबाहेर त्यांची ओळख पोहोचली आणि त्याचा फायदा करून घेत, त्यांनी प्रदेश काँग्रेसच्या राजकारणात शिरकाव केला.
उत्तर मध्य मुंबईतून महायुतीच्या उमेदवार आणि विद्यमान खासदार पूनम महाजन यांनी मतदारांना केले आवाहन
खासदार म्हणून दररोज सकाळी कार्यालयात येऊन बसणे, लोकांच्या संपर्कात राहाणे, गेली अनेक वर्षे रखडलेली कामे मार्गी लावणे या गोष्टी खासदार महाजन यांच्या जमेच्या बाजू आहेतच.
गृहनिर्माण आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचे प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.